एक्स्प्लोर

CAA Protests : तब्बल 10 दिवसांनी आसाममधील इंटरनेट सेवा सुरू, कायद्याला विरोध मात्र कायम

आसाममधील बंद असलेली इंटरनेट सेवा पुन्हा सुरू करण्यात आली आहे. तब्बल 10 दिवसांनी आसाममध्ये इंटरनेट सेवा सुरू करण्यात आली आहे.

गुवाहाटी : नागरिकत्व दुरूस्ती कायद्याविरोधात आंदोलंनामुळे आसामध्ये बंद असलेली इंटरनेट सेवा सुरू करण्यात आली आहे. आसाममध्ये मागील 10 दिवसांपासून इंटरनेट बंद करण्यात आलं होतं. काल गुवाहाटी उच्चन्यायालयाने आसाम सरकारला राज्यात इंटरनेट सेवा सुरू करण्याचे आदेश दिले होते. आज सकाळी 9 वाजता आसाममध्ये इंटरनेट सेवा सुरू करण्यात आली आहे. नागरिकत्व दुरूस्ती विधेयकाचं कायद्यामध्ये रूपांतर झाल्यापासूनच आसाममध्ये आंदोलनं सुरू होती. वाढता विरोध पाहून 11 डिसेंबरपासून राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये इंटरनेट सेवा बंद करण्यात आली होती. त्यानंतर संपूर्ण आसाममध्येच इंटरनेट सेवा बंद केली होती. याबाबत बोलताना एअरटेलच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले की, आम्हाला इंटरनेट बंद ठेवण्याचे कोणतेच नवीन आदेश मिळाले नाहीत. त्यामुळे आम्ही सकाळी 9 वाजता इंटरनेट सेवा सुरू केली. याआधी राज्य सरकारने सांगितलं होतं की, मोबाईल इंटरनेट सेवा शुक्रवारी सुरू करण्यात येईल. परंतु, उच्च न्यायालयाने बुधवारीच इंटरनेट सेवा सुरू करण्याचे आदेश दिले होते. पाहा व्हिडीओ : नागरिकता संशोधन कायदा भारताच्या कुठल्याही नागरिकाला लागू होत नाही : रविशंकर प्रसाद न्यायमूर्ती मनोजित भूइया आणि न्यायमूर्ती सौमित्र सैकिया यांच्या खंडपीठाने पत्रकार अजित कुमार भुइया आणि वकिल बोनोश्री गोगोई, रणदीप शर्मा आणि देबकांता डोलेय यांच्या मार्फत दाखल करण्यात आलेल्या चार जनहित याचिकांवर सुनावणी केली. त्यावेळी राज्य सरकारला इंटरनेट सेवा सुरू करण्याचे आदेश दिले होते. दरम्यान, आसाममध्ये अजूनही नागरिकत्व दुरूस्ती कायद्याविरोधात आंदोलंन सुरू असून इंटरनेट सेवा मात्र सुरू केली गेली आहे. नागरिकत्व दुरूस्ती कायद्याविरोधात आंदोलनाने हिंसक वळण घेतल्यानंतर 11 डिसेंबर रोजी मोबाईल इंटरनेट आणि एसएमएस सेवा बंद केल्या होत्या. संबंधित बातम्या :  CAA Protests : दिल्ली पोलिसांसाठी आजचा दिवस आव्हानात्मक, विविध भागातून 40 हून अधिक मोर्चे निघण्याची शक्यता : गुप्तचर विभाग पाकिस्तानातून आलेल्या मुस्लीम महिलेला गुजरात सरकारकडून भारतीय नागरिकत्व बहाल

महत्त्वाच्या बातम्या

सणांपूर्वीच घरघुती बजेट कोलमडलं! 53 टक्के कुटुंब आर्थिक संकटात, सर्वेक्षणातून धक्कादायक माहिती समोर 
सणांपूर्वीच घरघुती बजेट कोलमडलं! 53 टक्के कुटुंब आर्थिक संकटात, सर्वेक्षणातून धक्कादायक माहिती समोर 
Video: अभिजित दिपकेंच्या गंभीर आरोपानंतर दिल्ली पोलिसांकडून 100 सेकंदाचा लाव रे तो व्हिडिओ; दिपकेंचा सुद्धा पलटवार, म्हणाले तो भाग तुम्ही डिलीट का केला? ट्विट वाॅर रंगलं
Video: अभिजित दिपकेंच्या गंभीर आरोपानंतर दिल्ली पोलिसांकडून 100 सेकंदाचा लाव रे तो व्हिडिओ; दिपकेंचा सुद्धा पलटवार, म्हणाले तो भाग तुम्ही डिलीट का केला? ट्विट वाॅर रंगलं
थोड्याच महिन्यात सत्ता बदलणार, आमच्या मातीसाठी, संविधानासाठी लढत राहणार, आदित्य ठाकरेंचा एल्गार
थोड्याच महिन्यात सत्ता बदलणार, आमच्या मातीसाठी, संविधानासाठी लढत राहणार, आदित्य ठाकरेंचा एल्गार
लखपती होण्यास गेला, 1 लाख रुपयांना गंडा बसला! जुन्या नोटांच्या बदल्यात 17 लाख देण्याचं अमिष, शेतकऱ्याची फसवणूक
लखपती होण्यास गेला, 1 लाख रुपयांना गंडा बसला! जुन्या नोटांच्या बदल्यात 17 लाख देण्याचं अमिष, शेतकऱ्याची फसवणूक

