Sanjay Raut ED Action : ED च्या कारवाईनंतर Sanjay Raut यांची पहिली प्रतिक्रिया
Sanjay Raut ED Action Reaction : ईडीने संजय राऊत यांची अलिबागमधील आठ भूखंड आणि दादरचा फ्लॅटही जप्त केला आहे. या कारवाईनंतर संजय राऊत यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
मुंबई (Mumbai News) : शिवसेनेचे राज्यसभा खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना अंमलबजावणी संचलनालयाने दणका दिला आहे. ईडीने संजय राऊत (Sanjay Raut) यांची अलिबाग आणि दादरमधील संपत्ती जप्त केली आहे. यामध्ये अलिबागमधील आठ भूखंड आणि दादरच्या फ्लॅटचा समावेश आहे. 1 हजार 34 कोटींच्या पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी ईडीने ही कारवाई केली आहे. या कारवाईनंतर संजय राऊत यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
ईडीच्या कारवाईनंतर संजय राऊत यांनी ट्विटरवर पहिली प्रतिक्रिया दिली आहे. असत्यमेव जयते एवढंच ट्वीट संजय राऊत यांनी केलं आहे.
असत्यमेव जयते!!
— Sanjay Raut (@rautsanjay61) April 5, 2022
"ईडी किंवा सीबीआय माझ्या मागे लागली आहे, याची मला कल्पना होती. या कारवाईचं मला आश्चर्य वाटत असेल. अशा कारवाईमुळे संजय राऊत किंवा शिवसेना खचली आहे, असं कोणाला वाटत असेल तर त्यात तथ्य नाही. मुंबईतील राहत्या घर ईडीने जप्त केलं" असं संजय राऊत म्हणाले.
दरम्यान ईडीने संजय राऊत यांची संपत्ती जप्त केल्यानंतर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी पत्रकार परिषद घेऊन संजय राऊत यांच्यावर हल्लाबोल केला आहे. संजय राऊत यांना ईडीच्या कारवाईची पूर्वकल्पना होती. त्यामुळे त्यांनी 55 लाख रुपये परत करुन स्वत:च कबुली दिली, असं किरीट सोमय्या म्हणाले.