Morning Headlines 10th August: देश विदेशातील महत्त्वाच्या बातम्या एका क्लिकवर, वाचा मॉर्निंग न्यूज
देश-विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील..
देश-विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील..
मणिपूरच्या मुद्द्यावरुन राहुल गांधींचा हल्लाबोल, पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अविश्वास प्रस्तावाला उत्तर देणार
लोकसभेत आज (10 ऑगस्ट) अविश्वास प्रस्तावावर (No Confidence Motion) चर्चा होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आज अविश्वास प्रस्तावावर उत्तर देणार आहेत. मोदी सरकारविरोधातील अविश्वास प्रस्तावावर लोकसभेत 8 ऑगस्टपासून चर्चा सुरु झाली. (वाचा सविस्तर)
दिल्लीत दिलासा, तर उत्तराखंडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; वाचा हवामान विभागाचा अंदाज
देशातील अनेक राज्यांमध्ये मुसळधार पाऊस (Rain) पडतोय. त्यामुळे अनेक राज्यांमध्ये पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. हवामान विभागाच्या ताज्या अंदाजानुसार, आज आणि उद्या (10 आणि 11 ऑगस्ट रोजी) दिल्लीत विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. (वाचा सविस्तर)
टोमॅटोनंतर आता कांदाही महागणार; जाणून घ्या कधी आणि किती वाढणार
टोमॅटोबरोबर इतर भाज्यांचे दरही वाढले आहेत. इतकंच नाही तर या महिन्याच्या अखेरीस किरकोळ बाजारात कांद्याच्या किंमतीत वाढ (Onion Price Hike) होण्याची शक्यता आहे. त्यामुळे भविष्यात कांदा 30 ते 40 रूपये किलोपर्यंत जाण्याची शक्यता आहे. (वाचा सविस्तर)
सवलतीच्या दरात सरकारकडून चना डाळीची विक्री सुरु, एक किलोच्या पॅकसाठी 60 रुपये, किंमत नियंत्रणासाठी निर्णय
केंद्रीय अन्न मंत्रालयाने देशात सवलतीच्या दरात चणा डाळ (Dal) उपलब्ध करुन दिली आहे. सध्या या चणा डाळीची विक्री सुरु केली आहे. भारत सरकारनं 'भारत डाळ' या नावाने बाजारात डाळीची विक्री सुरु केलीय. 1 किलो पॅकसाठी 60 रुपये आणि 30 किलो पॅकसाठी 55 रुपये प्रति किलो याअनुदानित दराने डाळीची विक्री सुरु आहे. (वाचा सविस्तर)
डेटा प्रोटेक्शन विधेयक राज्यसभेत मंजूर, अश्विनी वैष्णव यांनी दिली माहिती
मणिपूर हिंसाचारच्या मुद्यावरून विरोधकांनी वॉकआऊट केल्यानंतर राज्यसभेत डिजीटल पर्सनल डेटा प्रोटेक्शन बिल 2023 हे विधेयक (The Digital Personal Data Protection Bill, 2023) मंजूर झाले. लोकसभेत सोमवारी (7 ऑगस्ट) ला विधेयक मंजूर करण्यात आले आहे. (वाचा सविस्तर)
राज्यात पेट्रोल-डिझेलचे दर काय? तुमच्या शहरातील किमती जाणून घ्या
आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या किमतींवर आधारित, पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर (Petrol Diesel Price) भारतीय तेल कंपन्या दररोज सकाळी 6 वाजता जाहीर करतात. देशात पेट्रोल-डिझेलच्या किमती एका वर्षाहून अधिक काळ स्थिर आहेत, मात्र राज्यस्तरीय करांमुळे वेगवेगळ्या शहरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींमध्ये काही किरकोळ बदल पाहायला मिळतात. (वाचा सविस्तर)
ऑपरेशन ब्लू स्टारचे नेतृत्व करणारे जनरल अरुणकुमार वैद्य यांची दहशतवाद्यांकडून हत्या; आज इतिहासात
इतिहासात आजच्या दिवशी अनेक महत्त्वाच्या घटना घडल्या. आजच्या दिवशी ऑपरेशन ब्लू स्टारचे नेतृत्व करणारे जनरल अरुणकुमार वैद्य यांची पुण्यात हत्या करण्यात आली होती. 'गान सम्राट' अशी ख्याती असणाऱ्या उस्ताद अल्लादियाँ खाँ यांचा जन्म झाला होता. (वाचा सविस्तर)
कन्या, धनु, मकर राशीच्या लोकांनी 'या' गोष्टींपासून सावध राहा; जाणून घ्या सर्व 12 राशींचं आजचं राशीभविष्य
आज गुरुवार हा महत्त्वाचा दिवस आहे. ग्रहांच्या चालीनुसार आजचा दिवस वृषभ राशीच्या लोकांसाठी खास असेल, तर कर्क राशीच्या लोकांना नोकरीत नवीन जबाबदारी मिळू शकते. एकूणच मेष ते मीन राशीसाठी आजचा गुरुवार नेमका कसा असेल? काय सांगतात तुमच्या नशिबाचे भाग्यवान तारे? जाणून घ्या आजचं राशीभविष्य. (वाचा सविस्तर)