(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Lucknow Levana Hotel Fire: लखनौमधील हॉटेलमध्ये अग्नितांडव, भीषण आगीत अनेकजण अडकल्याची माहिती
Levana Hotel Fire: लखनौमधील हजरतगंज परिसरातील एका हॉटेलमध्ये भीषण आग लागली आहे. लेवाना असं आग लागलेल्या हॉटेलचं नाव असून अनेक जण हॉटेलातील रुममध्ये अडकले आहेत.
Lucknow Levana Hotel Fire: लखनौमधील हजरतगंज परिसरातील एका हॉटेलमध्ये भीषण आग लागली आहे. लेवाना असं आग लागलेल्या हॉटेलचं नाव असून अनेक जण हॉटेलातील रुममध्ये अडकले आहेत. अनेक जण खिडक्या तोडून स्वतःचा जीव वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत. या आगीच्या घटनेनं यूपीची राजधानी लखनौमध्ये खळबळ उडाली आहे. सध्या घटनास्थळी मदतकार्य सुरु आहे.
#UPDATE | UP: Firefighting & rescue operations underway at Hotel Levana in Hazratganj, Lucknow where a fire broke out this morning. Three ambulances & fire tenders are present at the spot
— ANI UP/Uttarakhand (@ANINewsUP) September 5, 2022
Security personnel wear an oxygen mask to enter the hotel to evacuate people stuck inside. pic.twitter.com/78wUNBc6SF
उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊ येथील लेवाना हॉटेलमध्ये आज सकाळच्या सुमारास ही भीषण आग लागली. हे हॉटेल लखनऊच्या हजरतगंज भागात आहे. लेवाना हॉटेलला आग लागल्याची माहिती मिळताच परिसरात एकच खळबळ उडाली. हॉटेलच्या खोल्यांमध्ये अनेक लोक अडकल्याचे सांगण्यात येत आहे. त्याचबरोबर आगीमध्ये काही जणांचा मृत्यू झाल्याचं देखील कळत आहे. अद्याप जीवितहानीबाबत माहिती समोर आलेली नाही.
#WATCH | Uttar Pradesh: Fire breaks out at a hotel in Hazratganj in Lucknow. Efforts underway to evacuate the people in the hotel rooms. Details awaited. pic.twitter.com/gxKy6oYyOO
— ANI UP/Uttarakhand (@ANINewsUP) September 5, 2022
मात्र हॉटेलमध्ये अडकलेल्या लोकांना खिडक्या तोडून बाहेर काढण्यात येत आहे. यावेळी अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून मदतकार्य सुरु आहे. लेवाना हॉटेल लखनऊमधील सर्वात उच्चभ्रू भागात असलेल्या हजरतगंजमध्ये आहे. लखनौ रेल्वे स्टेशनपासून ते फक्त 10 मिनिटांच्या अंतरावर आहे. याच हॉटेलजवळ हजरतगंज मेट्रो स्टेशन देखील आहे. घटनास्थळी उपस्थित लोकांच्या म्हणण्यानुसार हॉटेलला लागलेली आग खूप गंभीर आहे. हॉटेलमध्ये बरेच लोक आहेत. आपत्कालीन एक्झिट तोडून लोकांना बाहेर काढले जात आहे.
याशिवाय लोकांना बाहेर काढण्यासाठी हॉटेलच्या खिडक्यांच्या काचाही तोडण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर जळालेल्या लोकांना रुग्णालयात नेण्यासाठी रुग्णवाहिका बोलविण्यात आल्या आहेत. यादरम्यान हॉटेलला लागलेल्या आगीच्या धुरामुळे गुदमरल्यानं अनेक जण बेशुद्ध झाल्याचं सांगण्यात येत आहे.