एक्स्प्लोर
Advertisement
(Source: Poll of Polls)
Maharana Pratap Jayanti 2020 : आज महाराणा प्रताप यांची जयंती, जाणून घ्या पराक्रमी राजाबद्दलच्या महत्वाच्या गोष्टी
आज महान योद्धा आणि शौर्य तसेच साहसाचे प्रतिक म्हणून ओळखले जाणारे महाराणा प्रताप यांची जयंती. एक अत्यंत पराक्रमी राजा अशी त्यांची ओळख.
Maharana Pratap Jayanti 2020: आज महान योद्धा आणि शौर्य तसेच साहसाचे प्रतिक म्हणून ओळखले जाणारे महाराणा प्रताप यांची जयंती. महाराणा प्रताप यांचा जन्म 9 मे 1540 रोजी कुंभलगड दुर्ग (पाली) इथं झाला होता. एक अत्यंत पराक्रमी राजा अशी त्यांची ओळख.
महाराणा प्रताप यांच्याविषयी काही खास गोष्टी
महाराणा प्रताप यांचे आईवडील महाराजा उदयसिंह आणि माता राणी जीवत कंवर. त्यांना लहानपणी कीका अशा नावानं संबोधलं जायचं. कीका म्हणजे मुलगा.
ते महाराणा प्रतापसिंह गुहिलोत नावाने राजस्थानात प्रसिद्ध आहेत. उदयसिंहाने जगमल ह्या आपल्या आवडत्या पुत्रास गादीचा वारस नेमले होते; परंतु प्रतापसिंह यांच्या मामाने इतर सरदारांच्या मदतीने जगमलास दूर करून प्रताप यांना 1 मार्च 1572 रोजी महाराणा केले.
अकबराचे स्वामित्व न पत्करल्यामुळे त्यांना मोगलांशी अखेरपर्यंत झगडा करावा लागला. अकबराने मानसिंह आणि आसफखान यांच्याबरोबर मोठं सैन्य देऊन त्यांच्यावर पाठविले.
1576 मध्ये हळदीघाटच्या घनघोर लढाईत महाराणा प्रतापसिंहांचा पराजय झाला, तरी ते तिथून निसटले आणि राजस्थानच्या दऱ्याखोऱ्यांतून त्यांनी मोगलांशी गनिमी काव्याने संघर्ष चालू ठेवला. त्यांच्या रसदा तोडल्या, खजिने लुटले. अकबर स्वतः त्यांच्यावर चालून गेला पण त्याला न जिंकताच परत फिरावे लागले. त्याची पाठ वळताच महाराणा प्रतापांनी आपले गेलेले सर्व किल्ले परत मिळविले. यानंतर त्यांनी पुढे 12 वर्षे शांततेने राज्य केले.
महाराणा प्रताप यांच्याजवळ चेतक नावाचा एक घोडा होता तो त्यांचा खूप प्रिय होता. महाराणा प्रताप यांच्याबद्दलच्या अनेक कथा ऐकताना चेतकचा उल्लेख आढळतो.
1596 मध्ये शिकार करताना त्यांना दुखापत झाली. ज्यातून ते सावरु शकले नाहीत. 19 जनवरी 1597 रोजी 57 वर्षाच्या वयात चावडमध्ये त्यांचा मृत्यू झाला.
(माहिती स्त्रोत- मराठी विश्वकोश)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
शिक्षण
निवडणूक
महाराष्ट्र
निवडणूक
Advertisement