एक्स्प्लोर

Horoscope Today 10 August 2023 : कन्या, धनु, मकर राशीच्या लोकांनी 'या' गोष्टींपासून सावध राहा; जाणून घ्या सर्व 12 राशींचं आजचं राशीभविष्य

Horoscope Today 10 August 2023 : आजचा दिवस कोणत्या राशींसाठी शुभ असणार आहे? मेष ते मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस कसा असेल? राशीभविष्य जाणून घ्या.

Horoscope Today 10 August 2023 : आज गुरुवार हा महत्त्वाचा दिवस आहे. ग्रहांच्या चालीनुसार आजचा दिवस वृषभ राशीच्या लोकांसाठी खास असेल, तर कर्क राशीच्या लोकांना नोकरीत नवीन जबाबदारी मिळू शकते. एकूणच मेष ते मीन राशीसाठी आजचा गुरुवार नेमका कसा असेल? काय सांगतात तुमच्या नशिबाचे भाग्यवान तारे? जाणून घ्या आजचं राशीभविष्य.

मेष

मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला जाणार आहे. तुम्ही तुमच्या भविष्यासाठी काही योजना आखल्या असतील तर त्या पूर्ण होण्याच्या मार्गावर आहेत. आजचा दिवस व्यावसायिकांसाठी चांगला राहील. नवीन व्यवसायात तुम्हाला नफा मिळेल. जर तुम्हाला व्यवसायात भागीदारी करायची असेल तर तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून खूप फायदा होईल. तुमचा जोडीदार तुम्हाला प्रत्येक क्षेत्रात प्रत्येक अडचणीत साथ देईल. तुमची प्रकृती ठीक राहील. तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या आरोग्याच्या समस्येचा सामना करावा लागणार नाही, त्यामुळे तुमचे मन खूप आनंदी असेल. नोकरदार लोकांना नोकरीत मोठ्या अधिकार्‍यांकडून सन्मान मिळेल. 

वृषभ 

वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस संमिश्र राहील. जर तुम्ही व्यवसायात एखादे नवीन काम सुरू करण्याचा विचार करत असाल, तर तुमचा निर्णय काही काळ पुढे ढकला, अन्यथा तुमचे नुकसान होऊ शकते. तुम्हाला आर्थिक संकटाचाही सामना करावा लागू शकतो. आज तुमचा तुमच्या कुटुंबातील सदस्यांबरोबर मोठा वाद होऊ शकतो. हा वाद टाळण्याचा प्रयत्न करा. रागावर नियंत्रण ठेवा. नोकरदारांना आज नोकरीत नवीन संधी मिळतील. त्यामुळे तुमची पदोन्नतीही होऊ शकते. तुम्ही कोणत्याही संकटात अडकलात तर तुम्हाला तुमच्या मित्रांची पूर्ण साथ मिळेल. कुटुंबासमवेत धार्मिक यात्रेला जाण्याचा योग आहे.  

मिथुन

मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला राहील. आज तुमच्या आरोग्याची काळजी घ्या. तुमचे आरोग्य बिघडू शकते. त्यामुळे दिवसभर थकवा जाणवू शकतो. तुमचे मन अस्वस्थ होऊ शकते. व्यावसायिकांना नवीन काम सुरू करायचे असेल, तर आजचा निर्णय पुढे ढकला, अन्यथा तुम्हाला आर्थिक नुकसान सहन करावे लागू शकते.  वाहन चालवताना काळजी घ्या. आज तुम्हाला तुमच्या मुलाच्या करिअर संदर्भात काही चांगली बातमी ऐकायला मिळू शकते. धार्मिक कार्यात मन गुंतवा. 

कर्क

कर्क राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस काहीसा त्रासदायक असेल. तुमच्या कुटुंबातील सदस्यांचे वर्तन तुमच्याप्रती आज काहीसे कठोर असेल. तुमच्या जवळच्या व्यक्तीच्या वागण्यामुळे तुमचे मन खूप अस्वस्थ असेल. आजचा दिवस व्यावसायिकांसाठी त्रासदायक असेल. तुमच्या व्यवसायात मोठा अडथळा येऊ शकतो. त्यामुळे तुमच्या व्यवसायात नुकसान होऊ शकते. जोडीदाराबरोबर आजचा दिवस चांगला जाईल. व्यस्त दिवसातून थोडा वेळ स्वत:साठी काढा. 

