(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Morning Headlines 28th January: देश विदेशातील महत्त्वाच्या बातम्या एका क्लिकवर, वाचा मॉर्निंग न्यूज
देश-विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील...
देश-विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील...
ISRO Metrological Satellite : चंद्र-सूर्यानंतर ISRO आता नवी भरारी घेण्याच्या तयारीत; फेब्रुवारीत प्रक्षेपणाची शक्यता
ISRO Metrological Satellite : बंगळुरू : चंद्र (Moon) आणि सूर्याकडे (Sun) झेपावल्यानंतर आता इस्रो (Indian Space Research Organisation) अवकाशात नवा उपग्रह पाठवण्याची तयारी करत आहे. इस्रोच्या (ISRO) वतीनं देण्यात आलेल्या माहितीनुसार, त्यांचा हवामानशास्त्रीय उपग्रह INSAT-3DS GSLV F14 वर प्रक्षेपणासाठी श्रीहरिकोटा येथील सतीश धवन स्पेस सेंटर (SDSC) SHAR येथे पाठवण्यात आला आहे. उपग्रहानं कॅप्चर केलेले यू.आर. राव सॅटेलाईट सेंटर, बंगळुरू येथे उपग्रह असेंब्ली, एकत्रीकरण आणि चाचणी उपक्रम यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आल्या आहेत. हा उपग्रह पृथ्वी विज्ञान मंत्रालय (MoES) सह वापरकर्ता-अनुदानित प्रकल्प आहे, जो ISRO च्या I-2K बस प्लॅटफॉर्मभोवती 2275 किलो 'लिफ्ट-ऑफ' वस्तुमानासह एकत्रित केला जातो. वाचा सविस्तर
Praful Patel On Chhagan Bhujbal : मराठा आरक्षणाच्या नव्या अध्यादेशावर छगन भुजबळांचा आक्षेप; "ही भूमिका राष्ट्रवादीची नाही", प्रफुल्ल पटेलांनी हात झटकले
Praful Patel On Chhagan Bhujbal : मुंबई : राज्य सरकारनं (Maharashtra Government) मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) नव्या अध्यादेशात सगेसोयरेंबाबतची मनोज जरांगे (Manoj Jarange) यांची मागणी मान्य केली आहे. मात्र यावर मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) नाराज झाले आहेत. त्यांनी या अध्यादेशावर आक्षेप घेतला आहे. दरम्यान, यासंदर्भात अजित पवार गटाचे (Ajit Pawar Group) ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल (Praful Patel) यांना विचारले असता ती भूमिका राष्ट्रवादी पक्षाची (Nationalist Congress Party) नाही असं म्हणत प्रफुल्ल पटेलांनी भुजबळांच्या आक्षेपावर हात झटकले आहेत. वाचा सविस्तर
Congress Crowdfunding: राहुल गांधींची सही असलेला टी-शर्ट, भेटवस्तू 670 रुपयांना मिळणार; न्याय यात्रेसाठी काँग्रेसचं क्राउडफंडिंग
Congress Bharat Jodo Nyay Yatra Crowdfunding: नवी दिल्ली : काँग्रेस (Congress) पक्षानं 'भारत जोडो न्याय यात्रे'ला (Bharat Jodo Nyay Yatra) निधी देण्यासाठी आपली 'डोनेट फॉर जस्टिस' क्राउडफंडिंग मोहीम सुरू केली आहे. मोहिमेअंतर्गत लोकांना त्यांच्या देणगीच्या बदल्यात राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या स्वाक्षरीचा टी-शर्ट आणि पत्र मिळेल. नवी दिल्लीतील एआयसीसी मुख्यालयात काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश (Jairam Ramesh) यांच्यासह या मोहिमेचा शुभारंभ करताना काँग्रेसचे खजिनदार अजय माकन म्हणाले की, मोहिमेअंतर्गत 670 रुपये किंवा त्याहून अधिक देणगी देणाऱ्या व्यक्तीला राहुल गांधींची स्वाक्षरी असलेली भेटवस्तू मिळेल आणि तुम्हाला टी-शर्ट मिळेल. वाचा सविस्तर
Weather Update : कुठे थंडी, तर कुठे पाऊस! तामिळनाडूसह देशाच्या 'या' भागात पावसाची शक्यता
IMD Weather Update Today : देशातील हवामानात (Weather Forecast) पुन्हा एकदा बदल होताना पाहायला मिळत आहे. देशाच्या उत्तरेकडे थंडीची लाट (Cold Wave) पाहायला मिळत असून पुढील 24 तासात काही भागात पावसाची शक्यता (Rain Updates) आहे. हवामान खात्याने (IMD) वर्तवलेल्या अंदाजानुसार, आज म्हणजेच रविवारी 28 जानेवारीला पूर्व उत्तर प्रदेश, पंजाब, हरियाणा, चंदीगड, पश्चिम उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये थंडी (Cold Weather) दाट धुके पडण्याची शक्यता आहे. आज जम्मू-काश्मीर, गिलगिट-बाल्टिस्तान, मुझफ्फराबाद, लडाख आणि हिमाचल प्रदेशमध्ये हलका ते मध्यम पाऊस आणि हिमवृष्टीची शक्यता आहे. उत्तराखंडमध्ये काही ठिकाणी हलका पाऊस आणि वरच्या भागात हिमवृष्टीची शक्यता आहे... वाचा सविस्तर
Flipkart Co-Founder: फ्लिपकार्टमधून 'बंसल' युगाचा अस्त; बिन्नी बंसल यांचा राजीनामा, पुढे काय करणार ई-कॉमर्स कंपनीचे फाउंडर?
