एक्स्प्लोर

आला रे आला...! येत्या 24 तासांत मान्सून केरळात, तर 10 जूनपर्यंत महाराष्ट्र व्यापणार; मान्सूनसाठी पोषक वातावरण तयार

Monsoon Latest News Updates: अंगाची लाहीलाही करणाऱ्या उन्हानं सर्वचजण त्रासले आहेत. आता प्रत्येकजण चातकाप्रमाणे मान्सूनची वाट पाहत आहे. याबाबत आता हवामान खात्यानं (IMD) चांगली बातमी दिली आहे.

Monsoon Updates: नवी दिल्ली : येत्या 24 तासांत मान्सून (Monsoon News Updates) केरळमध्ये (Kerala) दाखल होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने (Department of Meteorology) व्यक्त केलाय. गेल्या काही दिवसांपासून मोसमी वाऱ्याचा वेग काहीसा मंदावला होता. आता मान्सूनच्या (Monsoon) प्रगतीला पोषक वातावरण तयार होत असून, आता मोसमी वारे हळूहळू आगेकूच करीत आहेत. त्यामुळे येत्या 24 तासांत मोसमी वारे केरळमध्ये दाखल होतील, असे हवामान विभागाने म्हटले आहे.केरळसह दक्षिण अरबी समुद्र, मालदिवचा उर्वरित भाग, लक्षद्वीपचा उर्वरित भाग, ईशान्य आणि आग्नेय बंगालच्या उपसागरात नैऋत्य मोसमी वारे आगेकूच करतील, असंही हवामान विभागाकडून सांगण्यात येतंय. तसंच येत्या 10 जूनपर्यंत मान्सून राज्यात येणार असल्याचंही सांगण्यात येत आहे.  

अंगाची लाहीलाही करणाऱ्या उन्हानं सर्वचजण त्रासले आहेत. आता प्रत्येकजण चातकाप्रमाणे मान्सूनची वाट पाहत आहे. याबाबत आता हवामान खात्यानं (IMD) चांगली बातमी दिली आहे. येत्या 24 तासांत कधीही मान्सून भारतीय सीमेत प्रवेश करू शकतो, आयएमडीनुसार, पुढील 24 तासांत केरळमध्ये मान्सूनच्या आगमनासाठी परिस्थिती अनुकूल राहील.  

यावेळी केरळमध्ये वेळेआधी मान्सून दाखल झाला आहे. राज्यात मान्सूनची सामान्य तारीख 1 जून आहे. दरम्यान, 3-4 दिवस पुढे किंवा मागे असणं देखील सामान्य मानलं जातं. हवामान खात्यानुसार, यावेळी मान्सून केरळमध्ये 30 मे किंवा 1 मे रोजी दाखल होऊ शकतो. यानंतर राज्यात जोरदार पाऊस कोसळणार आहे. मात्र, केरळला मान्सून दाखल होण्याआधीच मुसळधार पावसाचा सामना करावा लागत आहे.   

केरळमधील मान्सूनपूर्व पावसाचे लवकरच मान्सूनच्या पावसात रूपांतर होईल, असं आयएमडीनं म्हटलं होतं. हवामान खात्यानं (IMD) आज कोट्टायम आणि एर्नाकुलम जिल्ह्यांत रेड अलर्ट तर इतर तीन जिल्ह्यांत ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून राज्यातील अनेक भागांत मुसळधार पाऊस सुरू आहे. नैऋत्य मान्सून साधारणपणे 1 जूनच्या सुमारास केरळमध्ये दाखल होतो. साधारणपणे ते एका लाटेसह उत्तरेकडे सरकते आणि 15 जुलैच्या आसपास संपूर्ण देश व्यापते. याआधी 22 मे रोजी मान्सून अंदमान निकोबारमध्ये दाखल झाला होता. या वेळी मान्सून नेहमीपेक्षा 3 दिवस आधी म्हणजे 19 मे रोजी अंदमानमध्ये दाखल झाला.

दरम्यान, हवामान खात्यानं दिलेल्या माहितीनुसार, देशात अल नीनोचा प्रभाव कमी झाला आहे. तर ला नीना सक्रीय झालं आहे. यामुळे यंदा पाऊस मुबलक प्रमाणात होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळेच यंदा मान्सूननं वेळेपूर्वीच भारतात दाखल झाला आहे. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Maharashtra Superfast News : महाराष्ट्र सुपरफास्ट बातम्यांचा आढावा : 10 PM 26 Sept 2024ABP Majha Headlines : 10 PM: 26 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स9 Second News : 9 सेकंदात बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट न्यूज : 26 Sept 2024 : ABP MajhaABP Majha Headlines : 09 PM: 26 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Beed: गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
Harshvardhan Patil: हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
मनोज जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील जोडप्याचे टोकाचे पाऊल, विष पित आत्महत्येचा प्रयत्न
मनोज जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील जोडप्याचे टोकाचे पाऊल, विष पित आत्महत्येचा प्रयत्न
Embed widget