सिंह 

सिंह राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला राहील. कुटुंबात किंवा नातेवाईकांमध्ये तुमचा आदर वाढेल. तुम्हाला नोकरीत प्रगतीची संधी मिळेल. तुमच्या कामावर वरिष्ठ अधिकारी खुश असतील. आज संध्याकाळचा वेळ मित्रांबरोबर किंवा धार्मिक कार्यासाठी घालवा. तुम्हाला प्रसन्न वाटेल. आज पैसे थोडे जास्त खर्च केले जाऊ शकतात. तुम्हाला आर्थिक अडचणींचाही सामना करावा लागू शकतो. तुमच्या जोडीदाराकडून तुम्हाला पूर्ण सहकार्य मिळेल. विद्यार्थ्यांना शैक्षणिक बाबतीत चांगली संधी आहे. नवीन काही शिकण्याची संधी निर्माण होईल. 

कन्या 

कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस संमिश्र राहील. आज तुमच्या व्यवसायात तुम्हाला चढ-उताराचा सामना करावा लागू शकतो. तुम्ही तुमच्या तब्येतीने त्रस्त असाल, तुमची प्रकृती बिघडू शकते. यासाठी चांगल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि औषध वेळेवर घ्या. जर तुम्हाला व्यवसाय वाढवण्याचा कोणताही निर्णय घ्यायचा असेल तर तुम्ही तो काळजीपूर्वक घ्या, अन्यथा तुम्हाला काही अडचणींना सामोरे जावे लागू शकते आणि तुमचा व्यवसाय तोट्यात जाऊ शकतो. तुमच्या कुटुंबात वादविवादाची परिस्थिती निर्माण होईल. त्यामुळे तुम्ही अस्वस्थ राहाल. तुमच्या बोलण्यावर नियंत्रण ठेवा. तुम्हाला तुमच्या जोडीदाराचा पूर्ण पाठिंबा मिळेल.  

तूळ

तूळ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस तुमच्यासाठी आनंददायी असणार आहे. तुमचा व्यवसाय पुढे नेण्यासाठी तुम्ही करत असलेले प्रयत्न यशस्वी होतील. तुमचे मित्रही तुमच्या व्यवसायात पैसे खर्च करतील. आज तुम्हाला एखाद्या ओळखीच्या व्यक्तीच्या मदतीने नवीन संपर्क मिळतील, ज्यातून तुम्ही नफा कमवू शकाल. तुमची आर्थिक स्थिती चांगली राहील. आज तुम्ही तुमची रखडलेली कामेही पूर्ण करू शकाल. जर तुम्ही कोणाकडून पैसे घेतले असतील तर तेही तुम्ही परत कराल. तुम्ही केलेल्या कामामुळे सर्वजण खूप खूश होतील. नवीन वाहनाचा आनंदही मिळेल. घर, फ्लॅट घेण्याचा तुमचा जो विचार होता तो पूर्ण होताना दिसेल. सासरच्या मंडळींकडून काही चांगली बातमी ऐकायला मिळेल. शैक्षणिक क्षेत्रात यश मिळेल. 

वृश्चिक

वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस तुमच्यासाठी संमिश्र असणार आहे. सामाजिक क्षेत्रातून तुम्हाला लाभ मिळेल. तुमचे मित्र तुम्हाला कोणत्याही नवीन व्यवसायात पूर्ण मदत करतील. जे भागीदारीमध्ये व्यवसाय करतात, त्यांनाही भरपूर नफा मिळेल. पूर्वी केलेल्या गुंतवणुकीचा तुम्हाला पूर्ण फायदा मिळेल. जे लोक घरापासून दूर काम करत आहेत, त्यांना आपल्या कुटुंबाची आठवण येईल. कौटुंबिक जीवनात सुख-शांती राहील. कुटुंबातील सदस्यांसह धार्मिक स्थळांना भेट देण्याची योजना आखा. तुम्ही केलेल्या कामामुळे वरिष्ठ सदस्य खूप खूश होतील. आज तुम्ही तुमच्या व्यस्त दिवसातून थोडा वेळ स्वतःसाठी काढा, ज्यामध्ये तुम्ही तुमचे आवडते काम करा. तुमचे छंद जोपासा. 

धनु

धनु राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस तुमच्यासाठी संमिश्र आणि फलदायी असणार आहे. आज तुम्ही वरिष्ठ सदस्यांबरोबर थोडा वेळ घालवा आणि पैसे कसे वाचवायचे ते शिकून घ्या. जेणेकरून भविष्यात कोणतीही अडचण येणार नाही. कौटुंबिक जीवनात शांतता आणि आनंद राहील, परंतु नातेवाईकांच्या हस्तक्षेपामुळे तुमच्या नात्यात दुरावा निर्माण होऊ शकतो. कामाच्या ठिकाणी कामाचा ताण जास्त असेल परंतु सर्व कामे वेळेवर पूर्ण करू शकाल. नोकरीतही तुमच्या बदलीची शक्यता वर्तवली जात आहे. पैसे येण्याचीही चिन्हे आहेत. आज कोणाच्याही सांगण्यावरून कोणतीही गुंतवणूक करू नका, अन्यथा तुम्हाला नुकसान सहन करावे लागू शकते. 

