एक्स्प्लोर
हैदराबादमध्ये पकडलेल्या ISIS च्या संशयितांना ओवेसींकडून कायदेशीर मदत
नवी दिल्ली/हैदराबाद : हैदराबादमध्ये बुधवारी 29 जूनला पकडलेल्या आयसिसच्या पाच संशयितांना कोर्टाने 12 दिवसांची एनआयए कोठडी सुनावली आहे. मात्र आता त्यावरुन राजकारणाला सुरुवात झाली आहे.
MIM चे प्रमुख खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी आता या संशयित आरोपींना कायदेशीर मदत करणार असल्याचं म्हटलं आहे.
"ज्या तरुणांना राष्ट्रीय तपास यंत्रणा अर्थात एनआयएने संशयित म्हणून अटक केली आहे, त्यांच्या कुटुंबीयांनी मात्र हे आरोप फेटाळले आहेत. हे सर्व तरुण निर्दोश असल्याचा दावा कुटुंबीयांचा आहे", असं ओवेसींनी म्हटलं आहे.
इतकंच नाही तर ओवेसींनी एनआयएवरच गंभीर आरोप केले आहेत. एनआयएच्या रिमांड रिपोर्टमध्ये कुठेच अटक केलेल्या तरुणांनी मंदिरात गोमांस फेकल्याचा कट रचल्याचा उल्लेख नाही, असं ओवेसींनी नमूद केलं.
दुसरीकडे पंतप्रधान मोदींनी गुप्तचर यंत्रणेच्या माहितीनंतर सुरक्षा रक्षकांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे. मोदींनी गृहमंत्री आणि उच्चपदस्थ अधिकाऱ्यांमार्फत बैठक घेऊन देशाच्या सुरक्षेचा आढावा घेतला.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
क्राईम
रायगड
जळगाव
Advertisement