एक्स्प्लोर
पापं वाढल्यानेच मंदिरांचं उत्पन्न वाढलं : चंद्राबाबू नायडू

विजयवाडा : आंध्र प्रदेशच्या मंदिरांमधील वार्षिक उत्पन्नात 27 टक्क्यांनी वाढ झाली आहे. मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी याबाबत बोलताना सांगितले की, “पापं वाढल्याने आणि लोकांच्या समस्या वाढल्याने मंदिरांचे उत्पन्न वाढले आहे.” जिल्हाधिकाऱ्यांच्या दोन दिवसीय संमेलनातील भाषणात ते बोलत होते. चंद्रीबाबू म्हणाले, “लोक पाप करत आहेत आणि त्यापासून मुक्ती मिळवण्यासाठी मंदिरात जात आहेत, प्रार्थना करत आहेत. ज्याप्रकारे समस्या वाढत आहेत आणि पाप वाढत आहेत, त्याच प्रमाणात लोकांची मंदिरातील संख्या वाढत आहे. हेच वास्तव आहे.” “केवळ मंदिरंच नव्हे, लोक चर्च आणि मशिदींमध्येही जात आहेत. जर मंदिर, मशीद आणि चर्च नसते, तर लोक वेडे झाले असते.” असेही चंद्राबाबू म्हणाले. “दारुविक्रीमध्ये घट झाल्याने राज्याच्या उत्त्पन्नातही घट झाली आहे. अनेकजण सबरीमालाच्या अय्यपा स्वामी मंदिरमधून दीक्षा घेतल्यानंतर 40 दिवस दारु सोडतात. यादरम्यान, दारु व्यवसायावर परिणाम होतो आणि विक्री कमी होते”, असेही चंद्राबाबू थट्टेत म्हणाले.
Before You Go
Nashik Operation Tiger Special Report : ठाकरेंच्या नगरसेवकांना ऑफर? नाशिकमध्ये एकीची वज्रमूठ






