व्हिडीओ

Majha Katta Dr. Abhijit Joshi : जेवण कसं जेवावं?नियम काय? आयुर्वेदात काय? डॉ.अभिजीत जोशी माझा कट्टावर | ABP Majha
Sanjay Raut PC : मोदी सरकार 6-7 महिन्यात दिसणार नाही, राऊतांचा मोठा दावा
Mann Suddha Tujha Season 3 : मंत्रचळ | मन सुद्ध तुझं | Episode 2 ABP Majha
Shetitil Navdurga : Sunita Raite : शिलाईच्या सुईपासून अवजार बँकेपर्यंत स्वावलंबनाचा प्रवास!
Maharashtra Drought Central Team : नुकसान आतोनात, कधी मदतीचा हात? केंद्रीय पथकासमोर मांडल्या व्यथा | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rohit Pawar on MPSC Protest : विद्यार्थ्यांच्या एकजुटीचा विजय, तुकाराम मुंडे समितीत आले, काही जागा वाढवून मिळाल्या, 14 अतिरिक्त मागण्या मान्य, आंदोलन स्थगित झाल्यानंतर रोहित पवार नेमकं काय म्हणाले?
विद्यार्थ्यांच्या एकजुटीचा विजय, तुकाराम मुंडे समितीत आले, काही जागा वाढवून मिळाल्या, 14 अतिरिक्त मागण्या मान्य, आंदोलन स्थगित झाल्यानंतर रोहित पवार नेमकं काय म्हणाले?
Vivekanand Patil and Navnath Ban: नवनाथ बन.... आम्ही गाढवं नाही, वाघ आहोत वाघ, आम्ही शिकार केलेय! विवेकानंद पाटलांनी खेळाचा शेवट केला
नवनाथ बन.... आम्ही गाढवं नाही, वाघ आहोत वाघ, आम्ही शिकार केलेय! विवेकानंद पाटलांनी खेळाचा शेवट केला
Amravati Politics : बंडखोरांविरोधात भाजपची मोठी कारवाई, अमरावतीत 3 बंडखोरांचं निष्कासन; चंद्रशेखर भोयर, संगीता शिंदेंसह सुमीत पवार 6 वर्षांसाठी निलंबित, बडे नेतेही रडारवर
बंडखोरांविरोधात भाजपची मोठी कारवाई, अमरावतीत 3 बंडखोरांचं निष्कासन; चंद्रशेखर भोयर, संगीता शिंदेंसह सुमीत पवार 6 वर्षांसाठी निलंबित, बडे नेतेही रडारवर
Rohit Pawar MPSC Protest Pune: आंदोलन मागे घेण्याबाबत रोहित पवार आग्रही, पण विद्यार्थी ऐकेनात, आंदोलनस्थळी पेच; मध्यरात्री 1.24 वाजता काय घडलं?
आंदोलन मागे घेण्याबाबत रोहित पवार आग्रही, पण विद्यार्थी ऐकेनात, आंदोलनस्थळी पेच; मध्यरात्री 1.24 वाजता काय घडलं?
Vivekanand Patil MPSC Protest Pune: आता MPSCचा अभ्यास करणार की राजकारणात येणार? विवेकानंद पाटलांचं सूचक उत्तर ऐकून चर्चांना उधाण
आता MPSCचा अभ्यास करणार की राजकारणात येणार? विवेकानंद पाटलांचं सूचक उत्तर ऐकून चर्चांना उधाण
Vivek Bhimanwar MPSC Protest Pune: 12 दिवस आंदोलन, अखेर सक्तीच्या रजेवर...; MPSC अध्यक्ष विवेक भीमनवार यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
12 दिवस आंदोलन, अखेर सक्तीच्या रजेवर...; MPSC अध्यक्ष विवेक भीमनवार यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
Chief Justice of India Surya Kant: इंडिया आघाडीचा मोर्चा सुप्रीम कोर्टावर धडकणार, सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी इंडिया आघाडीच्या नेत्यांची भेटीची विनंती फेटाळून लावली
इंडिया आघाडीचा मोर्चा सुप्रीम कोर्टावर धडकणार, सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी इंडिया आघाडीच्या नेत्यांची भेटीची विनंती फेटाळून लावली
'माझा कमी अभ्यास असल्याने भारती विद्यापीठात शिकलो नाही, मी गरीबासारखा साताऱ्यात शिकलो त्यामुळे..' एमपीएससी आंदोलनातून शिवेंदराजेंचा विश्वजित कदमांना अप्रत्यक्ष टोला
'माझा कमी अभ्यास असल्याने भारती विद्यापीठात शिकलो नाही, मी गरीबासारखा साताऱ्यात शिकलो त्यामुळे..' एमपीएससी आंदोलनातून शिवेंदराजेंचा विश्वजित कदमांना अप्रत्यक्ष टोला
Embed widget