कृषी क्षेत्राचा सन्मान, हरित क्रांतीचे जनक एम.एस स्वामिनाथन यांना मरणोत्तर भारतरत्न जाहीर
हरित क्रांतीचे जनक (father of green revolution) एम.एस स्वामिनाथन यांना मरणोत्तर (M S Swaminathan ) भारतरत्न (Bharat Ratna Award) हा सर्वोच्च नागरी सन्मान जाहीर झाला आहे.
Bharat Ratna Award : हरित क्रांतीचे जनक (father of green revolution) एम.एस स्वामिनाथन यांना मरणोत्तर (M S Swaminathan ) भारतरत्न (Bharat Ratna Award) हा सर्वोच्च नागरी सन्मान जाहीर झाला आहे. कृषी क्षेत्रात दिलेल्या त्यांच्या योगदानाबद्दल त्यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याबाबतची माहिती दिली आहे.
It is a matter of immense joy that the Government of India is conferring the Bharat Ratna on Dr. MS Swaminathan Ji, in recognition of his monumental contributions to our nation in agriculture and farmers’ welfare. He played a pivotal role in helping India achieve self-reliance in… pic.twitter.com/OyxFxPeQjZ
— Narendra Modi (@narendramodi) February 9, 2024
डॉ. एम एस स्वामीनाथन यांनी आपल्या देशासाठी कृषी आणि शेतकरी कल्याणात अतुलनीय योगदान दिलं आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन त्यांना भारतरत्न प्रदान करण्यात येत आहे. याचा अत्यंत आनंद असल्याचे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केलं. दरम्यान डॉ. एम एस स्वामीनाथन यांच्याबरोबर माजी पंतप्रधान चौधरी चरणसिंग (Chaudhary Charan Singh), माजी पंतप्रधान नरसिंह राव (Narsimha Rao) यांना देखील भारतरत्न देऊन सन्मानित करण्यात येणार असल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करुन याबाबतची माहिती दिली आहे.
कृषीसंशोधनात मोठं काम
कृषीक्षेत्रात काम करायचे नक्की झाल्यावर स्वामीनाथन यांनी मद्रास कृषी महाविद्यालयातून आणखी एक पदवी घेतली. 1947 साली ते दिल्लीच्या इंडियन ॲग्रिकल्चरल रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये पदव्युत्तर शिक्षणासाठी रवाना झाले. 1949 मध्ये विशेष प्रावीण्यासह त्यांनी ती पदवी प्राप्त केली. युनियन पब्लिक सर्व्हिसची परीक्षा देऊन ते भारतीय पोलीस सेवेसाठी पात्र ठरले. मात्र त्यांनी पोलीस ऑफिसर न होता कृषी क्षेत्रात संशोधन करायचे ठरवले. नेदरलॅंडमध्ये बटाटाच्या अनुवांशिकशास्त्राचा अभ्यास करण्यासाठी त्यांना मिळालेल्या शिष्यवृत्तीतून त्यांनी 1952 मध्ये पीएच.डी. केली. परदेशांत विविध संधी असतानाही ते भारतात परतले. जगभरांतील कृषी विद्यार्थ्यांबरोबर त्यांनी कृषिसंशोधनाबरोबर वनस्पतींची पैदास आणि नैसर्गिक साधनसंपत्तीचे जतन या विषयांवर काम केले आहे. भारतीय गरीब शेतकऱ्यांच्या शेतात गव्हाचे आणि तांदळाचे उच्च उत्पन्न देणारे वाण पेरुन त्यांनी हरितक्रांती घडवून आणली. याचे सर्व श्रेय स्वामीनाथन यांनाच जाते. त्यांच्या या प्रयत्नांमुळेच गहू आणि तांदूळ यांच्या उत्पादनांत भारत स्वयंपूर्ण होऊ शकला. डॉ. स्वामीनाथन यांचा झाडे प्रजनन,कृषी संशोधन आणि विकास आणि नैसर्गिक संसाधनांच्या संवर्धनावरती त्यांचा अधिक भर होता.
महत्वाच्या बातम्या: