Israel Hamas War Update : इस्रायल आणि हमास (Israel Hamas Conflict) यांच्यातील युद्धाला तीन आठवड्यांहून अधिक काळ उलटून गेला असला तरी, तरी हा संघर्ष थांबण्याची चिन्हे दिसत नाहीत. हमासने इस्रायलवर हल्ला करत या युद्धाला सुरुवात केली. त्यानंतर इस्रायलने युद्धात उतरत हमासचा नायनाट करण्याचं ठरवलं आहे. त्यामुळे इस्रायलकडून गाझा पट्टीतील हल्ले तीव्र करण्यात आले आहेत. इस्रायली लष्कर गाझामध्ये घुसून हमासच्या दहशतवाद्यांचा खात्मा करत आहे. दरम्यान, या युद्धात निर्दोष चिमुकल्यांचाही बळी जात आहे.


इस्रायल हमास युद्धात 3000 हून अधिक बालकांचा मृत्यू


इस्रायल गाझावर सातत्याने बॉम्बफेक करत आहे. या सर्वाधिक परिणाम लहान मुलांवर झाला आहे. सेव्ह द चिल्ड्रनने दिलेल्या माहितीनुसार, हमास आणि इस्रायली यांच्या युद्घात 3,195 मुलांचा मृत्यू झाला आहे. 7 ऑक्टोबरपासून हा संघर्ष सुरु आहे. चिमुकल्यांच्या मृत्यूची संख्या 2019 पासून दरवर्षी जगभरातील संघर्षांमध्ये मारल्या जाणाऱ्या एकूण मुलांपेक्षा जास्त आहे. मात्र, ही संख्या याहूनही अधिक असण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. अजूनही 1000 मुले बेपत्ता असल्याची माहिती समोर आली आहे.






अमेरिकेचा इस्रायलला इशारा दिला


या युद्धात अमेरिकेचा इस्रायलला पाठिंबा असला तरी, अमेरिकेने इस्रायलला इशारा दिला आहे. हमासचे सैनिक आणि नागरिक यांच्यात फरक करून निष्पाप गाझा रहिवाशांचे संरक्षण केले पाहिजे, असा इशारा अमेरिकेने इस्रायलला दिला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांना सांगितले की, तेल अवीवला स्वतःचा बचाव करण्याचा अधिकार असला तरी, आंतरराष्ट्रीय मानवतावादी कायद्याच्या अनुषंगाने जे नागरिकांच्या संरक्षणास प्राधान्य देणे आवश्यक आहे. बायडन यांनी नेत्यानाहू यांच्यासोबत फोनवरून संवाद साधला.


सुमारे 240 इस्रायली नागरिक हमासच्या ताब्यात


इस्रायल सैन्याच्या प्रवक्याने दिलेल्या माहितीनुसार, हमासने सुमारे 240 इस्रायली नागरिकांना ओलिस ठेवलं आहे. ओलिस ठेवलेल्या इस्रायलींची मुक्तता करण्यासाठी हमास तयार झालं आहे, पण त्यासाठी हमासने अट ठेवली आहे. इस्रायलने त्या अटीची पूर्ण केली तर, हमास ओलिस ठेवलेल्या इस्रायली नागरिकांची सुखरूप सुटका करेल. पण, त्यासाठी आधी इस्रायलने कैदेत असलेल्या 6000 पॅलेस्टिनींची सुटका करावी, अशी हमासची मागणी आहे.


महत्त्वाच्या इतर बातम्या :


Weird News : ऐकावं ते नवलंच! 'या' देशात सरकारकडून मलमूत्र गोळा करण्याचा विचित्र आदेश; पण कारण काय?