End Of Bansal Era: एका छोट्याशा खोलीतून सुरुवात करून फ्लिपकार्टला (Walmart Flipkart Deal) मोठ्या उंचीवर नेणारे बन्सल ब्रदर्स म्हणजेच, फ्लिपकार्टची (Flipkart) ओळख. पण आता हीच ओळख पुसली गेली आहे. सचिन बन्सल (Sachin Bansal) आणि बिन्नी बन्सल (Binny Bansal) यांची फ्लिपकार्टशी जोडली गेलेली नावं आता पूर्णपणे मिटली आहेत. म्हणजेच, आता बन्सल ब्रदर्सकडे फ्लिपकार्टचे काहीच हक्क राहिलेले नसून त्यांनी आपल्याकडील फ्लिपकार्टची मालकी पूर्णपणे विकली आहे. वाचा सविस्तर
Iran-Pakistan Tensions : इराण आणि पाकिस्तान यांच्यात वाढता तणाव! अज्ञात हल्लेखोरांकडून 9 पाकिस्तानींची हत्या
Gunmen kill Pak Nationals : इराण आणि पाकिस्तान यांच्यात वाढता तणाव पाहायला मिळत आहे. इराणमधील एका शहरात अज्ञात बंदूकधारी हल्लेखोरांनी 9 पाकिस्तानींची गोळ्या झाडून हत्या केली. एकीकडे इस्लामाबाद आणि तेहरान यांच्यातील तणाव कमी करण्याच्या प्रयत्न सुरु असताना दुसरीकडे इराणच्या अशांत दक्षिण-पूर्व सीमा भागात अज्ञात बंदूकधाऱ्यांनी नऊ पाकिस्तानी कामगारांची हत्या केली. शनिवारी 27 जानेवारीला ही घटना घडली आहे. वाचा सविस्तर...
28th January In History: लाला लजपतराय यांचा जन्म, संगीतकार ओ.पी. नय्यर यांचा स्मृतीदिन; आज इतिहासात....
28th January In History: इतिहासात प्रत्येक दिवसाचे एक महत्त्व असते. त्या-त्या दिवशी घडलेल्या घटनांचा परिणाम भविष्यकाळातील घटनांवरही होत असतो. 28 जानेवारी 1986 रोजी अमेरिकेचे अंतराळ यान कोसळले आणि त्यामध्ये सात अंतराळवीरांना आपला प्राण गमवावा लागला. तसेच देशाचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या मारेकऱ्यांनाही आजच्याच दिवशी शिक्षा सुनावण्यात आली होती... वाचा सविस्तर
Horoscope Today 28 January 2024 : आजचा रविवार खास! 12 राशींसाठी दिवस कसा असेल? आजचे राशीभविष्य जाणून घ्या
Horoscope Today 28 January 2024 : राशीभविष्यानुसार आज म्हणजेच 28 जानेवारी 2024 रोजी रविवार हा महत्त्वाचा दिवस आहे. ग्रहांच्या चालीनुसार, आज वृषभ राशीच्या लोकांचे कौटुंबिक वातावरण काहीसे तणावपूर्ण असेल आणि तुम्ही तुमच्या वडिलधाऱ्यांशी बोलताना तुमच्या बोलण्यावर नियंत्रण ठेवावे. आज सिंह राशीचे लोक त्यांच्या जोडीदारासोबत कुठेतरी बाहेर फिरायला जाऊ शकतात. सर्व राशीच्या लोकांसाठी रविवार कसा राहील? सर्व 12 राशींचे आजचे राशीभविष्य जाणून घ्या... वाचा सविस्तर