एक्स्प्लोर
खासदारांचा पगार दुपटीनं वाढण्याची शक्यता, आज समितीची बैठक
सध्या खासदारांचा पगार ५० हजार असून, मतदारसंघातील दौऱ्यासाठी ४५ हजार आणि संसदेतील विविध बैठकीसाठी २ हजार रुपये देण्यात येतात. मात्र, आता खासदारांचा पगार १ लाखापर्यंत करण्याचा सरकारचा विचार असल्याचं समजतं आहे.

नवी दिल्ली : आपल्या खासदारांची घसघशीत पगारवाढ होण्याची शक्यता आहे. कारण, पगारवाढीसंदर्भात नियुक्त करण्यात आलेल्या समितीची बैठक आज (शुक्रवार) नवी दिल्लीत होणार आहे. यात खासदारांचा पगार दुप्पट करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सध्या खासदारांचा पगार ५० हजार असून, मतदारसंघातील दौऱ्यासाठी ४५ हजार आणि संसदेतील विविध बैठकीसाठी २ हजार रुपये देण्यात येतात. मात्र, आता खासदारांचा पगार १ लाखापर्यंत करण्याचा सरकारचा विचार असल्याचं समजतं आहे. भाजपचे खासदार बंडारु दत्तात्रय यांच्या अध्यक्षतेखालील १५ सदस्यीय समिती यासंदर्भात दुसऱ्यांदा बैठक घेणार आहे. दरम्यान, जुलै २०१५ मध्ये योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखालील समितीने हा निर्णय घेतला होता. मात्र सरकारने अंमलात आणला नव्हता.
आणखी वाचा























