एक्स्प्लोर
बिपीन रावत नवे सेनाप्रमुख, तर बीरेंद्रसिंह धनोआ वायूसेनाप्रमुख
![बिपीन रावत नवे सेनाप्रमुख, तर बीरेंद्रसिंह धनोआ वायूसेनाप्रमुख Lt Gen Bipin Rawat To Be New Chief Of Army Staff Air Marshal B S Dhanoa To Be New Chief Of Air Staff बिपीन रावत नवे सेनाप्रमुख, तर बीरेंद्रसिंह धनोआ वायूसेनाप्रमुख](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/12/17214939/Bipin-Rawat-B.-S.-Dhanoa.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
नवी दिल्ली: भारताच्या नव्या लष्कर (आर्मी) आणि वायूसेना (एअरफोर्स) प्रमुखांच्या नावाची घोषणा झाली आहे. लेफ्टनंट जनरल बिपीन रावत हे इंडियन आर्मीचं नेतृत्त्व करतील, तर एअर मार्शल बीरेंद्रसिंह धनोआ यांच्याकडे एअरफोर्सची धुरा असेल.
भारताचे सध्याचे लष्करप्रमुख दलबीरसिंह सुहाग आणि वायूसेनाप्रमुख एअरचीफ मार्शल अरुप राहा येत्या 31 डिसेंबरला सेवानिवृत्त होत आहेत.
बिपीन रावत हे मूळचे उत्तराखंडचे आहेत. त्यांची 1 सप्टेंबर 2016 रोजीच सेनेच्या उपप्रमुखपदी नियुक्ती झाली होती.
बिपीन रावत यांचे वडिलही नि. लेफ्टनंट जनरल एल एस रावत हे सेनेच्या उपप्रमुखपदावरच निवृत्त झाले होते.
रावत हे डिसेंबर 1978 मध्ये भारतीय सैन्य अकादमीतून पासआऊट झालेले 'बेस्ट कॅडेट' होते. त्यांना 'स्वार्ड ऑफ ऑनर'नेही सन्मानित करण्यात आलं होतं.
इतकंच नाही तर रावत यांना सेवा मेडल, युद्ध सेवा मेडल, सेना मेडल आणि विशिष्ट सेवा मेडल सारख्या अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आलं आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
सोलापूर
राजकारण
भारत
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)