एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
बॅरिकेडिंग तोडून भरधाव बाईक थेट विजेच्या खांबावर आदळली
भरधाव बाईकने पहिल्यांदा बॅरिकेडिंगला धडक दिली आणि नंतर थेट विजेच्या खांब्याला जाऊन जोरदार आदळली.
भोपाळ : मध्य प्रदेशातील रायसेन जिल्ह्यात ट्रीपल सीट जाणाऱ्या एका बाईकचा भीषण अपघात झाला. शुक्रवारी संध्याकाळी टोल नाक्यावर हा अपघात झाला. नियंत्रण सुटल्याने बाईक थेट विजेच्या खांब्याला जाऊन धडकली. बाईक चालवणाऱ्या तरुणाची प्रकृती गंभीर आहे.
काळजाचा ठोका चुकवणाऱ्या या अपघाताची दृश्यं कॅमेऱ्यात कैद झाली आहेत. या व्हिडीओनुसार, रस्त्याच्या एका बाजूला टोल देण्यासाठी गाड्या उभ्या होत्या. मात्र त्याचवेळी दुसरीकडून एक भरधाव बाईक आली. या बाईकवर तीन तरुण बसले होते. भरधाव बाईकने पहिल्यांदा बॅरिकेडिंगला धडक दिली आणि नंतर थेट विजेच्या खांब्याला जाऊन जोरदार आदळली.
अपघातात बाईक चालवणारा तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर भोपाळमध्ये उपचार सुरु आहेत.
अपघातांची आकडेवारी
देशात दर तासाला रस्ते अपघातात 17 जणांचा मृत्यू होतो.
- 2016 मध्ये मध्य प्रदेशात 53,972 रस्ते अपघात
- एमपीमध्ये दररोज सरासरी 148 रस्ते अपघात
- या अपघातात रोज सरासरी 26 जणांचा मृत्यू, तर 159 जखमी
- मध्य प्रदेशात 2016 मध्ये रस्ते अपघातात 57,873 लोक जखमी
पाहा व्हिडीओ
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
आयपीएल
राजकारण
निवडणूक
Advertisement