एक्स्प्लोर

जम्मू काश्मीरला अफगाणिस्तान होऊ द्यायचा नाही, तेथील नागरिकांना विकास हवाय : युरोपियन युनियन खासदार

जम्मू-काश्मीरमधील परिस्थिती सुधारावी यासाठी केंद्र सरकार प्रयत्न करत आहे. जम्मू काश्मीरचा दौरा भारत सरकारने आयोजित केला होता, अशी माहिती युरोपियन युनियनच्या खासदारांनी दिली.

मुंबई : जम्मू काश्मीरचा अफगाणिस्तान होताना आम्हाला पाहायचं नाही, अशी जम्मू-काश्मीरच्या जनतेची भावना असल्याचं तेथील दौऱ्यावर गेलेल्या युरोपियन युनियनच्या खासदारांनी म्हटलं आहे. काश्मीरच्या जनतेला शांती आणि विकास हवा आहे. जम्मू-काश्मीरमध्ये जाऊन आम्ही तेथील परिस्थितीची पाहणी केली. काश्मीरच्या जनतेला भेटून त्यांच्या भावना जाणून घेणे आमचं उद्दिष्ट होतं.

युरोपियन युनियनच्या खासदारांनी म्हटलं की, तथ्यांची पडताळणी करण्यासाठी आम्ही विविध देशांमध्ये जातो. जम्मू काश्मीरचा दौरा भारत सरकारने आयोजित केला होता. दौऱ्यादरम्यान नागरिकांच्या सद्यस्थितीची माहिती आम्ही घेतली. काश्मीरमध्ये होत असलेल्या दहशतवादी हल्ल्यांचा निषेधही खासदारांनी केला. दहशतवाद केवळ भारताची समस्या नाही तर, आमच्या देशातही दहशतवादाची समस्या आहे. जगभरातील देश दहशतवादाचा सामना करत आहेत. मात्र दहशतवाद कोणत्याही देशाला उद्ध्वस्त करु शकत नाही. दहशतवादाविरोधी कारवाईत आम्ही भारतासोबत आहोत, असंही युरोपियन युनियनच्या खासदारांनी सांगितलं.

काश्मीरमध्ये सामन्य नागरिक आणि भारतीय जवानांशी युरोपियन युनियनच्या खासदारांनी बातचित केली. दहशतवादाविरोधात तुम्ही कशाप्रकारे लढा देता असंही खासदारांनी त्यांना विचारलं. जम्मू काश्मीरमधील नागरिकांना तेथे शांती हवी आहे. सर्व सुख-सोई मिळाव्यात, अशी माफक अपेक्षा तेथील नागरिकांची आहे, असं या खासदारांनी म्हटलं.

जम्मू-काश्मीरमधील परिस्थिती सुधारावी यासाठी केंद्र सरकार प्रयत्न करत आहे. काश्मीरमध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार आहे. केंद्रातून काश्मीरच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणावर निधी पाठवला जातो. मात्र तो पैसा लोकांपर्यंत विकासकामातून पोहचत नाही, ही मोठी समस्या असल्याचा युरोपियन युनियनच्या खासदारांनी सांगितलं. भारतातील सध्याच्या राजकारणाविषयी आम्हाला काही बोलायचं नाही. काश्मीरमधील परिस्थितीची पाहणी करण्यासाठी आम्ही येथे आलो होतो. येथील राजकारणात हस्तक्षेप करण्याचा आमचा हेतू नाही, असं या खासदारांनी स्पष्ट केलं.

महत्त्वाच्या बातम्या

Congress : जनगणनेतील ओबीसींच्या कॉलमच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, राहुल गांधींच्या उपस्थितीत बैठक, 300 जिल्हाप्रमुखांची दिल्लीत बैठक
जनगणनेत ओबीसी कॉलम नसल्याच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, दिल्लीत बैठक बोलावली, राहुल गांधी उपस्थित राहणार
Ranchi Protest : मोठी बातमी, JSSC CGL परीक्षा रद्द, हेमंत सोरेन सरकारचा निर्णय, देवेंद्र महतोंची उपोषण सोडण्याची घोषणा
JSSC CGL परीक्षा रद्द, हेमंत सोरेन सरकारचा मोठा निर्णय, देवेंद्र महतोंची उपोषण सोडण्याची घोषणा
Deepak Mhaskey Replace Amit Malviya : भाजपकडून सोशल मीडियाची जबाबदारी नव्या नेत्याकडे, अमित मालवीय यांच्या जागेवर निवड, कोण आहेत दीपक म्हस्के?
भाजपचा सोशल मीडिया छत्तीसगडचा नेता सांभाळणार, अमित मालवीय यांच्या जागी संधी, कोण आहेत दीपक म्हस्के?
BJP : भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, नितीन नवीन यांच्या टीममधील नेता नेमका कोण? 
भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, कोणत्या राज्यातील नेत्याला संधी?

व्हिडीओ

Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
Railway Stations : रेल्वे स्टेशनवरचं पाणी 'ई-कोलाय'ची कहाणी Special Report
NET Exam Paper Leak :  NET ची वाट, फेरपरीक्षेचा घाट Special Report
Celebrity vs Politicians Cricket Match Sangli: सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग
Sanjay Raut Nashik Speech : खड्डे वेळेत न बुजवल्यास पालिकेचे गेट तोडून आत घुसू! प्रशासनाला अल्टिमेटम

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Congress : जनगणनेतील ओबीसींच्या कॉलमच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, राहुल गांधींच्या उपस्थितीत बैठक, 300 जिल्हाप्रमुखांची दिल्लीत बैठक
जनगणनेत ओबीसी कॉलम नसल्याच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, दिल्लीत बैठक बोलावली, राहुल गांधी उपस्थित राहणार
Navy Nagar Case : नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
Congress : मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
Beed : फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
Deepak Mhaskey Replace Amit Malviya : भाजपकडून सोशल मीडियाची जबाबदारी नव्या नेत्याकडे, अमित मालवीय यांच्या जागेवर निवड, कोण आहेत दीपक म्हस्के?
भाजपचा सोशल मीडिया छत्तीसगडचा नेता सांभाळणार, अमित मालवीय यांच्या जागी संधी, कोण आहेत दीपक म्हस्के?
Pankaja Munde : कोणीतरी बातमी दिली, ताई रिटायर होणार; काही रिटायर होत नाही, चांगली खमकी आहे : पंकजा मुंडे
‘दोन-चार लोकांना रिटायर्ड केल्यानंतर आपण रिटायर व्हायचं, आधी नाही', पंकजा मुंडेंचं ‘रिटायरमेंट’च्या चर्चेवर थेट भाष्य
Sanjiv Goenka: संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
BJP : भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, नितीन नवीन यांच्या टीममधील नेता नेमका कोण? 
भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, कोणत्या राज्यातील नेत्याला संधी?
Embed widget