एक्स्प्लोर
कोर्टाच्या आवारातच नवऱ्याने बायकोचा गळा चिरला!
आपल्यावर मुलीच्या बलात्काराचा खोटा आरोप लावल्यानेच आपण बायकोला ठार मारल्याचं आरोपीचं म्हणणं आहे.
दिब्रुगड : आसाममधल्या दिब्रुगड येथे धक्कादायक घटना घडली. बलात्कारी नवऱ्याने कोर्टाच्या परिसरातच बायकोची गळा चिरून हत्या केली. ही घटना आसाममधील दिब्रूगड कोर्टात घडली आहे.
आपल्यावर मुलीच्या बलात्काराचा खोटा आरोप लावल्यानेच आपण बायकोला ठार मारल्याचं आरोपीचं म्हणणं आहे.
नऊ महिन्यांपूर्वी आरोपीने पोटच्या मुलीवर बलात्कार केल्याचा आरोप त्याच्या पत्नीने केला होता. या आरोपांनंतर त्याला अटक करण्यात आली. याच प्रकरणाची सुनावणी शुक्रवारी होती. आरोपीने सुनावणीदरम्यान धारदार शस्त्राने कोर्टातच आपल्या बायकोचा गळा चिरला. या घटनेनंतर बायकोला लगेचच रुग्णालयात हलवण्यात आले. परंतु, त्याचा काहीही परिणाम झाला नाही. प्रवासादरम्यानच तिचा दुर्दैवाने मृत्यू झाला. आरोपीच्या म्हणण्यानुसार त्याला या प्रकरणात मुद्दाम अडकवण्यात आले आहे. जामिनावर सुटल्यानंतरही बायकोने आपल्याला घरात घेतलं नाही. त्याचाच सूड घेण्यासाठी बायकोची हत्या केल्याचं आरोपीचं म्हणणं आहे.A man who was to be produced before #Dibrugarh District & Sessions Court on charges of raping his minor daughter, allegedly slit his wife's throat inside court premises yesterday morning. He was lodged in prison for past 6 months #Assam pic.twitter.com/TnHcyy4czU
— ANI (@ANI) June 16, 2018
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement