मोठी बातमी: भाजपात नाराजीचा स्फोट! जळगाव, रावेर, धुळेच्या उमेदवारीवरून पक्षात नाराजीनाट्य; पक्षश्रेष्ठींची डोकेदुखी वाढली
Lok Sabha Election 2024 : महायुतीमधील जागावाटपाचा तिढा कायम असतानाच तिकडे भाजपमध्ये अनेक ठिकाणी उमेदवारीवरून पक्षात नाराजीनाट्य पाहायला मिळत आहे.
![मोठी बातमी: भाजपात नाराजीचा स्फोट! जळगाव, रावेर, धुळेच्या उमेदवारीवरून पक्षात नाराजीनाट्य; पक्षश्रेष्ठींची डोकेदुखी वाढली Lok Sabha Election Displeasure over Lok Sabha election candidature in BJP party Opposition to Raksha Khadse Smita Wagh Subhash Bhamre marathi news मोठी बातमी: भाजपात नाराजीचा स्फोट! जळगाव, रावेर, धुळेच्या उमेदवारीवरून पक्षात नाराजीनाट्य; पक्षश्रेष्ठींची डोकेदुखी वाढली](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/03/21/c9589ea69d775ead704c94d69182bf5b1710992989975737_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election) पहिल्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रकिया सुरु झाली असतांना देखील, अजूनही महायुतीमधील जागावाटपाचा (Mahayti Seat Sharing) तिढा सुटलेला नाही. अशात आता भाजप (BJP) पक्षातील अंतर्गत नाराजी देखील समोर येऊ लागली आहे. जळगाव (Jalgaon) जिल्ह्यातील रावेर लोकसभा मतदारसंघासाठी (Raver Lok Sabha Constituency) महायुतीच्या वतीने रक्षा खडसे (Raksha Khadse) यांना तिसऱ्यांदा उमेदवारी देण्यात आली आहे. तर, जळगाव लोकसभा मतदारसंघात (Jalgaon Lok Sabha Constituency) स्मिता वाघ (Smita Wagh) यांना पहिल्यांदा उमेदवारी मिळाली आहे. परंतु, या दोन्ही उमेदवारांच्या नावाची घोषणा झाल्यानंतर पक्षात त्यांना नाराजीचा सामना करावा लागत आहे. रावेर लोकसभा मतदारसंघातील रक्षा खडसे यांची उमेदवारी बदलून इतर उमेदवार देण्याची मागणी करत शेकडो भाजप कार्यकर्त्यांनी राजीनामे देत पक्षाकडे पाठवले आहेत. विशेष म्हणजे धुळ्यात देखील अशीच काही परिस्थिती आहे.
भाजपकडून जाहीर करण्यात आलेल्या उमेदवारी यादीत रावेर लोकसभा मतदारसंघातून एकनाथ खडसे यांची सून रक्षा खडसे यान पुन्हा एकदा संधी देण्यात आली आहे. मात्र, त्यांच्या उमेदवारीला पक्षातूनचा विरोध होत आहे. रक्षा खडसे यांची उमेदवारी बदलून देण्याच्या मागणीसाठी भाजप कार्यकर्त्यांनी राजीनामे देण्याचा धडाका लावला आहे. तसेच, मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी देखील रक्षा खडसे यांच्या उमेदवारीला विरोध केला आहे. रक्षा खडसे यांनी महायुतीत असतांना आम्हाला कधीही समजून घेत काम केलेलं नाही, नेहमी त्या विरोधकांच्या भूमिकेत वावरल्या असल्याचं त्यांनी म्हटले आहे. पक्षातील वाढती नाराजी पाहता भाजपची डोकेदुखी वाढली आहे.
जळगावात उन्मेष पाटील नाराज...
एकीकडे रक्षा खडसे यांना विरोध होत असतानाच दुसरीकडे जळगाव लोकसभा मतदारसंघात देखील नाराजीनाट्य पाहायला मिळत आहे. जळगावमधून उमेदवारी न मिळाल्याने खासदार उन्मेष पाटील नाराज असल्याची माहिती मिळत आहे. विशेष म्हणजे भाजपची नुकत्याच झालेल्या महत्वाच्या बैठकीत देखील निमंत्रण नसल्याचे कारण देत उन्मेष पाटील गैरहजर राहिल्याचे पाहायला मिळाले. तसेच, उन्मेष पाटील यांना पुन्हा उमेदवारी न दिल्यास भाजप उमेदवाराला मतदान करणार नसल्याची भूमिका त्यांच्या समर्थकांनी घेतली आहे. त्यामुळे या नाराजीचे आव्हान भाजप उमेदवार स्मिता वाघ यांच्यासह भाजपाच्या वरिष्ठांच्या पुढे राहणार आहे.
धुळ्यात सुभाष भामरेंच्या उमेदवारीला विरोध...
विशेष म्हणजे जळगावच्या शेजारील धुळे जिल्ह्यात देखील भाजपाचे उमेदवार सुभाष भामरे यांच्या उमेदवारीला त्यांच्याच पक्षातून विरोध होतांना पाहायला मिळत आहे. सुभाष भामरे यांनी अडचणीच्या काळात कधीही भाजपा कार्यकर्त्यांच्या पाठीशी उभे राहिले नाहीत, किंवा कार्यकर्त्यांना समजूत घेतले नसल्याचा आरोप केला जात आहे. जळगाव असो किंवा धुळे असो, या दोन्ही जिल्ह्यात भाजपाच्या उमेदवारांना त्यांच्याच पक्षातून विरोध होत असल्याने याचा विरोधकांना किती फायदा होतो हे येणाऱ्या काळात पाहायला मिळणार आहे.
इतर महत्वाच्या बातम्या :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)