Morning Headlines 16th August : देश विदेशातील महत्त्वाच्या बातम्या एका क्लिकवर, वाचा मॉर्निंग न्यूज
देश-विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

देश-विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.
नेहरु मेमोरियल म्युझियमचे नाव बदललं, आता पीएम म्युझियम म्हणून ओळखलं जाणार
दिल्लीच्या तीन मूर्ती भवनवर असलेल्या नेहरु मेमोरियल म्युझियम अँड लायब्ररीचं नाव आता अधिकृतपणे पीएम म्युझियम अँड लायब्ररी असं करण्यात आलं आहे. स्वातंत्र्यदिनाच्या मुहूर्तावर नाव बदलाला केंद्र सरकारकडून मंजुरी देण्यात आली. हा नाव बदल सोमवारपासून (14 ऑगस्ट) लागू झाला आहे. वाचा सविस्तर
भाजपातील घराणेशाहीचं काय? मोदींच्या टीकेला विरोधकांचे उत्तर; घराणेशाहीवरुन वार-पलटवार
दिल्लीतील लाल किल्ल्यावर पंतप्रधान मोदींच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यानंतर पंतप्रधान मोदी यांनी देशाला संबोधित केलं. यावेळी विरोधकांवर निशाणा साधताना मोदींनी घराणेशाहीचा उल्लेख केला. त्यानंतर आता मोदींच्या भाषणावर विरोधकांनी टीकेची झोड उठवली आहे. मोदींच्या टीकेला महाराष्ट्रातून राष्ट्रवादीच्या शरद पवार गटानं उत्तर दिलं. वाचा सविस्तर
आज अटलबिहारी वाजपेयी यांची पुण्यतिथी; भाजपच्या कार्यक्रमात प्रथमच एनडीएच्या नेत्यांचीही उपस्थिती
भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांची आज पाचवी पुण्यतिथी आहे. या निमित्ताने भाजपने एका कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून अटल बिहारी वाजपेयी यांचं स्मरण केलं जाईल. कार्यक्रमाच्या दरम्यान भाजपचे सर्व मोठे नेते उपस्थित राहणार आहेत. विशेष म्हणजे पुण्यतिथीच्या कार्यक्रमात पहिल्यांदाच एनडीएतील घटक पक्षांना भाजपने आमंत्रित केले आहे. वाचा सविस्तर
मुसळधार पावसाचा उत्तराखंडसह हिमाचलला मोठा फटका, आतापर्यंत 65 जणांचा मृत्यू, आज पावसाचा रेड अलर्ट
देशाच्या अनेक भागात मुसळधार पावसाने धुमाकूळ घातला आहे. काही भागात पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या सततच्या पावसामुळे उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशमध्ये 65 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, या दोन्ही राज्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. दोन्ही राज्यांमध्ये पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. वाचा सविस्तर
भारतात 6G नेटवर्कची तयारी सुरू, 5G पेक्षा इंटरनेटचा वेग 50 पट जास्त होणार : पंतप्रधान नरेंद्र मोदी
भारतात 5G नेटवर्कनंतर आता भारत सरकार 6G नेटवर्क आणण्याच्या तयारीत आहे. देशाच्या 77 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त मंगळवारी लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करताना पंतप्रधान मोदींनी घोषणा केली की, देशात 6G नेटवर्क आणण्याची तयारी सुरु आहे आणि त्यासाठी कर्मचारी वर्गही तयार करण्यात आला आहे. 77 व्या स्वातंत्र्यदिनी पंतप्रधान मोदींनी 5G नेटवर्कच्या प्रसाराचे देखील कौतुक केले. वाचा सविस्तर
राज्यातील जिल्ह्यांमध्ये बदलले पेट्रोल-डिझेलचे दर; तुमच्या शहरात एक लिटर पेट्रोलची किंमत काय?
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर जवळपास स्थिर आहेत. WTI क्रूड 0.04 डॉलर्सनी घसरुन प्रति बॅरल 80.95 डॉलरवर पोहोचलं आहे. तसेच, ब्रेंट क्रूड 0.01 डॉलर्सनी घसरुन प्रति बॅरल 84.88 डॉलरवर व्यापार करत आहे. देशातील तेल विपणन कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर जाहीर केले आहेत. भारतात दररोज सकाळी 6 वाजता इंधनाच्या किमती सुधारल्या जातात. जून 2017 पूर्वी दर 15 दिवसांनी किमतीत सुधारणा केली जात होती. वाचा सविस्तर
लोकसभेसाठी ठाकरे गटाकडून आजपासून बैठका, मुंबई-गोवा महामार्गासाठी मनसेचा निर्धार मेळावा; आज दिवसभरात...
आज दिवसभरात महत्त्वाच्या घडामोडी घडणार आहेत. सामाजिक, राजकीय वर्तुळात महत्त्वाच्या घडामोडी होणार आहेत. आज, पारशी नववर्षाचा पहिला दिवस आहे. हा दिवस नवरोझ म्हणून देखील ओळखला जातो. पारशी समाजाचं नवं वर्ष ही नव्या पारशी वर्षाची/ कॅलेंडरची सुरूवात असते. अग्यारी या त्यांच्या धार्मिकस्थळाला भेट देऊन ते प्रार्थना करतात. देशाचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचा आज स्मृतीदिन आहे. वाचा सविस्तर
वृषभ, कुंभसह 'या' राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस आव्हानात्मक; जाणून घ्या सर्व राशींचं आजचं राशीभविष्य
आज बुधवार हा एक महत्त्वाचा दिवस आहे. आज मिथुन राशीचे लोक कुटुंबीयांबरोबर वेळ घालवतील. कुंभ राशील जोडीदाराचा पूर्ण पाठिंबा मिळेल. मेष ते मीन राशीसाठी आजचा बुधवार कसा राहिल? काय सांगतात तुमच्या नशिबाचे भाग्यवान तारे? जाणून घ्या आजचं राशीभविष्य. वाचा सविस्तर



















