एक्स्प्लोर
मध्य प्रदेशात शेतकऱ्यांचं आंदोलन तीव्र, जिल्हाधिकाऱ्यांना मारहाण
भोपाळ : मध्य प्रदेशातील शेतकऱ्यांचं आंदोलन अधिक तीव्र झालं आहे. मंदसौरमधील बेरखेडापंत गावात शेतकऱ्यांशी चर्चेला आलेले जिल्हाधिकारी स्वतंत्र सिंह यांना मारहाण करण्यात आली. तर देवासमध्ये शेतकऱ्यांनी पोलिस स्टेशनमध्ये उभ्या असलेल्या गाड्या जाळल्या.
मध्यप्रदेशात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांवर पोलिसांनी गोळीबार केला. या गोळीबारात पाच शेतकऱ्यांचा मृत्यू झाल्यानंतर वातावरण अधिक चिघळलं. संतप्त शेतकऱ्यांनी एबीपी न्यूजचे पत्रकार ब्रिजेश राजपूत यांच्यावरही हल्ला केला.
दुसरीकडे मुख्यमंत्री शिवराज सिंह चव्हाण यांनी मृत शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना दिली जाणारी नुकसानभरपाई वाढवून एक कोटी केली आहे.
शेतकऱ्यांच्या मागण्या काय?
मध्य प्रदेशातील शेतकरी 2 जूनपासून आंदोलन करत आहे. शेतीमालाला योग्य हमीभाव आणि कर्जमाफी अशा प्रमुख मागणी या शेतकऱ्यांची आहे. शिवराज सिंह चौहान यांनी 3 जून रोजी शेतकऱ्यांशी चर्चा करुन तोडगा काढल्याचा दावा केला. यानंतर एका गटाने आंदोलन मागेही घेतलं. पण इतर शेतकरी आंदोलनावर कायम आहेत.
संबंधित बातमी
मध्य प्रदेशातील शेतकरी आंदोलनात गोळीबार, 5 जणांचा मृत्यू
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
कोल्हापूर
महाराष्ट्र
विश्व
व्यापार-उद्योग
Advertisement