कॅन्टोन्मेंट भागातून प्रवास करताना आता वाहनांना फी नाही; केंद्र सरकारचा मोठा निर्णय
Cantonments Boards to stop collecting entry fees : देशभरातील कॅन्टोन्मेंट भागातून प्रवास करताना चारचाकी वाहनांना द्यावी लागणारी फी रद्द करण्याचा निर्णय केंद्रीय संरक्षण मंत्रालयाने घेतला आहे.
![कॅन्टोन्मेंट भागातून प्रवास करताना आता वाहनांना फी नाही; केंद्र सरकारचा मोठा निर्णय Ministry of Defense has asked all cantonments Boards to stop collecting entry fees कॅन्टोन्मेंट भागातून प्रवास करताना आता वाहनांना फी नाही; केंद्र सरकारचा मोठा निर्णय](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/01/10/c9e1aad22a10fbf8d8630b260ac8cca9_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
नवी दिल्ली : संरक्षण मंत्रालयाचा सर्वसामान्य वाहनधारकांना दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. देशभरातील कॅन्टोन्मेंट भागातून प्रवास करताना चारचाकी वाहनांना द्यावी लागणारी फी रद्द करण्याचा (Ministry of Defense says cantonments to stop collecting entry fees ) निर्णय केंद्रीय संरक्षण मंत्रालयाने घेतला आहे. आगामी उत्तर प्रदेश, उत्तराखंड आणि पंजाब मधील विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आल्याचं बोललं जातं आहे.
देशात वेगवेगळ्या भागात एकूण 62 कॅन्टोन्मेंट असून त्यातील बहुतांश कॅन्टोन्मेंट हे उत्तर प्रदेश, उत्तराखंड आणि पंजाबमधे आहेत. या कॅन्टोन्मेंटमधील रस्त्यांवर प्रवास करणाऱ्या वाहनांकडून वसूल केला जाणारा टोल हा अनेकदा वादाचा विषय बनतो.
पुण्यात पुणे कॅन्टोन्मेंट, खडकी कॅन्टोन्मेंट आणि देहूरोड कॅन्टोन्मेंट अशी तीन कॅन्टोन्मेंट असून देहूरोड आणि खडकी कॅन्टोन्मेंटमधील रस्त्यांवर प्रवास करताना द्यावा लागणारा टोल आजपासून द्यावा लागणार नाही. मात्र पुणे कॅन्टोन्मेंट रोड टॅक्सच्या नावाखाली वाहन चालकांकडून पैसै गोळा करत असल्याने पुणे कॅन्टोन्मेंटमधून प्रवास करणाऱ्या वाहनांना तूर्तास तरी या टोलमधून सूट मिळणार नाही.
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha
महत्त्वाच्या इतर बातम्या :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)