Meerut Snake Bite Case : बायकोनं बॉयफ्रेंडच्या मदतीनं नवऱ्याचा अंथरुणात गळा दाबला; मृतदेहाखाली हजार रुपयाचा साप विकत आणून ठेवला, तब्बल 10 वेळा निष्प्राण देहाला चावला
Meerut Snake Bite Case : पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये अमितचा मृत्यू गुदमरल्यामुळे झाल्याचे उघड झाले. संशयाच्या आधारे पोलिसांनी प्रथम पत्नीला ताब्यात घेतले. चौकशीत तिने तिच्या प्रियकराचे नाव सांगितले.

Meerut Snake Bite Case : मर्चंट नेव्ही ऑफिसर सौरभच्या हत्येनं (Meerut Case) अवघा देश हादरला असताना आणखी एक भयावह घटना समोर आली आहे. पत्नीने तिच्या प्रियकरासह पती (wife kills husband in Meerut) झोपलेला असताना गळा दाबून हत्या केली आणि नंतर त्याच्या शरीराखाली साप (snake bite murder) ठेवला. गतप्राण झालेल्या तरुणाचा सापाने तब्बल दहावेळा चावा घेतला. या घटनेनंतर तिने तिच्या प्रियकराला (boyfriend involved) तेथून दूर पाठवले आणि ती दुसऱ्या खोलीत झोपायला गेली. सकाळी जेव्हा कुटुंबातील सदस्य उठले तेव्हा त्यांना दिसले की तरुणाचा मृत्यू झाला आहे. त्याच्या हाताखाली एक जिवंत साप होता.
शरीरावर साप चावण्याच्या खुणा पाहून कुटुंबीयांना वाटले की तरुणाचा मृत्यू साप चावल्याने झाला आहे. बुधवारी संध्याकाळी उशिरा पोस्टमॉर्टम रिपोर्ट समोर आला, ज्यामध्ये तरुणाचा मृत्यू गुदमरल्यामुळे झाल्याचे उघड झाले. यानंतर, संशयाच्या आधारे पोलिसांनी प्रथम पत्नीला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान तिने तिच्या प्रियकराचे नाव सांगितले. त्यानंतर पोलिसांनी दोघांचीही कडक चौकशी केली आणि त्यांनी आपला गुन्हा कबूल केला. हे प्रकरण मेरठ जिल्ह्यातील बहसुमा पोलीस स्टेशन परिसरातील अकबरपूर सादत गावचे आहे. मेरठमध्येच (crime in Uttar Pradesh) मर्चंट नेव्ही ऑफिसर सौरभच्या हत्येनं अवघा देश हादरून गेला होता. बायको मुस्कानने (India crime news) प्रियकराच्या मदतीने त्याचे तुकडे ड्रममध्ये भरले होते.
मेरठ वाली ये घटना वाक़ई बेहद खौफनाक है. ये औरत पूरे समाज पर कलंक है. इनसे अपने पति की हत्या के लिए जो कहानी बनाई, वह भयावह है.
— Priya singh (@priyarajputlive) April 17, 2025
यहां बीवी ने पति की गला दबाकर हत्या की. फिर
कत्ल के बाद लाश पर जहरीला सांप छोड़ दिया. ताकि दुनिया को लगे कि सांप काटने से अमित ( पति) की मौत हुई है.… pic.twitter.com/F581NGL0h3
अमित झोपला होता, अंथरुणात हाताजवळ साप सापडला
कुटुंबातील सदस्यांनी दिलेल्या माहितीनुसार, अमित कश्यप उर्फ मिकी (25) हा शनिवारी रात्री 10 वाजता नेहमीप्रमाणे कामावरून घरी परतला. जेवल्यानंतर झोपण्यासाठी खोलीत गेला. त्याची पत्नी आणि मुले दुसऱ्या खोलीत झोपले होते. अमित सहसा सकाळी लवकर उठायचा. जेव्हा तो उठला नाही, तेव्हा कुटुंबातील सदस्य त्याला उठवण्यासाठी त्याच्या खोलीत आले. त्याच्या शरीरात काहीच हालचाल होत नव्हती. त्याला वारंवार हाक मारूनही तो उठला नाही. जेव्हा कुटुंबातील सदस्यांनी त्याला हलवले तेव्हा त्यांना त्याच्या शरीराखाली एक साप (snake used as weapon) आढळला. यावर कुटुंबातील सदस्य घाबरले आणि त्यांनी ओरड सुरू केली. सापाला काढण्याचा प्रयत्नही केला, पण तो त्याच्या जागेवरून हलला नाही. यानंतर कुटुंबातील सदस्यांनी महमूदपूर शिखेडा येथील एका सर्पमित्राला बोलावले. त्याने सापाला पकडले आणि सोबत नेले.
