एक्स्प्लोर
ममता बॅनर्जी हिरण्यकश्यप राक्षसाच्या वंशज, जय श्रीराम बोलणाऱ्यांना तुरुंगात डांबतात : साक्षी महाराज
उत्तर प्रदेशमधील उन्नाव मतदारसंघाचे भाजप खासदार साक्षी महाराज यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याविरोधात वादग्रस्त विधान केले आहे.
नवी दिल्ली : उत्तर प्रदेशमधील उन्नाव मतदारसंघाचे भाजप खासदार साक्षी महाराज यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याविरोधात वादग्रस्त विधान केले आहे. या विधानामुळे साक्षी महाराजांवर सर्व स्तरातून टीका होऊ लागली आहे. साक्षी महाराजांनी म्हटले आहे की, ममता बॅनर्जी या त्रेतायुगातील राक्षस हिरण्यकश्यपच्या वंशज आहेत.
पश्चिम बंगालमध्ये भाजप आणि तृणमूल काँग्रेसमधील वाद विकोपाला जाऊ लागला आहे. साक्षी महाराजांनी वादग्रस्त विधान करुन त्यामध्ये अधिक भर टाकली आहे.
साक्षी महाराज म्हणाले की, हिरण्यकश्यप नावाचा एक राक्षस होता, त्याचा मुलगा प्रल्हाद 'जय श्री राम' म्हणायचा, परंतु हिरण्यकश्यपने त्याला तुरुंगात डांबले. याच गोष्टीची बंगालमध्ये पुनरावृत्ती होत आहे. मला असं वाटतंय की ममता बॅनर्जी हिरण्यकश्पच्या वंशज आहेत. बंगालमध्येदेखील 'जय श्रीराम' बोलणाऱ्यांना त्रास दिला जातोय. त्यांना तुरुंगात डांबलं जात आहे.
साक्षी महाराज म्हणाले की, आता बंगालमध्ये अशी स्थिती निर्माण झाली आहे की, 'जय श्रीराम' म्हणाल्यानंतर ममता बॅनर्जी चिडू लागल्या आहेत. त्या शिव्या देऊ लागल्या आहेत. रस्त्यावर उतरु लागल्या आहेत. विरोधात जाऊन विविध योजना बनवू लागल्या आहेत.
जय श्रीराम या घोषणेवरुन पश्चिम बंगालमध्ये राजकारण केले जाऊ लागले आहे. याबाबत ममता बॅनर्जी यांनी फेसबुक पोस्ट लिहून स्वतःची बाजू मांडली आहे. पोस्टमध्ये बॅनर्जी यांनी म्हटले आहे की, भाजपवाल्यांनी जय श्रीराम या घोषणेला विकृत रुप देत त्यांच्या पक्षाची घोषणा बनवले आहे. याद्वारे भाजपवाले धर्म आणि राजकारण एकत्र मिसळण्याचा प्रयत्न करत आहेत. मला कोणत्याही पक्षाची सभा, रॅली किंवा त्यांच्या घोषणेची अडचण नाही.Sakshi Maharaj, BJP MP from Unnao: Ek rakshas tha Hiranyakashyap, uske bete ne kaha tha 'Jai Shri Ram,' baap ne bete ko jail mein band kar diya tha. Aur wahi Bengal mein dohraya ja raha hai toh lagta hai ki Hiranyakashyap ke khandan ki toh nahi hain Mamata. pic.twitter.com/p8rIAGxA4W
— ANI (@ANI) June 2, 2019
Sakshi Maharaj, BJP MP from Unnao: 'Jai Shri Ram' kehne walon ko jail mein bheja ja raha hai, parinaam ye hogya hai ki 'Jai Shri Ram' kehne se vo (West Bengal CM Mamata Banerjee) khisiyane lagin, sadak pe utarne lagin, aur us ke virodh mein pata nahi kya-kya yojnaein banane lagin https://t.co/HxWV7nRMjO
— ANI (@ANI) June 2, 2019
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
राजकारण
राजकारण
Advertisement