देश विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील


व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या दरात 171.50 रुपयांनी कपात


तेल विपणन कंपन्यांनी मोठा दिलासा दिला आहे. व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या दरात कपात करण्यात आली आहे.  कंपन्यांनी 1 मे म्हणजेच आजपासून 19 किलो व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या किमती 171.50 रुपयांनी कमी केल्या आहेत. त्यामुळे आजपासून देशाची राजधानी दिल्लीत 19 किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलेंडरची किंमत 1856.50 रुपये झाली आहे. तर आर्थिक राजधानी मुंबईत 19 किलोच्या एलपीजी सिलेंडरसाठी 1808.50. रुपये मोजावे लागणार आहे. दरम्यान घरगुती एलपीजी सिलेंडरच्या दरात मात्र कोणताही बदल झालेला नाही. वाचा सविस्तर


पेट्रोल-डिझेलचे दरही बदलले? झटपट चेक करा आजच्या किमती


आंतरराष्ट्रीय बाजारात, WTI क्रूड 0.52 डॉलर म्हणजेच, 0.68 टक्क्यांनी घसरून प्रति बॅरल 76.26 डॉलरवर व्यापार करत आहे. तसेच, ब्रेंट क्रूड 0.53 डॉलर म्हणजेच, 0.66 टक्क्यांनी खाली 79.80 डॉलरवर व्यवहार करत आहे. देशातील तेल विपणन कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर जाहीर केले आहेत. भारतात दररोज सकाळी 6 वाजता इंधनाच्या नव्या किमती जाहीर केल्या जातात. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात आज म्हणजेच, 1 मे रोजी कोणताही बदल झालेला नाही. देशातील 16 राज्यांमध्ये पेट्रोलचे दर 100 रुपयांच्या वर आहेत. वाचा सविस्तर


एलपीजी सिलेंडर स्वस्त, जीएसटीच्या नियमांतही बदल; आज 1 मेपासून बदलले 'हे' 5 नियम


आजपासून नवा महिना म्हणजेच, मे महिना सुरु झाला आहे. प्रत्येक महिन्याच्या सुरुवातीला जसे काही बदल होतात, तसेच काही बदल आजही पाहायला मिळत आहे. आज 1 मे 2023 रोजी देशात अनेक महत्त्वाचे बदल झाले आहेत. एलपीजीच्या दरात कपात करण्यात आली आहे. वस्तू आणि सेवा कर ते म्युच्युअल फंडाशी संबंधित नियमांमधील बदल आजपासून लागू होणार आहेत. या अशा गोष्टी आहेत ज्यांचा थेट संबंध तुमच्या दैनंदिन जीवनाशी होत आहे, जाणून घेऊयात 1 मे पासून होणार्‍या पाच मोठ्या बदलांबद्दल... वाचा सविस्तर


महाविकास आघाडीची तिसरी वज्रमूठ सभा आज मुंबईत


आज 1 मे... महाराष्ट्र दिन. आजच्याच दिवशी महाविकास आघाडीची मुंबईत वज्रमूठ सभा पार पडणार आहे. मुंबईत वांद्रे येथील बीकेसी ग्राऊंडवर महाविकास आघाडीची भव्य वज्रमूठ सभा पार पडणार आहे. यासाठी जय्यत तयारी सुरु असून आतापर्यंत अनेक प्रमुख नेत्यांनी सभेच्या तयारीचा आढावाही घेतला आहे. तसेच, पोलिसांकडूनही सभास्थळी सुरक्षेची पाहणी करण्यात आली आहे. राज्यभरात महाविकास आघाडीकडून वज्रमूठ सभांचा धडाका सुरु आहे. छत्रपती संभाजीनगर, नागपूरनंतर आज 1 मे रोजी महाराष्ट्र दिनी महाविकास आघाडीची मुंबईत सभा होणार आहे. वाचा सविस्तर


भिवंडी इमारत दुर्घटनेत मृतांचा आकडा वाढला; आतापर्यंत 8 जणांचा मृत्यू


भिवंडीतील वळपाडा परिसरात तीन मजली इमारत कोसळून मोठी दुर्घटना घडली. आतापर्यंत या घटनेत 8 जणांचा मृत्यू झाला आहे. तर ढिगाऱ्याखील अडकलेल्या 10 जणांना वाचवण्यात NDRF च्या पथकाला यश आलं आहे. आतापर्यंत 18 जणांना बाहेर काढलं आहे. सध्या NDRF कडून शेवटची चाचपणी सुरु आहे. दरम्यान, मृतांच्या नातेवाईकांना राज्य सरकारकडून 5 लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे. तसेच मुख्यमंत्री शिंदेंनी रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस केली आहे. इमारत दुर्घटनेप्रकरणी इमारत मालक इंद्रपाल पाटीलला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून सदर प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाचा सविस्तर


...म्हणून मी राजीनामा देत नाही; कुस्तीपटूंच्या आरोपांवर बृजभूषण यांच स्पष्टीकरण


भारतीय कुस्ती महासंघाचे (WFI) अध्यक्ष आणि भाजपचे खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांच्याविरोधात अनेक गंभीर आरोप करत कुस्तीपटूंचं आठवडाभरापासून दिल्लीतील जंतरमंतरवर धरणं आंदोलन सुरु आहे. बृजभूषण सिंह यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, अशी आंदोलक कुस्तीपटूंची मागणी आहे. या सर्व मुद्द्यावर बृजभूषण शरण सिंह यांनी एबीपी न्यूजशी खास बातचीत केली आहे. यावेळी त्यांनी आपली बाजूही मांडली आहे. राजीनामा देण्याच्या मुद्द्यावर बोलताना बृजभूषण सिंह म्हणाले की, "मी राजीनामा देत नाही कारण या लोकांनी माझ्यावर लैंगिक छळाचे आरोप केले आहेत आणि मी गुन्हेगार म्हणून कसा जगू?" यासोबतच या लोकांनी कधीही राजीनामा मागितला नाही, असंही ते म्हणाले. वाचा सविस्तर


पुढील पाच दिवस देशात वादळी पावसाची शक्यता, उत्तर भारतात गारपिटीचा इशारा


देशातील वातावरण सातत्यानं बदल  होत आहे. कुठे उन्हाचा चटका जाणवत आहे, तर कुठे अवकाळी पाऊस कोसळत आहे. याचा शेती पिकांना मोठा फटका बसत आहे. दरम्यान, हवामान विभागाने पुढच्या पाच दिवसांत देशाच्या अनेक भागात  मेघगर्जनेसह पाऊस पडण्याचा इशारा दिला आहे. पुढील पाच दिवसात मध्य भारतात ढगांच्या गडगडाटासह आणि वादळी वाऱ्यासह हलका ते मध्यम पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. वाचा सविस्तर


ठाकरे गटाचे खंदे कार्यकर्ते शिंदेंच्या शिवसेनेत; अनिल देसाई एकनाथ शिंदेंच्या गळाला


उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार आणि सचिव अनिल देसाई यांचे निकटवर्तीय, आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची संघटना आणि प्रशासकीय कामाची इत्यंभूत माहिती असलेले माहीतगार मारुती साळुंखे यांनी आज शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा या निवासस्थानी हा पक्षप्रवेश पार पडला. मुख्यमंत्र्यांनी हातात भगवा झेंडा देत साळुंखे यांचे पक्षात स्वागत केलं. वाचा सविस्तर