शरीरावर साप चावण्याच्या 10 खुणा आढळल्या
कुटुंबीयांनी अमितला डॉक्टरकडे नेले, पण तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता. त्याच्या शरीरावर 10 ठिकाणी साप (10 snake bites) चावण्याच्या खुणा आढळून आल्या. हे पाहून कुटुंबाला वाटले की अमितचा मृत्यू साप चावल्याने झाला आहे. कुटुंबाकडून माहिती मिळाल्यानंतर पोहोचलेल्या पोलिसांनी तपास केल्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला.
कातिल पत्नी और जहरीला सांप!
— Manish Yadav (Journalist) (@ManishMedia9) April 17, 2025
जाने पूरी वारदात 👇
मेरठ के अमित कश्यप उर्फ मिक्की की लाश दो दिन पहले उसके घर के बेड पर मिली थी, लाश के पास एक जहरीला वाइपर सांप भी पाया गया। बताया गया कि सांप के काटने से अमित की मौत हुई है. सांप ने अमित को 10 बार डंसा था ।
पुलिस ने अमित के शव का… pic.twitter.com/2iOsAeoJLh
पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये गुदमरल्यामुळे मृत्यू
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमितचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट बुधवारी आला. अमितचा मृत्यू साप चावल्याने झाला नाही तर गुदमरल्याने झाला हे उघड झाले. यानंतर, संशयाच्या आधारे पोलिसांनी प्रथम अमितची पत्नी रविता हिला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान तिने तिच्या प्रियकर अमरदीपचे नाव सांगितले. सुरुवातीला दोघांनीही पोलिसांना दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला, परंतु कडक चौकशी केली असता दोघांनीही आपला गुन्हा कबूल केला.
अफेअर समोर येताच संपवण्याचा कट
प्रियकर अमरदीपने पोलिसांना सांगितले की, अमित आणि मी एकाच गावचे आहोत. तो माझ्यासोबत टाइल्स घालण्याचे काम करायचा. तो माझा मित्र होता. मी त्याच्या घरी अनेकदा जायचो. सुमारे एक वर्षापासून, माझे त्याची पत्नी रवितासोबत प्रेमसंबंध होते. अमितला हे कळताच आम्ही मिळून त्याला संपवण्याचा कट रचला.
एका सर्पमित्राकडून एक हजार रुपयांना साप विकत घेतला
घटनेच्या दिवशी रविता अमितसोबत सहारनपूरमध्ये माँ शकुंभरी देवीच्या दर्शनासाठी गेली होती. परत येताना त्यांनी महमूदपूर शिखेडा गावातील एका सर्पमित्राकडून एक हजार रुपयांना एक विषारी साप विकत घेतला. प्रियकर अमरदीपने सांगितले की, शाकुंभरी दर्शनावरून परतल्यानंतर रात्री अमित आणि रवितामध्ये भांडण झाले. रविताने मला हे फोनवर सांगितले. शनिवारी रात्री (12 एप्रिल) घरातले सगळे झोपले असताना रविताने मला फोन केला. आम्ही दोघांनी मिळून अमित झोपेत असताना त्याचा गळा दाबून खून केला. यानंतर सापाला बेडवर मृतदेहाखाली ठेवण्यात आले. त्याची शेपटी अमितच्या कमरेखाली दाबली गेली होती, जेणेकरून साप पळून जाऊ शकणार नाही आणि अमितच्या मृत शरीराला चावू शकेल, जेणेकरून असे दिसून येईल की मृत्यू सापाच्या चाव्यामुळे झाला आहे. घटनेनंतर मी तिथून पळून गेलो आणि रविता झोपी गेली.
8 वर्षांपूर्वी लग्न झाले होते
अमित आणि रविता यांचे लग्न आठ वर्षांपूर्वी झाले होते. रविता ही मुझफ्फरनगरची रहिवासी आहे. दोघांनाही तीन मुले आहेत, एक मुलगा आणि दोन मुली. एसएसपी डॉ. विपिन ताडा म्हणाले की, चौकशीदरम्यान दोघांनीही गळा दाबून हत्या केल्याची कबुली दिली आहे. अमितला चावणारा साप अत्यंत विषारी आहे. त्याच्या चाव्याव्दारे वाचण्याची शक्यता खूपच कमी आहे.
इतर महत्वाच्या बातम्या























