एक्स्प्लोर

Lightning Alert App : पावसाळ्यात वीज पडण्याच्या 15 मिनिटापूर्वी 'या' ॲपवरून माहिती मिळणार

Lightning Strikes : तुमच्या आजूबाजूला वीज पडणार असल्यास त्याची माहिती तुम्हाला 15 मिनिटापूर्वी मिळून जाते. 

Jalna News : मान्सुन कालावधीत विशेषत: जुन व जुलै या महिन्यात वीज पडून (Lightning Strikes) जिवीत हानी होत असते. वीज पडून जीवीत हानी होऊ नये यासाठी प्रतिबंधात्मक उपयायोजना म्हणून भारत सरकारच्या पृथ्वी मंत्रालय यांनी दामिनी ॲप तयार केले आहे. हे ॲप गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध आहे. विशेष म्हणजे वीज पडण्याच्या 15 मिनिटापूर्वी या ॲपमध्ये स्थिती दर्शविण्यात येते. त्यामुळे तुमच्या आजूबाजूला वीज पडणार असल्यास त्याची माहिती तुम्हाला 15 मिनिटापूर्वी मिळून जाते. 

दामिनी ॲप जीपीएस लोकेशनने काम करीत असून, वीज पडण्याच्या 15 मिनिटापूर्वी या ॲपमध्ये स्थिती दर्शविण्यात येते. आपल्या ॲपमध्ये आपल्या सभोवताली वीज पडत असल्यास त्या ठिकाणापासुन सुरक्षीत स्थळी जावे, तसेच त्यावेळी झाडाचा आश्रय घेऊ नये. त्यामुळे हे ॲप सामान्य नागरिकांना  डाऊनलोड करण्यास प्रवृत्त करावे याबाबतच्या सूचना उपविभागीय अधिकारी, तहसिलदार, गटविकास अधिकारी मुख्याधिकारी यांनी आपल्या स्तरावरुन निर्गमित करण्याचा सूचना जालना जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत. तसेच दामिनी ॲप प्ले स्टोअरवरुन डाऊनलोड करण्याचे व वापरण्याबाबत माहिती द्यावी व त्याबाबतच्या अहवाल जिल्हा प्रशासनास सादर करण्याच्या सूचना देखील देण्यात आल्या आहेत. 

सुरक्षात्मक उपययोजना म्हणून तालुक्यातील सर्व शासकीय यंत्रणा, शासकीय अधिकारी-कर्मचारी, नागरीक क्षेत्रीय अधिकारी, मंडळ अधिकारी अव्वल कारकुन, महसुल सहायक, गांव स्तरावरील सरपंच, पोलीस पाटील, तलाठी, ग्रामसेवक, कृषीसेवक, कोतवाल, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, आरोग्य सेवक, ग्रामपंचायत डाटा एंट्री ऑपरेटर यांनी हे ॲप डाऊनलोड करावे, असेही आदेश जालना जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आले आहे.  तर गावातील सर्व स्थानिक शासकीय अधिकार-कर्मचारी यांना हे ॲप डाऊनलोड करुन त्यामध्ये प्राप्त होणाऱ्या अलर्ट नुसार आवश्यक पुर्वसूचना गावातील सर्व नागरीकांना देऊन होणारी जीवितहानी टाळण्याच्या अनुषंगाने कार्यवाही करावी, असे निर्देश निवासी उपजिल्हाधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी (जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण) केशव नेटके यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिले आहेत.  

जीवितहानी टाळता येईल...

गेल्या काही दिवसात झालेल्या अवकाळी पावसावेळी वीज पडून अनेकांचा जीव गेला आहे. विशेष म्हणजे मान्सुन कालावधीत जुन व जुलै या महिन्यात वीज पडून जिवीत हानी होण्याच्या घटना अधिक घडतात. मात्र दामिनी ॲप डाऊनलोड केल्यावर तुम्ही असलेल्या परिसरात वीज पडणार असल्यास याची माहिती 15 मिनिटापूर्वी तुम्हाला मिळून जाते. त्यामुळे तुम्हाला सुरक्षित ठिकाणी जाता येते. यामुळे जीवितहानी टाळता येऊ शकते. 

इतर महत्वाच्या बातम्या: 

BMC : पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्तांनी घेतला आढावा, केल्या 'या' महत्त्वपूर्ण सूचना

