एक्स्प्लोर

Bhopal Fire : भोपाळमध्ये अग्नितांडव! मंत्रालयाला भीषण आग, चार मजले आगीच्या भक्ष्यस्थानी

Bhopal Fire : मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमध्ये राज्य सरकारच्या मंत्रालयाला आग लागल्याची माहिती समोर आली आहे. मंत्रालयाच्या इमारतीच्या पहिल्या, चौथ्या, पाचव्या आणि सहाव्या मजल्यावर आग लागल्याची माहिती आहे.

Bhopal Ministry Vallabh Bhavan Fire : मध्य प्रदेशची (Madhya Pradesh) राजधानी भोपाळमध्ये (Bhopal) अग्नितांडव पाहायला मिळत आहे. भोपाळमध्ये राज्य सरकारच्या मंत्रालयाला (Bhopal Ministry) आग लागल्याची माहिती समोर आली आहे. इमारतीच्या चार मजल्यापर्यंत आग पसरली आहे.  मंत्रालयाच्या इमारतीच्या पहिल्या, चौथ्या, पाचव्या आणि सहाव्या मजल्यावर आग लागल्याची प्राथमिक माहिती आहे. 

भोपाळमध्ये मंत्रालयाला भीषण आग

भोपाळमधील वल्लभ भवन राज्य सचिवालयाला शनिवारी सकाळी भीषण आग लागून मोठी दुर्घटना घडली आहे. मंत्रालयाच्या इमारतीच्या चौथ्या मजल्यापर्यंत आग पसरली आहे. अग्निशमन दलाच्या गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या असून आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.

मंत्रालयाच्या चार मजल्यांपर्यंत पसरली आग

आग नेमकी कशामुळे लागली?

भोपाळच्या सचिवालयात अचानक आग लागल्याची बातमी समोर आली आहे. 9 मार्चला सकाळी सचिवालयाच्या इमारतीतून काळ्या धुराचे लोट बाहेर पडताना दिसले. आग भीषण असल्याचा अंदाज घटनास्थळावरील व्हिडीओमध्ये दिसणाऱ्या धुरावरून लावता येतो. अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या असून आणि आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. आग नेमकी कशामुळे लागली, याचं कारण अद्याप समोर आलेलं नाही. 

मंत्रालयाच्या इमारतीतून धुराचे लोट

भोपाळमधील अरेरा हिल्सवर असलेल्या वल्लभ भवनाच्या तिसऱ्या मजल्यावर शनिवारी सकाळी आग लागली. इमारतीच्या खिडकीतून धूर निघत असल्याचे लोकांनी पाहिल्यानंतर एकच गोंधळ उडाला. तातडीने ही माहिती महापालिकेच्या अग्निशमन नियंत्रण कक्षाला देण्यात आली. यानंतर अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आणि आग विझवण्याचं काम सुरू केलं. महिन्याचा दुसरा शनिवार असल्याने मंत्रालयात कर्मचारी नव्हते. सध्या वल्लभ भवन प्रशासनाने नुकसानीची कोणतीही माहिती दिलेली नाही.

मुख्यमंत्र्यांकडून चौकशीचे आदेश

गेट क्रमांक 5 आणि 6 मधील मोठ्या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर आग लागली, ती पाचव्या मजल्यापर्यंत पसरली. आग वाऱ्यासह वेगाने पसरली. अग्निशमन दलाचे पाच जवान अडकल्याचे सांगण्यात येत आहे. इमारतीतून उठणाऱ्या ज्वाळा आणि धूर दुरूनच दिसत आहेत. या आगीत अनेक महत्त्वाची सरकारी कागदपत्रे जळून खाक होण्याची शक्यता आहे. दरम्यान, मुख्यमंत्री मोहन यादव यांनी या आगीच्या घटनेवर चिंता व्यक्त करत चौकशीचे आदेश दिले आहेत.

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Morbi Accident : मोठी बातमी! निर्माणाधीन मेडिकल कॉलेजचा स्लॅब कोसळला, 4 जण जखमी; घटनास्थळावरील धक्कादायक VIDEO समोर