मकर

मकर राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस तुमच्यासाठी आनंदाने भरलेला असणार आहे. जे बेरोजगार आहेत, त्यांना चांगला रोजगार मिळण्याची चिन्हे आहेत. नोकरदार लोकांना नोकरीत बढतीची संधी मिळेल. अविवाहितांच्या लग्नाच्या प्रस्तावावर शिक्कामोर्तब होईल. वरिष्ठांकडून काही जबाबदाऱ्या तुमच्यावर सोपवण्यात येतील, ज्या तुम्ही निश्चितपणे पार पाडणं गरजेचं आहे. मित्रांचे पूर्ण सहकार्य मिळेल. व्यवसाय करणाऱ्या लोकांना नवीन करार मिळतील. तुमची आर्थिक स्थिती चांगली राहील. तुम्ही तुमच्या दैनंदिन दिनचर्येत मॉर्निंग वॉक, योग आणि ध्यान यांचा समावेश करा. घरात नवीन पाहुण्यांचे आगमन होईल, त्यामुळे कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. उद्या तुम्ही तुमची रखडलेली कामे मित्राच्या मदतीने पूर्ण करू शकाल.  

कुंभ

कुंभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस तुमच्यासाठी आनंददायी असणार आहे. नोकरदारांना दिलेली कामे वेळेवर पूर्ण करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. आज तुम्हाला काही अधिकाऱ्यांकडून चांगली बातमी ऐकायला मिळेल. घरोघरी शुभ कार्यक्रमाचे आयोजन केले जाईल. आज दूरच्या नातेवाईकांकडून चांगली बातमी ऐकायला मिळेल. तुम्हाला शिक्षकांचे पूर्ण सहकार्य मिळेल. विद्यार्थी एका शहरातून दुसऱ्या शहरात शिक्षणासाठी जाऊ शकतात. घरबसल्या ऑनलाईन काम करणाऱ्या लोकांना आज खूप फायदा होईल. राजकारणात यशाचे संकेत आहेत. 
 
मीन

मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला आहे. आज तुम्हाला प्रत्येक क्षेत्रातून चांगली बातमी ऐकायला मिळेल. तुमची रखडलेली कामे पूर्ण करण्यात तुम्ही यशस्वी व्हाल. जर तुम्ही एखाद्याला पैसे दिले असतील तर ते तुम्हाला उद्या परत मिळतील. घर, फ्लॅट, दुकान खरेदी करण्याची तुमची इच्छा लवकरच पूर्ण होईल. मुलांचे पूर्ण सहकार्य मिळेल. मुलांकडून तुमचा आदर वाढेल. नोकरीत प्रगतीची संधी मिळाल्याने नोकरदार लोक खूप आनंदी दिसतील. मित्रांच्या मदतीने तुम्हाला नवीन संपर्क मिळतील. वडिलोपार्जित संपत्तीतून आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे. आज तुम्ही तुमचा काही वेळ धार्मिक कार्यक्रमात घालवा, ज्यामुळे तुमच्या मनाला शांती मिळेल. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

महत्त्वाच्या बातम्या :

Horoscope Today 09 August 2023 : कर्क, कन्या धनुसह 'या' राशीच्या लोकांना मिळणार आर्थिक लाभाची संधी; वाचा सर्व 12 राशींचं आजचं राशीभविष्य

