Ola-Uber Cab Service : महिलांच्या सुरक्षेसाठी उत्तर प्रदेश सरकार (Uttar Pradesh Government) ने मोठा निर्णय घेतला आहे. ओला (Ola), उबर (Uber) कॅब (Cab Service), प्रायव्हेट वाहने (Private Vehicle) आणि सिटी बस (City Bus) मध्ये आता सीसीटीव्ही (CCTV Camera) आणि पॅनिक बटण (Panic Button) बसवण्यात येणार आहे. याशिवाय वृद्ध आणि अपंगांनाही उत्तम सुविधा मिळण्यासाठी सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. वृद्धांसाठी डे केअर सेंटर आणि अपंगांसाठी रॅम्प बांधण्याचे कामही सरकाररजून हाती घेण्यात आलं आहे. यासोबतच दृष्टिहीनांसाठी सरकारी, खासगी इमारती, चौकाचौकात आणि सार्वजनिक ठिकाणी ब्रेल लिपीमध्ये फलक लिहीण्यात येणार आहेत.
महिलांच्या सुरक्षेसाठी उत्तर प्रदेश सरकारचा मोठा निर्णय
उत्तर प्रदेश सरकार सेफ सिटी प्रकल्पाअंतर्गत महिला, वृद्ध आणि अपंग लोकांची विशेष काळजी घेत आहे, त्यांची सुरक्षा आणि सुविधा देण्यात येत आहेत. याअंतर्गत 17 महानगरपालिका आणि गौतम बुद्ध नगरमध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी अत्याधुनिक डे केअर सेंटर उभारण्यात येत आहे. महिलांच्या सुरक्षिततेसाठी परिवहन विभागाच्या बसेसमध्ये तसेच ओला आणि उबेर कॅबमध्ये सीसीटीव्ही आणि पॅनिक बटण बसविण्याची तयारी सुरू आहे. तसेच, दिव्यांगांसाठी शासकीय आणि खाजगी विभागात रॅम्प बसविण्यात येत असून दृष्टिहीनांसाठी ब्रेल लिपीत सार्वजनिक माहिती लिहिली जात आहे.
ओला-उबर सीसीटीव्ही आणि पॅनिक बटणाने सुसज्ज
यामध्ये परिवहन विभागाच्या 1235 सिटी बस, 9840 ओला, 1122 उबर आणि 8958 इतर खासगी वाहनांचा समावेश आहे. यापैकी परिवहन विभागाच्या 700 बसेसमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे आणि पॅनिक बटणे लावण्यात आली आहेत. याशिवाय, ओला, उबेर आणि इतर खाजगी वाहनांमध्ये सीसीटीव्ही आणि पॅनिक बटण बसवण्याची प्रक्रिया वेगाने सुरू
ज्येष्ठ नागरिकांसाठीही खास सुविधा
सेफ सिटी प्रकल्पांतर्गत नगरविकास विभागामार्फत ज्येष्ठ नागरिकांसाठी डे केअर सेंटरची स्थापना करण्यात येत आहे. पहिल्या टप्प्यात सर्व 17 महापालिकांमध्ये अत्याधुनिक डे केअर सेंटर बांधण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. सध्या एक डे केअर सेंटर सुरू असून आणखी चार डे केअर सेंटर बांधण्याचं काम वेगानं सुरू आहे. इतर 12 डे केअर सेंटरचे बांधकामही लवकरच सुरू करण्यात येणार आहे.
झेब्रा क्रॉसिंगवर ब्रेल लिपीत फलक
दृष्टिहीनांचे हित लक्षात घेऊन सरकारी आणि खाजगी इमारती, चौक आणि सार्वजनिक ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभाग आवश्यक माहिती ब्रेल लिपीत फलक लावेल. यासोबतच चौकाचौकात झेब्रा क्रॉसिंगवर दिशादर्शक फलक आणि इमारतींमध्ये दिव्यांगांसाठी रॅम्प बसवण्यात येत आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाने 17 महानगरपालिकांमध्ये 135 झेब्रा क्रॉसिंगवर फलक लावण्याचे काम पूर्ण केले आहे.