Petrol-Diesel Price Today, 1st May: आंतरराष्ट्रीय बाजारात, WTI क्रूड 0.52 डॉलर म्हणजेच, 0.68 टक्क्यांनी घसरून प्रति बॅरल 76.26 डॉलरवर व्यापार करत आहे. तसेच, ब्रेंट क्रूड (Brent Crude Price) 0.53 डॉलर म्हणजेच, 0.66 टक्क्यांनी खाली 79.80 डॉलरवर व्यवहार करत आहे. देशातील तेल विपणन कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर जाहीर केले आहेत. भारतात दररोज सकाळी 6 वाजता इंधनाच्या नव्या किमती जाहीर केल्या जातात. 


पेट्रोल (Petrol) आणि डिझेलच्या (Diesel) दरात आज म्हणजेच, 1 मे रोजी कोणताही बदल झालेला नाही. देशातील 16 राज्यांमध्ये पेट्रोलचे दर 100 रुपयांच्या वर आहेत. इंडियन ऑइल कॉर्पोरेशन (IOCL) ची अधिकृत वेबसाईट iocl.com च्या नव्या अपडेट्सनुसार, आजही देशाची राजधानी दिल्लीत एक लिटर पेट्रोलची किंमत 96.72 रुपये आणि एक लिटर डिझेलची किंमत 89.62 रुपये आहे. देशाची आर्थिक राजधानी मुंबईत पेट्रोल 106.31 रुपये प्रति लिटर तर डिझेल 94.27 रुपये प्रति लिटरनं विकलं जात आहे. चेन्नईमध्ये एक लिटर पेट्रोलची किंमत 102.63 रुपये आणि डिझेलची किंमत 94.24 रुपये प्रति लिटर आहे. तसेच, कोलकातामध्ये पेट्रोलचा दर 106.03 रुपये आणि डिझेलचा दर 92.76 रुपये प्रति लिटर आहे. याशिवाय  राज्य स्तरावर पेट्रोलवर लावण्यात आलेल्या करामुळे वेगवेगळ्या शहरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीही भिन्न असतात.


IOCL नुसार, देशातील सर्वात स्वस्त पेट्रोल आणि डिझेल पोर्ट ब्लेअरमध्ये विकलं जात आहे. जिथे पेट्रोल 84.10 रुपये आणि डिझेल 79.74 रुपये प्रति लिटर आहे. तर सर्वात महाग इंधन राजस्थानच्या श्रीगंगानगरमध्ये विकलं जातंय. श्रीगंगानगरमध्ये एक लिटर पेट्रोलचा दर 113.30 रुपये प्रति लिटर, तर डिझेलचा दर 98.07 रुपये प्रति लिटरवर पोहोचलाय.


देशात मे 2022 नंतर किंमतींमध्ये कोणताही बदल नाही


शेवटच्या वेळी पेट्रोल-डिझेलचे दर मे 2022 मध्ये बदलले होते. त्यानंतर पेट्रोलवर 8 रुपये आणि डिझेलवर 6 रुपये उत्पादन शुल्क कमी करण्यात आलं. त्यामुळे पेट्रोल आणि डिझेलचे दर अनुक्रमे 9.5 आणि 7 रुपयांनी कमी झाले आहेत. जुलै 2022 मध्ये, महाराष्ट्र सरकारनं पेट्रोल आणि डिझेलवरील व्हॅटमध्ये 5 आणि 3 रुपये प्रति लिटर कपात केली होती. त्यानंतर महाराष्ट्रातील दर आणखी घटले होते. 


देशातील मोठ्या शहरांतील पेट्रोल-डिझेलच्या किमती 



  • नवी दिल्ली : पेट्रोल 96.72 रुपये आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर 

  • मुंबई : पेट्रोल 106.31 रुपये आणि डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर 

  • चेन्नई : पेट्रोल 102.63 रुपये आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर 

  • कोलकाता : पेट्रोल 106.03 रुपये आणि डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर 


तुमच्या शहरातील पेट्रोल-डिझेलची किंमत SMSद्वारे चेक करा 


तुमच्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलचे दर तुम्हाला एसएमएसद्वारे दररोज कळू शकतात. यासाठी इंडियन ऑइलच्या (IOCL) ग्राहकांना RSP कोड 9224992249 या क्रमांकावर पाठवावा लागेल. तुमच्या शहराचा RSP कोड जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.