एक्स्प्लोर
दिल्ली निवडणुकीत शिवसेनेच्या 56 पैकी 55 उमेदवारांचं डिपॉझिट जप्त
नवी दिल्ली : दिल्ली महापालिका निवडणुकीत भाजपने तिसऱ्यांदा झेंडा रोवला, तर 'आप' आणि काँग्रेसचं पानिपत झालं. दिल्लीचे तख्त राखण्यासाठी रिंगणात उतरलेल्या शिवसेनेलाही मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला आहे. निवडणुकीत उतरलेल्या शिवसेनेच्या 56 पैकी 55 उमेदवारांचं डिपॉझिट जप्त झालं आहे.
दिल्ली महापालिकेच्या आखाड्यात 2 हजार 516 उमेदवार उतरले होते. यापैकी जवळपास 70 टक्के म्हणजे 1 हजार 790 उमेदवारांचं डिपॉझिट जप्त झालं आहे. यामध्ये आपच्या 40, तर काँग्रेसच्या 92 उमेदवारांचा समावेश आहे. डिपॉझिट जप्त झालेल्या उमेदवारांमध्ये भाजपच्या 5 जणांचा समावेश आहे.
रिंगणात उतरलेल्या बसपच्या 192, जदयूच्या 94, तर शिवसेनेच्या 55 उमेदवारांवर अनामत रक्कम जप्त होण्याची वेळ आली आहे.
2012 मधील दिल्ली महापालिका निवडणुकीतही 1 हजार 782 उमेदवारांचं डिपॉझिट जप्त झालं होतं, अशी माहिती दिल्लीचे निवडणूक आयुक्त एस के श्रीवास्तव यांनी दिली.
आप, काँग्रेसचा धुव्वा, भाजपचा दिल्ली महापालिकेवर तिसऱ्यांदा झेंडा
भाजपने दिल्ली महापालिकेवर तिसऱ्यांदा झेंडा फडकावला आहे. पूर्व, दक्षिण आणि उत्तर दिल्ली या तीन महापालिकांच्या 270 जागांपैकी भाजपने 185 जागांवर विजय मिळवला. तर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा ‘आप’ दुसऱ्या आणि काँग्रेस तिसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरला आहे. आपने तीन महापालिकांमध्ये मिळून 45 जागांवर विजय मिळवला. तर काँग्रेसला केवळ 29 जागांवर समाधान मानावं लागलं. सत्ताधारी आपसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. दक्षिण दिल्ली महापालिका :- भाजप-71
- काँग्रेस-12
- आप-15
- इतर-5
- एकूण – 104
- भाजप- 65
- काँग्रेस-14
- आप-21
- इतर- 3
- एकूण -103
- भाजप-49
- काँग्रेस-3
- आप-9
- इतर-2
- एकूण-63
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
नाशिक
महाराष्ट्र
पर्सनल फायनान्स
Advertisement