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra LIVE Updates: दिल्लीत विद्यार्थ्यांचं आंदोलन, देशभरातून पाठींबा; केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याची मागणी
Maharashtra LIVE Updates: दिल्लीत विद्यार्थ्यांचं आंदोलन, देशभरातून पाठींबा; केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याची मागणी
Dharmendra Pradhan: राहुल गांधींची टीका अन् राजीनाम्याच्या मागणीवर धर्मेंद्र प्रधान यांचं प्रत्युत्तर; म्हणाले, 'सरकार नीटच्या मुद्द्यावर चर्चा करण्यास कटिबद्ध, पण काँग्रेसने....
राहुल गांधींची टीका अन् राजीनाम्याच्या मागणीवर धर्मेंद्र प्रधान यांचं प्रत्युत्तर; म्हणाले, 'सरकार नीटच्या मुद्द्यावर चर्चा करण्यास कटिबद्ध, पण काँग्रेसने....
लोकशाही मार्गाने आंदोलन करु देणार नसाल तर जगायंच कसं? विद्यार्थ्यांसाठी मनोज जरांगे पाटील मैदानात, उद्या थेट दिल्ली गाठणार
लोकशाही मार्गाने आंदोलन करु देणार नसाल तर जगायंच कसं? विद्यार्थ्यांसाठी मनोज जरांगे पाटील मैदानात, उद्या थेट दिल्ली गाठणार
Uddhav Thackeray : एका राजीनाम्यानं चालणार नाही, व्यवस्था बदलावी लागेल, सरकार बदलत नाही तोपर्यंत आयुष्य बदलणार नाही : उद्धव ठाकरे
भाषण करायला नाही युवा शक्तीला नमन करायला आलोय, उद्धव ठाकरेंच्या जंतरमंतरवरील भाषणाला जोरदार प्रतिसाद

व्हिडीओ

Dharmendra Pradhan On Rahul Gandhi:राहुल गांधींची टीका अन् राजीनाम्याच्या मागणीवर धर्मेंद्र प्रधान यांचं प्रत्युत्तर
Priyanka Gandhi On CJP Protest : पोलिसांच्या ताब्यातून सुटका, प्रियांका गांधींची पहिली प्रतिक्रिया
Raj Thackeray on Delhi : पोलिसांचा विद्यार्थ्यांवर बेछूट लाठीमार, राज ठाकरेंनी केंद्र सरकारला सुनावलं
Sandeep Deshpande:मोदींपेक्षा जास्त अहंकार अश्विनी भिडेंना; चेंबूर दुर्घटनेवरून संदीप देशपांडे भडकले
Sanjay Raut PC : 20 जुलै हा लोकशाहीतील 'डरपोक दिवस' म्हणून साजरा करा; संजय राऊत आक्रमक

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sonam wangchuk: उद्धव ठाकरे जंतरमंतरवर, राज ठाकरे आझाद मैदानात; नीट पेपरफुटीवरुन ठाकरे बंधू थेट आंदोलनात, काँग्रेसंही रस्त्यावर
उद्धव ठाकरे जंतरमंतरवर, राज ठाकरे आझाद मैदानात; नीट पेपरफुटीवरुन ठाकरे बंधू थेट आंदोलनात, काँग्रेसंही रस्त्यावर
शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी काँग्रेसचं दिल्लीत आंदोलन, राहुल गांधींसह महाराष्ट्रातील खासदारही पोलिसांच्या ताब्यात
शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी काँग्रेसचं दिल्लीत आंदोलन, राहुल गांधींसह महाराष्ट्रातील खासदारही पोलिसांच्या ताब्यात
AI तंत्रज्ञानाच्या मदतीने अंधत्वावर मात; गडचिरोली जिल्हा परिषदेचा उपक्रम, 34 विद्यार्थ्यांच्या हाती अत्याधुनिक स्मार्ट उपकरणे
AI तंत्रज्ञानाच्या मदतीने अंधत्वावर मात; गडचिरोली जिल्हा परिषदेचा उपक्रम, 34 विद्यार्थ्यांच्या हाती अत्याधुनिक स्मार्ट उपकरणे
Uddhav Thackeray : एका राजीनाम्यानं चालणार नाही, व्यवस्था बदलावी लागेल, सरकार बदलत नाही तोपर्यंत आयुष्य बदलणार नाही : उद्धव ठाकरे
भाषण करायला नाही युवा शक्तीला नमन करायला आलोय, उद्धव ठाकरेंच्या जंतरमंतरवरील भाषणाला जोरदार प्रतिसाद
Rahul Gandhi : राहुल गांधींची नीट पेपरफुटीवरील संसदेतील चर्चेची मागणी मान्य, धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर जितेंद्र सिंह नेमकं काय म्हणाले? 
राहुल गांधींची नीट पेपरफुटीवरील संसदेतील चर्चेची मागणी मान्य, धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर जितेंद्र सिंह नेमकं काय म्हणाले? 
अमरावतीतून वारी, काठी टेकत आली 80 वर्षांची आजी; कलेक्टरांनी दिलं विठ्ठलाचं VIP दर्शन, पुंडलिकाची आठवण
अमरावतीतून वारी, काठी टेकत आली 80 वर्षांची आजी; कलेक्टरांनी दिलं विठ्ठलाचं VIP दर्शन, पुंडलिकाची आठवण
दिल्लीत नरेंद्र मोदींच्या घरासमोर राडा, पोलिसांनी राहुल गांधींना उचललं; प्रियंका गांधींसह माजी मुख्यमंत्रीही ताब्यात
दिल्लीत नरेंद्र मोदींच्या घरासमोर राडा, पोलिसांनी राहुल गांधींना उचललं; प्रियंका गांधींसह माजी मुख्यमंत्रीही ताब्यात
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 21 जुलै 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 21 जुलै 2026 | मंगळवार
Embed widget