एक्स्प्लोर
सरकारचं होळी गिफ्ट, LPG सिलेंडर 47 रुपयांनी स्वस्त!
सरकारी तेल कंपन्यांनी एलपीजी सिलेंडरच्या दरात 47 रुपयांनी कपात केली आहे. नवे दर आजपासूनच (1 मार्च) लागू झाले आहेत.
नवी दिल्ली : होळीच्या सणाचा उत्साह द्विगुणीत करण्यासाठी केंद्र सरकारने देशभरातील सामान्यांना खास भेट दिली आहे. सरकारी तेल कंपन्यांनी एलपीजी सिलेंडरच्या दरात 47 रुपयांनी कपात केली आहे. नवे दर आजपासूनच (1 मार्च) लागू झाले आहेत.
तेल कंपन्यांनी विनाअनुदानित 14.2 किलो एलपीजी सिलेंडर 45.50 रुपयांपासून 47 रुपयांनी स्वस्त केला आहे. तर अनुदानित एलपीजी सिलेंडरचे दर 2.57 रुपयांनी कमी झाले आहेत.
यासोबतच कंपन्यांनी व्यावसायिक वापरात येणाऱ्या 19 किलो वजनाच्या गॅस सिलेंडरच्या दरातही कपात केली आहे. व्यावसायिक सिलेंडरच्या किंमतीत सात रुपयांपासून 80 रुपयांची कपात करण्यात आली आहे.
*विनाअनुदानित एलपीजी सिलेंडरच्या दरात कपात
47 रुपयांच्या कपातीनंतर राजधानी दिल्लीत विनाअनुदानित घरगुती गॅस सिलेंडरचे दर 689 रुपये झाले आहेत. याशिवाय कोलकातामध्ये सिलेंडरच्या दरात 45.50 रुपयांची कपात झाली आहे. इथे एलपीजी सिलेंडर आता 711.50 रुपयांना मिळेल. तर 47 रुपयांच्या कपातीसह मुंबईतील सिलेंडरचे नवे दर 661 रुपये झाले असून चेन्नईमध्ये 46.50 रुपयांच्या कपातीनंतर सिलेंडर 699.50 रुपयांना उपलब्ध होईल.
*अनुदानित घरगुती गॅस सिलेंडरही स्वस्त
दुसरीकडे अनुदानित घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात 2.50 रुपयांपेक्षा जास्त कपात झाली आहे. 1 मार्च म्हणजेच आजपासून अनुदानित सिलेंडरसाठी दिल्लीत 493.09 रुपये मोजावे लागतील. यापूर्वी याची किंमत 495.63 रुपये होती. कोलकातामध्ये एलपीजी सिलेंडरचे दर 2.53 रुपयांनी कमी होऊन 496.60 रुपये झाले आहेत. तर मुंबईत गॅस सिलेंडर 2.55 रुपयांनी स्वस्त होऊन आता त्यासाठी 490.80 रुपये मोजावे लागणार आहेत. चेन्नईमध्ये सिलेंडरच्या दरात 2.48 रुपयांनी कपात होऊन नवी किंमत 481.21 रुपये करण्यात आली आहे.
*व्यावसायिक सिलेंडरचे दरही घटले
व्यावसायिक सिलेंडरच्या किंमतीत सात रुपयांपासून 80 रुपयांची कपात करण्यात आली आहे. दिल्लीत याची किंमत 78.50 रुपयांनी कमी करुन 1230 रुपये करण्यात आली आहे. कोलकातामध्ये सिलेंडरचे दर 77 रुपयांनी घटवून 1270.50 रुपये झाले आहेत. याशिवाय मुंबईत सिलेंडरच्या दरात 79 रुपयांनी कपात झाली असून आता त्यासाठी 1181 रुपये मोजावे लागतील. तर चेन्नईमध्ये कमर्शियल सिलेंडरचे दर 80 रुपयांनी कमी केले असून तो आता 1307 रुपयांनी उपलब्ध होईल.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement