(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Morning Headlines 21th March : देश विदेशातील महत्त्वाच्या बातम्या एका क्लिकवर, वाचा मॉर्निंग न्यूज
देश-विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील...
देश-विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील...
Earthquake in Marathwada: मोठी बातमी! मराठवाड्यात भूकंपाचे धक्के; 4.2 रिश्टर स्केल इतकी तीव्रता, नागरिकांमध्ये भितीचं वातावरण
Earthquake in Marathwada: नांदेड : मराठवाड्यातील (Marathwada) अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के (Earthquake) जाणवले असून नागरिकांमध्ये भितीचं वातावरण निर्माण झालं आहे. नांदेड (Nanded), परभणी (Parbhani), हिंगोलीमध्ये (Hingoli) 4.2 रिश्टर स्केल तीव्रतेचे भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. सकाळी 6 वाजून 9 मिनिटांनी भूकंपाचे धक्के जाणवले असल्याची माहिती मिळत आहे. वाचा सविस्तर
निवडणूक आयुक्तांच्या नियुक्तीवर बंदी घालण्याच्या मागणीला केंद्राचा विरोध; सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी
Centre Defends New EC Appointment Law: नवी दिल्ली : मुख्य निवडणूक आयुक्त (Chief Election Commissioner) आणि इतर आयुक्तांच्या नियुक्तीशी संबंधित कायद्याला स्थगिती देण्याची मागणी करणाऱ्या याचिकांना केंद्र सरकारनं (Central Government) विरोध केला आहे. आज या प्रकरणी पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) सुनावणी होणार आहे. सर्वोच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीदरम्यान कायदा मंत्रालयानं प्रतिज्ञापत्र दिलं. निवडणूक आयुक्तांच्या नियुक्तीशी संबंधित पॅनलमध्ये न्यायाधीश असणं आवश्यक नाही, असं कायदा मंत्रालयानं म्हटलं आहे. वाचा सविस्तर
महायुतीत जागावाटपाचा पेच, तोडगा काढण्यासाठी नेते दिल्ली दरबारी, आतातरी तिढा सुटणार?
Mahayuti Seat Sharing : मुंबई : महायुतीच्या जागा वाटपाचा (Mahayuti Seat Sharing) तिढा आता दिल्लीतच (Delhi) सुटणार आहे. महायुतीच्या काही जागांवर पेच कायम असल्यानं हा पेच आता दिल्लीतच सुटणार अशी चिन्ह दिसत आहेत. लवकरच महायुतीतील भाजप (BJP), शिवसेना (Shiv Sena) शिंदे गट (Shinde Group), राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) अजित पवार गट (Ajit Pawar Group) अशा तिन्ही पक्षातील प्रमुख नेत्यांची दिल्लीत आणखी एक बैठक पार पडणार आहे. भाजप नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांच्यासोबत तिन्ही पक्षांच्या नेत्यांची बैठक होणार आहे. या बैठकीत जागावाटपाचा तिढा सोडवण्याचा प्रयत्न तिन्ही पक्षांच्या नेत्यांचा असणार आहे. वाचा सविस्तर
मोठी बातमी: भाजपात नाराजीचा स्फोट! जळगाव, रावेर, धुळेच्या उमेदवारीवरून पक्षात नाराजीनाट्य; पक्षश्रेष्ठींची डोकेदुखी वाढली
Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election) पहिल्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रकिया सुरु झाली असतांना देखील, अजूनही महायुतीमधील जागावाटपाचा (Mahayti Seat Sharing) तिढा सुटलेला नाही. अशात आता भाजप (BJP) पक्षातील अंतर्गत नाराजी देखील समोर येऊ लागली आहे. जळगाव (Jalgaon) जिल्ह्यातील रावेर लोकसभा मतदारसंघासाठी (Raver Lok Sabha Constituency) महायुतीच्या वतीने रक्षा खडसे (Raksha Khadse) यांना तिसऱ्यांदा उमेदवारी देण्यात आली आहे. तर, जळगाव लोकसभा मतदारसंघात (Jalgaon Lok Sabha Constituency) स्मिता वाघ (Smita Wagh) यांना पहिल्यांदा उमेदवारी मिळाली आहे. परंतु, या दोन्ही उमेदवारांच्या नावाची घोषणा झाल्यानंतर पक्षात त्यांना नाराजीचा सामना करावा लागत आहे. रावेर लोकसभा मतदारसंघातील रक्षा खडसे यांची उमेदवारी बदलून इतर उमेदवार देण्याची मागणी करत शेकडो भाजप कार्यकर्त्यांनी राजीनामे देत पक्षाकडे पाठवले आहेत. विशेष म्हणजे धुळ्यात देखील अशीच काही परिस्थिती आहे. वाचा सविस्तर
Horoscope today 21st March: गुरुवारी होणार या राशीचे नशीब पालटणार, मिळणार फायदेशीर संधी; वाचा तुमचे राशीभविष्य!
Horoscope today 21st March आज मेष ते मीन राशीमध्ये काय लिहीले आहे. कोणासाठी आजचा दिवस कोणासाठी शुभ किंवा अशुभ कोणासाठी हे समजण्यासाठी सविस्तरपणे वाचा आजचे राशीभविष्य...