एक्स्प्लोर
देसाईंची मराठीत, राणेंची हिंदीत, तर केतकरांची इंग्रजीत शपथ
संसदेत आज राज्यसभेच्या नवनिर्वाचित खासदारांचा शपथविधी सोहळा पार पडला.

नवी दिल्ली: संसदेत आज राज्यसभेच्या नवनिर्वाचित खासदारांचा शपथविधी सोहळा पार पडला. 16 राज्यातून एकूण 58 नवे खासदार राज्यसभेवर निवडून आले आहेत. त्यामध्ये महाराष्ट्राच्या 6 खासदारांचा समावेश आहे. या सर्वांचा शपथविधी पार पडला. महाराष्ट्रात भाजपकडून प्रकाश जावडेकर, नारायण राणे, व्ही मुरलीधरन, काँग्रेसकडून कुमार केतकर, राष्ट्रवादीकडून वंदना चव्हाण आणि शिवसेनेकडून अनिल देसाई राज्यसभेवर बिनविरोध निवडून गेले आहेत. या सर्वांचा शपथविधी आज पार पडला. राष्ट्रवादीच्या वंदना चव्हाण, शिवसेनेचे अनिल देसाई यांनी मराठीत खासदारकीची शपथ घेतली. तर प्रकाश जावडेकर, नारायण राणे यांनी हिंदीतून तर कुमार केतकर यांनी इंग्रजीमधून शपथ घेतली. “राज्यसभेच्या खासदारकीने मी समाधानी आहे. विधीमंडळात 30 वर्षे काम केले. महाराष्ट्रातला माझा कोटा संपलेला होता, त्यामुळे दिल्लीत आलो. महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचं 2019 मध्ये काय करायचं यावर चर्चा करून निर्णय घेऊ. गडचिरोली आणि दिल्लीत फरक आहे, दिल्ली ही शिक्षेची जागा नाही”, अशी प्रतिक्रिया नारायण राणे यांनी एबीपी माझाकडे दिली. संबंधित बातम्या
राज्यसभा निवडणूक : यूपीमध्ये भाजप 10 पैकी 9 जागांवर विजयी
आणखी वाचा























