एक्स्प्लोर

मध्य प्रदेशमधील नगरपालिका निवडणुकीत काँग्रेसची भाजपला टफ फाईट

मध्य प्रदेशमध्ये आज 19 नगरपालिकांच्या नगराध्यक्ष निवडणुकीचे निकाल जाहीर झाले. यात भाजपला काँग्रेसने कडवी झुंज दिली. दोन्ही पक्षांनी प्रत्येकी 9-9 नगरपालिकांमध्ये विजय मिळवत आपला उमेदवार नगराध्यक्षपदी विराजमान केला.

भोपाळ : मध्य प्रदेशमध्ये आज 19 नगरपालिकांच्या नगराध्यक्ष निवडणुकीचे निकाल जाहीर झाले. यात भाजपला काँग्रेसने कडवी झुंज दिली. दोन्ही पक्षांनी प्रत्येकी 9-9 नगरपालिकांमध्ये विजय मिळवत आपला उमेदवार नगराध्यक्षपदी विराजमान केला. तर एका नगरपालिकेत अपक्ष उमेदवाराने बाजी मारली. निवडणूक अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, आज जाहीर झालेल्या निकालांमध्ये भाजपने नऊ नगरपालिकांमध्ये विजय मिळवला. यात प्रामुख्याने पीथमपूर आणि डही, कुक्षी, धामनोद, पानसेमल, राजपूर, पलसूद आणि ओंकारेश्वर नगरपालिकांचा समावेश आहे. तर सेंधवा नगरपालिकेतील नगराध्यक्ष पदाची निवडणूक बिनविरोध झाल्याने, तिथे भाजपचा उमेदवार नगराध्यक्षपदी विराजमान होणार आहे. तर काँग्रेसचे वरिष्ठ नेते दिग्विजय सिंह यांच्या राघोगढ नगरपालिकेसह बडवानी, मनावर आणि धार नगरपालिकेत विजय मिळवला. याशिवाय, अंजड, खेतिया, सरदारपूर, राजगढ आणि धरमपूरीच्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत काँग्रेस उमेदवाराचा विजय झाला आहे. तर जैतहारी नगरपालिकेत अपक्ष उमेदवाराने बाजी मारली आहे. दरम्यान, नगरपालिका निवडणुकीतील भाजपच्या निराशाजनक कामगिरीचे खापर मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी मंदसौरचे भाजपचे बंडखोर उमेदवारावर फोडलं आहे. मंदसौरमधील भाजपच्या बंडखोरीमुळे पक्षाच्या कामगिरीवर परिणाम झाला असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. विशेष म्हणजे, या निवडणुकीत काँग्रेसला सात नगरपालिका भाजपकडून हिस्कावून घेण्यात यश मिळालं आहे. यावर मध्य प्रदेश विधानसभेतील विरोधीपक्ष नेते अजय सिंह म्हणाले की, “राज्यातील जनता भाजपवर नाराज असल्याचं, या निवडणूक निकालातून सिद्ध होतं. सरकारी यंत्रणा आणि पैशांचा वापर करुनही, या निवडणुकीत भाजपच्या हाती अपयश आलं.”

महत्त्वाच्या बातम्या

Sukhbir Badal News:मोठी बातमी, पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, आरोपीला अटक; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
बिहारमध्ये महिलांना भर निवडणुकीत 10-10 हजार वाटल्यानंतर आता उत्तर प्रदेशात 50-50 हजार वाटण्याची तयारी; निवडणुकीच्या तोंडावर 20-20 हजार खात्यात सोडणार?
बिहारमध्ये महिलांना भर निवडणुकीत 10-10 हजार वाटल्यानंतर आता उत्तर प्रदेशात 50-50 हजार वाटण्याची तयारी; निवडणुकीच्या तोंडावर 20-20 हजार खात्यात सोडणार?
Shiv Sena Name & Symbol Dispute: 'पण निवडणूक आयोग शिंदे गटाला धनुष्यबाण चिन्ह देऊ शकत नाही..' अत्यंत कळीचा मुद्दा उपस्थित करत कपिल सिब्बलांकडून पुन्हा आयोगाच्या कारभाराची खरडपट्टी
'पण निवडणूक आयोग शिंदे गटाला धनुष्यबाण चिन्ह देऊ शकत नाही..' अत्यंत कळीचा मुद्दा उपस्थित करत कपिल सिब्बलांकडून पुन्हा आयोगाच्या कारभाराची खरडपट्टी
Maharashtra Live News Updates: शिवसेना पक्ष, चिन्हावर आज सलग पाचव्या दिवशी सुनावणी
Maharashtra Live News Updates: शिवसेना पक्ष, चिन्हावर आज सलग पाचव्या दिवशी सुनावणी

व्हिडीओ

Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर
Sanjay Raut on Amit Shah: अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय
Manoj Jarange Patil: आआथातू अरअरअर...अ‍ॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना
Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
Shiv Sena Symbol Case : चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
Sukhbir Badal News:मोठी बातमी, पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, आरोपीला अटक; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
IND Vs SL Galle Test: त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत
त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत
बिहारमध्ये महिलांना भर निवडणुकीत 10-10 हजार वाटल्यानंतर आता उत्तर प्रदेशात 50-50 हजार वाटण्याची तयारी; निवडणुकीच्या तोंडावर 20-20 हजार खात्यात सोडणार?
बिहारमध्ये महिलांना भर निवडणुकीत 10-10 हजार वाटल्यानंतर आता उत्तर प्रदेशात 50-50 हजार वाटण्याची तयारी; निवडणुकीच्या तोंडावर 20-20 हजार खात्यात सोडणार?
Shiv Sena Name & Symbol Dispute: 'पण निवडणूक आयोग शिंदे गटाला धनुष्यबाण चिन्ह देऊ शकत नाही..' अत्यंत कळीचा मुद्दा उपस्थित करत कपिल सिब्बलांकडून पुन्हा आयोगाच्या कारभाराची खरडपट्टी
'पण निवडणूक आयोग शिंदे गटाला धनुष्यबाण चिन्ह देऊ शकत नाही..' अत्यंत कळीचा मुद्दा उपस्थित करत कपिल सिब्बलांकडून पुन्हा आयोगाच्या कारभाराची खरडपट्टी
Joe Root: नवा गडी, नवं राज्य!
नवा गडी, नवं राज्य! "तुम्हाला बिअर प्यायची असेल तर प्या, पण..." कॅप्टन होताच जो रूट इंग्लंड संघाचा नाइट कर्फ्यू उठवत काय काय म्हणाला?
Hardik Pandya: हार्दिक पांड्याचा तो एक फोटो पाहून मुंबईचे चाहते सपशेल गोंधळात; आयपीएल लिलावापूर्वी दिल्लीने टाकला मोठा डाव?
हार्दिक पांड्याचा तो एक फोटो पाहून मुंबईचे चाहते सपशेल गोंधळात; आयपीएल लिलावापूर्वी दिल्लीने टाकला मोठा डाव?
Embed widget