India vs England : एकदिवसीय विश्वचषक 2023 (World Cup 2023) मध्ये भारताने इंग्लंडचा (IND vs ENG) पराभव केला. यंदाच्या विश्वचषकात टीम इंडिया (Team India) चा हा सलग सहावा विजय आहे. भारताने या स्पर्धेत आतापर्यंत एकूण 6 सामने खेळले असून सर्व सामने जिंकले आहेत. विश्वचषकातील भारताच्या सहाव्या सामन्यात गतविजेता इंग्लंडलावर टीम इंडियाचा डाव भारी पडला. भारताने विजयी घोडदौड कायम राखत इंग्लंडला धूळ चारली. या विजयासह टीम इंडिया विश्वचषक गुणतालिकेत (ICC Cricket World Cup 2023) पहिल्या क्रमांकावर पोहोचली आहे, त्याशिवाय भारताने विश्वचषकाच्या इतिहासात एक नवा विक्रमही केला आहे. इंग्लंडच्या नावावर नकोसा विक्रम झाला आहे.


इंग्लंडचा पराभव करत टीम इंडियाचा नवा विक्रम


विश्वचषकाच्या सामन्यात इंग्लंडला पराभूत केल्यानंतर टीम इंडिया वर्ल्ड कपच्या इतिहासात सर्वाधिक सामने जिंकणारा दुसरा संघ बनला आहे. न्यूझीलंडला मागे टाकत भारताने विश्वचषकातील 59 सामने जिंकले आहेत. या यादीत भारताच्या पुढे आता फक्त एकच संघ आहे. तर दुसरीकडे नावावर एक लज्जास्पद विक्रमही नोंदवला गेला आहे. इंग्लंडने विश्वचषकात सलग चार सामने गमावण्याचा नकोसा रेकॉर्ड केला आहे.






विश्वचषकात सर्वाधिक सामने कोणत्या संघाने जिंकले?


विश्वचषकातील सर्वाधिक सामने जिंकण्याचा यादीत पहिल्या क्रमांकावर ऑस्ट्रेलिया संघ आहे. ऑस्ट्रेलियाने आतापर्यंत सर्वात जास्त एकूण 73 विश्वचषक सामने जिंकण्याचा विक्रम केला आहे. आता या यादीत दुसऱ्या क्रमांकावर भारत आहे. टीम इंडियाने 59 विश्वचषकात सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. या यादीत भारतानंतर न्यूझीलंडचा संघ तिसऱ्या स्थानावर आहे. न्यूझीलंडने आतापर्यंत एकूण 58 विश्वचषक सामने जिंकले आहेत.


इंग्लंडच्या नावे लाजिरवाणा विक्रम


विश्वचषकात भारताविरुद्धचा सामना हरल्यानंतर इंग्लंड संघाने नकोसा विक्रम आपल्या नावावर केला आहे. विश्वचषकाच्या इतिहासात पहिल्यांदाच इंग्लंड क्रिकेट संघ सलग चार सामने पराभूत झाला आहे. यापूर्वीच्या सर्व विश्वचषक स्पर्धेत इंग्लंडसोबत असं कधीही घडलेलं नाही. यंदाच्या विश्वचषकात गतविजेत्या इंग्लंडचं आव्हन जवळपास संपलं आहे. इंग्लंडचे तीन सामने बाकी आहेत, यामध्ये त्यांना ऑस्ट्रेलिया, नेदरलँड आणि पाकिस्तानचं आव्हान असेल.


महत्त्वाच्या इतर बातम्या :


India vs England : टीम इंडियाचा शंभरी नंबरी विजय; शमी अन् बुमराहच्या वादळात इंग्रजांचा बाजार उठला, विश्वविजेत्यांना स्पर्धेतून बाहेर फेकले!