महत्त्वाच्या बातम्या

Weekly Horoscope : कुंभ आणि मीन राशींसाठी ऑगस्टचे पुढचे 7 दिवस कसे असतील? नोकरी, व्यवसाय आणि करिअरला मिळणार गती? साप्ताहिक राशीभविष्य
कुंभ आणि मीन राशींसाठी ऑगस्टचे पुढचे 7 दिवस कसे असतील? नोकरी, व्यवसाय आणि करिअरला मिळणार गती? साप्ताहिक राशीभविष्य
Weekly Horoscope : धनु आणि मकर राशींसाठी नवीन आठवडा ठरणार गेमचेंजर; धनलाभाचे मिळतील संकेत, साप्ताहिक राशीभविष्य
धनु आणि मकर राशींसाठी नवीन आठवडा ठरणार गेमचेंजर; धनलाभाचे मिळतील संकेत, साप्ताहिक राशीभविष्य
Weekly Horoscope : तूळ आणि वृश्चिक राशीसाठी ऑगस्टचा नवा आठवडा ठरणार भाग्यशाली! देवी लक्ष्मीची असणार कृपा; वाचा साप्ताहिक राशीभविष्य
तूळ आणि वृश्चिक राशीसाठी ऑगस्टचा नवा आठवडा ठरणार भाग्यशाली! देवी लक्ष्मीची असणार कृपा; वाचा साप्ताहिक राशीभविष्य
Raksha Bandhan 2026 : रक्षाबंधनच्या दिवशी चुकूनही 'या' 7 चुका करु नका; अन्यथा नात्यात येईल कायमचा दुरावा, वाचा नियम
रक्षाबंधनच्या दिवशी चुकूनही 'या' 7 चुका करु नका; अन्यथा नात्यात येईल कायमचा दुरावा, वाचा नियम

व्हिडीओ

Chhatrapati Sambhajinagar News: मुलगा आणि वडिलांमध्ये नेमका वाद काय होता, तपासातून कारण काय समोर आलं?; DCP नवले यांनी A टू Z सांगितलं!
Rahul Gandhi Pune : राहुल गांधींच्या कार्यक्रमासाठी जोरदार तयारी, बाराशे पोलिस तैनात
Mahabaleshwar Tourist News: धुक्यात हरवलं महाबळेश्वर; सह्याद्रीच्या हिरवाईने पर्यटकांना घातली भुरळ
Abhijeet Dipke On School : शाळेत धडक, नियम किती कडक? | Special Report ABP Majha
Prithviraj Chavan On NCP : पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, तापली राजकीय हवा | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
बाजारात साखर महागली, भाव कडाडले; कृषीमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, शेतकऱ्यांना फायदा होईल
बाजारात साखर महागली, भाव कडाडले; कृषीमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, शेतकऱ्यांना फायदा होईल
Video: पुण्यात छात्रों की गूंज, नेहा म्हणाली, मला सगळे शिव्या देतात; राहुल गांधींनी सांगितला स्वत:चा अनुभव
Video: पुण्यात छात्रों की गूंज, नेहा म्हणाली, मला सगळे शिव्या देतात; राहुल गांधींनी सांगितला स्वत:चा अनुभव
Rahul Gandhi: ही गोष्ट निशाची नाही, सर्व आदिवासी विद्यार्थ्यांची, संपूर्ण देशाची महाराष्ट्राची, राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीनं अडचणींचा पाढा वाचला 
आदिवासी विकास विभागाचे मंत्री म्हणतात आय एम सॉरी, निशानं राहुल गांधींसमोर धडाधड समस्या मांडल्या
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 ऑगस्ट 2026 | शनिवार
मुंबईतून संभाजीनगरला आलो, पण ती डिफेंडर माझी नाही; बंडू जाधव म्हणाले, माझं कुणाला बघवणा झालंय
मुंबईतून संभाजीनगरला आलो, पण ती डिफेंडर माझी नाही; बंडू जाधव म्हणाले, माझं कुणाला बघवणा झालंय
भाजपवाला दिसला की कॉलर पकडायची अन्...; बारामतीतून संजय राऊतांचा हल्लाबोल, रामरक्षा आंदोलनात गोंधळ
भाजपवाला दिसला की कॉलर पकडायची अन्...; बारामतीतून संजय राऊतांचा हल्लाबोल, रामरक्षा आंदोलनात गोंधळ
पाकिस्तानाने पाकव्याप्त काश्मीरात रिपोर्टिंग करणाऱ्या पत्रकाराला थेट दहशतवादी यादीत टाकलं! कोणत्याही खटल्याशिवाय कारवाई, बँक खाती सील अन् प्रवासावर सुद्धा बंदी
पाकिस्तानाने पाकव्याप्त काश्मीरात रिपोर्टिंग करणाऱ्या पत्रकाराला थेट दहशतवादी यादीत टाकलं! कोणत्याही खटल्याशिवाय कारवाई, बँक खाती सील अन् प्रवासावर सुद्धा बंदी
तुम्हाला धमकावलं जाईल, घाबरवलं जाईल, पण...; काँग्रेस नेत्यांसोबत बैठक, पुण्यात राहुल गांधींकडून कानमंत्र
तुम्हाला धमकावलं जाईल, घाबरवलं जाईल, पण...; काँग्रेस नेत्यांसोबत बैठक, पुण्यात राहुल गांधींकडून कानमंत्र
Embed widget