एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
सुप्रीम कोर्टात अयोध्याप्रकरणी आजपासून मुख्य सुनावणी
अयोध्येतील वादग्रस्त जमीन कोणाची आहे? 491 वर्षांपासून सुरु असलेल्या या वादावर उद्या सर्वाोच्च न्यायालयात निर्णायक सुनावणी सुरु होणार आहे.
नवी दिल्ली : अयोध्येतील वादग्रस्त जमीन कोणाची आहे? 491 वर्षांपासून सुरु असलेल्या या वादावर उद्या सर्वोच्च न्यायालयात निर्णायक सुनावणी सुरु होणार आहे. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरच्या काळातील सर्वात संवेदनशील खटल्याचा निकाल आता दृष्टीक्षेपात आहे. 2 ऑगस्ट रोजी झालेल्या सुनावणीत सुप्रीम कोर्टाने जाहीर केले आहे की, 6 ऑगस्टपासून अयोध्या प्रकरणाची नियमित सुनावणी सुरु केली जाणार आहे.
सध्याचे सरन्यायाधीश रंजन गोगोई हे 17 नोव्हेंबर 2019 ला निवृत्त होत आहेत. सुप्रीम कोर्टाची जी साधारण परंपरा आहे, त्यानुसार ज्या खंडपीठाकडे प्रकरण येतं, त्याच खंडपीठाच्या कालावधीत निकाल लागतो. त्यामुळे 6 ऑगस्टला हे प्रकरण सरन्यायाधीशांचा समावेश असलेल्या खंडपीठाकडे आलं तर त्याचा अर्थ त्यांच्या निवृत्तीआधी खटल्याचा निकाल लागण्याची शक्यता आहे.
अयोध्या प्रकरणात 30 सप्टेंबर 2010 रोजी अलाहाबाद हायकोर्टाने महत्त्वाचा निकाल दिला होता. यावेळी कोर्टाने वादग्रस्त जमीन तीन भागांमध्ये वाटण्याचा निकाल दिला होता. यापैकी दोन तृतीअंश जमीन राम मंदिरासाठी आणि एक तृतीअंश जमीन सुन्नी वक्फ बोर्डाला देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. परंतु या निकाला दोन्ही पक्षकारांना अमान्य होता. त्यानंतर गेल्या आठ-नऊ वर्षात सर्वोच्च न्यायालयात त्यासंदर्भातली मोठी घडामोड घडलेली नाही. त्यामुळे आता 6 ऑगस्टपासून सुरु होणारी ही सुनावणी देशाला अयोध्या प्रश्नावरचं अंतिम उत्तर कधी देते याकडे सगळ्यांचं लक्ष असेल.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
व्यापार-उद्योग
राजकारण
राजकारण
Advertisement