Morning Headlines 26th February : देश विदेशातील महत्त्वाच्या बातम्या एका क्लिकवर, वाचा मॉर्निंग न्यूज
देश-विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील...
देश-विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील...
Budget Session : आजपासून राज्य विधीमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन, विविध मुद्द्यांवरून विरोधक सरकारला घेरणार
Maharashtra Budget Session 2024 : आजपासून राज्य विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनास सुरूवात होत आहे. आज सकाळी 11 वाजता विधान परिषद तर दुपारी 12 वाजता विधानसभेचे कामकाज सुरू होईल. एकूण पाच दिवस हे अधिवेशन चालेल. या अधिवेशनात दुसऱ्या दिवशी म्हणजे 27 फेब्रुवारीला लेखानुदान अर्थात अंतरिम अर्थसंकल्प मांडण्यात येईल. या अधिवेशनाच्या निमित्ताने विरोधकांसाठी राज्य सरकारला घेरण्याची संधी असेल. विरोधकांकडून राज्य सरकारला कोंडीत आणण्याचा प्रयत्न करण्याची शक्यता आहे... वाचा सविस्तर
Farmers Protest : संयुक्त किसान मोर्चाची मोठी घोषणा, आज 'WTO क्विट डे' साजरा करणार, महामार्गावर ट्रॅक्टर उभे करणार
Farmers Protest : आपल्या विविध मागण्यांसाठी एकीकडे शेतकरी आंदोलक पंजाब-हरियाणाच्या सीमेवर उभे आहेत. तर दुसरीकडे, संयुक्त किसान मोर्चा (SKM) ने घोषणा केली आहे की, आज म्हणजेच 26 फेब्रुवारी हा दिवस 'WTO क्विट डे' म्हणून मानला जाईल. शेतकरी आज दुपारी 12 ते 4 या वेळेत राष्ट्रीय-राज्य महामार्गावर ट्रॅक्टर उभे करून वाहतुकीला अडथळा करणार असल्याचेही जाहीर करण्यात आले आहे. शेतकरी संघटनांनी असेही म्हटलंय की, त्यांनी शेतीला WTO च्या कक्षेतून बाहेर ठेवण्यास सांगितले आहे... वाचा सविस्तर
तुम्हाला कॉलर नेम प्रेजेंटेशनबद्दल काही माहितीय का? खुद्द TRAI नं केलीय शिफारस, ट्रूकॉलरसारखी मिळेल सुविधा
TRAI Recommend New Rules For Caller Name: भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण (TRAI) ने स्पॅम आणि स्कॅम कॉलवर कारवाई करण्याची शिफारस केली आहे. याच्या मदतीनं यूजर्सच्या फोनवर येणाऱ्या अनोळखी नंबर्सचं नावही कळणार आहे. दरम्यान, आजकाल फोनवर अनेक कॉल्स येतात, जे प्रमोशनल असतात. हा कॉल कधीकधी काही युजर्ससाठी समस्या निर्माण करतो. यावर मात करण्यासाठी ट्रायनं कॉलर आयडी डिस्प्ले (Caller ID Display) सेवा सुरू करण्याची शिफारस केली आहे... वाचा सविस्तर
Titeeksha Tawde Siddharth Bodke Wedding : 'बोडके अन् तावडे परिवार पटापट जेवायला बसा', वऱ्हाडी मित्रांची सिद्धार्थ - तितिक्षाच्या लग्नात धम्माल
Titeeksha Tawde Siddharth Bodke Wedding : अभिनेता सिद्धार्थ बोडके (Siddharth Bodke) आणि तितिक्षा तावडे (Titeeksha Tawde ) यांची लगीनसराई सध्या सुरु आहे. नुकतच त्यांच्या साखरपुड्याचे आणि हळदीचे व्हिडिओ चाहत्यांच्या पसंतीत उतरत आहे. या जोडप्यांच्या लग्नासाठी कलाविश्वातली मित्रमंडळी देखील हजर झाली आहे. अभिनेत्री अनघा अतुल, ऋतुजा बागवे, रसिका सुनील या सगळ्यांनी या दोघांच्या लग्नाच्या विधींमध्ये तितकीच धम्माल केल्याचं पाहायला मिळालं. भगरे गुरुजींची लेक आणि अभिनेत्री अनघा अतुल (Anagha Atul) हीचा असा एक धम्माल व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय... वाचा सविस्तर
आजचा सोमवार खास! 'या' राशींवर महादेवाची विशेष कृपा , सर्व मनोकामना पूर्ण होणार; वाचा 12 राशींचे राशीभविष्य
Horoscope Today 26 February 2024 : आजचं माझं भविष्य काय? आज काय होणार? किंवा आजचा आपला दिवस कसा असणार प्रत्येक जण कधी ना कधी हा विचार करतच असतो. लहानांपासून थोरांपर्यंत सर्वांनाच भविष्यात काय होणार हे जाणून घेण्याची प्रबळ इच्छा असते. यासाठीच आपल्या राशी आपल्याला मदत करतात. आज मेष ते मीन राशीमध्ये काय लिहीले आहे. कोणासाठी आजचा दिवस कोणासाठी शुभ किंवा अशुभ कोणासाठी हे समजण्यासाठी सविस्तरपणे वाचा आजचे राशीभविष्य... वाचा सविस्तर