एक्स्प्लोर
Advertisement
आला रे! मान्सून अंदमानात दाखल
मान्सून दक्षिण अंदमानात दाखल झाला आहे. लवकरच तो केरळकडे वाटचाल करेल.
मुंबई: हवामान विभागाने बळीराजासह सर्वांना गुड न्यूज दिली आहे. मान्सून दक्षिण अंदमानात दाखल झाला आहे. लवकरच तो केरळकडे वाटचाल करेल. केरळात दाखल झाल्यानंतर तो लवकरच कोकणमार्गे संपूर्ण महाराष्ट्रात प्रवेश करेल.
गेल्या वर्षी 30 मे रोजी मान्सून केरळात दाखल झाला होता. यंदा तो त्यापूर्वीच येणार आहे.
यानंतर पुढील काही तासात मान्सूनची वाटचाल दक्षिण अरबी समुद्र, मालदीव-लक्षद्विप बेटांचा परिसर, तामिळनाडूचा काही भाग आणि बंगालच्या उपसागर परिसरात दाखल होईल.
यंदा सरासरीच्या 97 टक्के पाऊस, IMD ची गुड न्यूज!
यंदा सरासरी पाऊस राहील, असा अंदाज आयएमडीने वर्तवला आहे. यंदा सरासरीच्या 97 टक्के पाऊस पडेल, असं भाकीत आयएमडीने वर्तवलं. गेल्या वर्षी आयएमडीने 96 मिलीमीटर पाऊस पडेल असा अंदाज वर्तवला होता. त्याप्रमाणे पाऊस 95 टक्के पडला.
स्कायमेटचा अंदाज काय?
यंदा देशभरात समाधानकारक मान्सून राहील, असा पहिला अंदाज स्कायमेटने वर्तवला आहे. सध्याची परिस्थिती, समुद्राचं तापमान, वाऱ्याची गती यावरुन हा अंदाज स्कायमेटने वर्तवला आहे. यंदा सरासरीच्या 100% पाऊस पडेल, असं स्कायमेटने म्हटलं आहे. महाराष्ट्रात तर उत्तम पाऊसमान असेल, असं स्कायमेटने नमूद केलं आहे.
यंदा चांगला पाऊस पडणार, स्कायमेटची गुड न्यूज!
पोषक हवामान
मान्सूनसाठी अंदमानाच्या दक्षिण भागात पोषक हवामान तयार झालं होतं. त्यामुळे येत्या 48 तासात कधीही मान्सून अंदमानात दाखल होऊ शकतो, असा अंदाज भारतीय हवामान विभागानं दिला होता.
साधारणपणे 20 मेपर्यंत मान्सून अंदमानात दाखल होत असतो. यंदा पोषक हवामान तयार न झाल्यानं हवामान विभागानं 23 मेपर्यंत तो अंदमानात येण्याचा अंदाज वर्तविला होता. परंतु उशिरानं पोषक हवामान तयार झाल्यानं मान्सून येण्यास विलंब झाला.
दरम्यान, मुंबईत येत्या 6 किंवा 7 जूनला मान्सून दाखल होईल. असा अंदाज स्कायमेटनं यापूर्वीच व्यक्त केला आहे.
यंदा पाऊसमान कसं असेल?
भारतीय हवामान विभागाने (आयएमडी) पाऊस सामान्य राहील, अशी शक्यता व्यक्त केली होती. यंदा पाऊसमान कमी राहण्याची शक्यता कमीच असल्याचं आयएमडीने म्हटलं आहे. पावसाचं प्रमाण सामान्य राहण्याची शक्यता साधारणत: 42 टक्के असेल, असं हवामान खात्याने म्हटलं आहे. तर पावसाचं प्रमाण सरासरीपेक्षा जास्त असण्याची शक्यता 12 टक्के असेल, असा हवामान खात्याचा अंदाज आहे.
मान्सून महाराष्ट्रात कधी?
मान्सून केरळात दाखल झाल्यानंतर पुढील 24 तासात त्याची वाटचाल दक्षिण अरबी समुद्र, मालदीव-लक्षद्विप बेटांचा परिसर, केरळचा बराच परिसर, तामिळनाडूचा काही भाग आणि बंगालची खाडीचा परिसरात होते. केरळमध्ये मान्सून दाखल झाल्यानंतर महाराष्ट्रात 2 ते 3 जून रोजी पूर्व मोसमी पाऊस होण्याचा अंदाज गेल्यावर्षी वर्तवण्यात आला होता. त्यामुळे यावर्षी मान्सून राज्यात कधी दाखल होतो, ते पाहणं महत्त्वाचं असेल.
सरासरी पाऊस म्हणजे किती?
887.5 मिमी पाऊस सरासरी मानला जातो, त्याच्या 19 टक्के कमीअधिक पाऊस पडला तरी तो सरासरी इतका मानला जातो.
गेल्या वर्षी सरासरीच्या 106 टक्के म्हणजे सरासरीच्या जास्त पाऊस पडेल, असा IMD चा पहिला अंदाज होता.
देशभरात 862 मिमी पाऊस पडला, जो सरासरीच्या 3 टक्के कमी होता. तरी त्याला तांत्रिकदृष्ट्या सरासरीच मानलं गेलं.
संबंधित बातम्या
मान्सून आणि पूर्व मान्सून कसा ओळखाल?
राजा गादीवर कायम, पाऊस सर्वसाधारण, भेंडवळची भविष्यवाणी
यंदा सरासरीच्या 97 टक्के पाऊस, IMD ची गुड न्यूज!
यंदा चांगला पाऊस पडणार, स्कायमेटची गुड न्यूज!
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नाशिक
व्यापार-उद्योग
फॅक्ट चेक
क्रीडा
Advertisement