एक्स्प्लोर
राष्ट्रपतींच्या मुलीला अश्लिल मेसेज पाठवणारा कोण?

नवी दिल्ली: राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची मुलगी शर्मिष्ठा मुखर्जी यांना अश्लिल संदेश पाठवणाऱ्या व्यक्तीला चांगलाच धडा शिकवला आहे. पार्थ मंडल असं या व्यक्तीचं नाव असून, तो शर्मिष्ठा मुखर्जी यांना अश्लिल मेसेज पाठवत होता. शर्मिष्ठा मुखर्जी यांनी पार्थ मंडलचं फेसबूक प्रोफाईलचे आणि पाठवलेल्या मेसेजचे स्क्रीनशॉट आपल्या फेसबुक अकाऊंटवर शेअर केले आहेत. तसेच या व्यक्तीपासून सावध राहण्याचेही आवाहन केले आहे.
"पार्थ मंडल नावाचा एक विकृत माणूस मला अश्लील संदेश पाठवत आहे. पहिल्यांदा मी त्याकडे दुर्लक्ष करण्याचा विचार केला, पण नंतर मला जाणवलं की जर मी गप्प राहिले तर तो दुसऱ्या लोकांनाही त्रास देईल. त्यामुळे फक्त त्याला ब्लॉक करणेच पुरेसे नाही." असं शर्मिष्ठा मुखर्जी यांनी फेसबुकवर लिहिलं आहे. "मला वाटतं की अशा लोकांची माहिती सार्वजनिकरित्या उघड केली पाहिजे. मी त्या व्यक्तीच्या प्रोफाईल आणि मेसेजचे फोटो शेअर करत आहे. कृपया तुम्ही या पोस्टला शेअर करा जेणेकरून अशा विकृतांना चाप बसेल" असंही मुखर्जी यांनी म्हटलं आहे.
"पार्थ मंडल नावाचा एक विकृत माणूस मला अश्लील संदेश पाठवत आहे. पहिल्यांदा मी त्याकडे दुर्लक्ष करण्याचा विचार केला, पण नंतर मला जाणवलं की जर मी गप्प राहिले तर तो दुसऱ्या लोकांनाही त्रास देईल. त्यामुळे फक्त त्याला ब्लॉक करणेच पुरेसे नाही." असं शर्मिष्ठा मुखर्जी यांनी फेसबुकवर लिहिलं आहे. "मला वाटतं की अशा लोकांची माहिती सार्वजनिकरित्या उघड केली पाहिजे. मी त्या व्यक्तीच्या प्रोफाईल आणि मेसेजचे फोटो शेअर करत आहे. कृपया तुम्ही या पोस्टला शेअर करा जेणेकरून अशा विकृतांना चाप बसेल" असंही मुखर्जी यांनी म्हटलं आहे. आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
बीड
क्रीडा
व्यापार-उद्योग