महत्त्वाच्या बातम्या

कालच रुग्णालयातून डिस्चार्ज, आज पुन्हा मनोज जरांगे पाटलांची तब्बेत बिघडली, उपचार सुरु, नेमका त्रास काय? 
कालच रुग्णालयातून डिस्चार्ज, आज पुन्हा मनोज जरांगे पाटलांची तब्बेत बिघडली, उपचार सुरु, नेमका त्रास काय? 
Navnath Waghmare controversial statement: मराठा समाजाच्या महिलांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य, ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंवर पोलिसांकडून गुन्हा दाखल
मराठा समाजाच्या महिलांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य, ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंवर पोलिसांकडून गुन्हा दाखल
Uday Samant and Eknath Shinde: उदय सामंतांना उपमुख्यमंत्री व्हायचंय, एकनाथ शिंदेंना टार्गेट करण्यासाठी त्यांनीच मनोज जरांगेला सुपारी दिलेय; नवनाथ वाघमारेंचा सनसनाटी आरोप
उदय सामंतांना उपमुख्यमंत्री व्हायचंय, एकनाथ शिंदेंना टार्गेट करण्यासाठी त्यांनीच मनोज जरांगेला सुपारी दिलेय; नवनाथ वाघमारेंचा सनसनाटी आरोप
Manoj Jarange Patil: 28 ऑगस्टच्या आत सर्व मागण्या पूर्ण करा, अन्यथा 29 ऑगस्टनंतर सरकारची जिरवणार; मनोज जरांगेंचा थेट इशारा
28 ऑगस्टच्या आत सर्व मागण्या पूर्ण करा, अन्यथा 29 ऑगस्टनंतर सरकारची जिरवणार; मनोज जरांगेंचा थेट इशारा

व्हिडीओ

Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल
Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Video: कॉल करून बोलवलं, आलिशान कार चालवत स्वत: आली अन् सोशल मीडिया स्टारला धडाधड गोळ्या घातल्या; कार थेट रस्त्यावरून नाल्यात, CCTV फुटेज समोर
Video: कॉल करून बोलवलं, आलिशान कार चालवत स्वत: आली अन् सोशल मीडिया स्टारला धडाधड गोळ्या घातल्या; कार थेट रस्त्यावरून नाल्यात, CCTV फुटेज समोर
गुण पाहता घोटाळ्याचा संशय, परीक्षेतील निकालावर आक्षेप; MMRDA चं अधिकृत निवेदन, उमेदवारांना महत्त्वाची सूचना
गुण पाहता घोटाळ्याचा संशय, परीक्षेतील निकालावर आक्षेप; MMRDA चं अधिकृत निवेदन, उमेदवारांना महत्त्वाची सूचना
Pune Junnar Crime news: मुलीवर अत्याचार करुन गावकऱ्यांसोबत सीसीटीव्ही फुटेज पाहता बसला, चुकून स्वत:चीच ओळख पटवून दिली
मुलीवर अत्याचार करुन गावकऱ्यांसोबत सीसीटीव्ही फुटेज पाहता बसला, चुकून स्वत:चीच ओळख पटवून दिली
Bihar RJD Protest: विद्यार्थी आंदोलनात पोलिसांनी AK-47 का चालवली? आदेश नेमका कोणी दिला?? विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ बिहारमध्ये राजदचा राजभवनावर मोर्चा, तेजस्वी यादव रस्त्यावर, आंदोलकांनी बॅरिकेड्स तोडले
विद्यार्थी आंदोलनात पोलिसांनी AK-47 का चालवली? आदेश नेमका कोणी दिला?? विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ बिहारमध्ये राजदचा राजभवनावर मोर्चा, तेजस्वी यादव रस्त्यावर, आंदोलकांनी बॅरिकेड्स तोडले
Govinda: गोविंदाची पत्नी लेकासोबत फॅमिली कोर्टात पोहोचली; कॅमेऱ्यासमोर बेधडक बोलणारी सुनीता एकदम शांत दिसली, पण कारमध्ये बसताना संताप अनावर अन् म्हणाली..
Video: गोविंदाची पत्नी लेकासोबत फॅमिली कोर्टात पोहोचली; कॅमेऱ्यासमोर बेधडक बोलणारी सुनीता एकदम शांत दिसली, पण कारमध्ये बसताना संताप अनावर अन् म्हणाली..
मोठी बातमी! आम्हाला मिळत नसेल तर 'शिवसेना पक्ष आणि चिन्ह' गोठवा; ठाकरेंचे वकील कपिल सिब्बलांची न्यायालयात महत्त्वाची मागणी
मोठी बातमी! आम्हाला मिळत नसेल तर 'शिवसेना पक्ष आणि चिन्ह' गोठवा; ठाकरेंचे वकील कपिल सिब्बलांची न्यायालयात महत्त्वाची मागणी
Pune Junnar Crime News : पिंपळवंडीतील चिमुकलीसोबत नेमकं काय घडलं अन् नराधमाचं बिंग कसं फुटलं? वाचा स्टार्ट टू एंड घटनाक्रम
पिंपळवंडीतील चिमुकलीसोबत नेमकं काय घडलं अन् नराधमाचं बिंग कसं फुटलं? वाचा स्टार्ट टू एंड घटनाक्रम
Rain Update: अल-निनोचं संकट कायम, सप्टेंबर महिन्यातही पावसाचा जोर नाहीच; हवामान विभागाने दिली महत्त्वाची माहिती
अल-निनोचं संकट कायम, सप्टेंबर महिन्यातही पावसाचा जोर नाहीच; हवामान विभागाने दिली महत्त्वाची माहिती
Embed widget