एक्स्प्लोर

पासपोर्टवर कमळाचं चिन्ह, मुद्दा संसेदत गाजल्यानंतर पराराष्ट्र मंत्रालय म्हणतं...

केरळच्या कोझीकोडमध्ये कमळाचं चिन्ह असलेले पासपोर्ट दिल्याचा मुद्दा काँग्रेस खासदार एम के राघवन यांनी काल (12 डिसेंबर) लोकसभेत शून्य प्रहरादरम्यान उपस्थित केला होता.

नवी दिल्ली : भारतीय पासपोर्टवर कमळाच्या चिन्हावरुन सध्या जोरदार वाद सुरु आहे. हा मुद्दा काल (12 डिसेंबर) संसदेत गाजला. विरोधकांनी यावरुन मोदी सरकारला चांगलंच धारेवर धरलं. यानंतर परराष्ट्र मंत्रालयाने याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे. सुरक्षा मानक अधिक मजबूत करण्यासाठी कमळाचं चिन्ह लावल्याचं मंत्रालयाचं म्हणणं आहे. केरळच्या कोझीकोडमध्ये कमळाचं चिन्ह असलेले पासपोर्ट दिल्याचा मुद्दा काँग्रेस खासदार एम के राघवन यांनी काल (12 डिसेंबर) लोकसभेत शून्य प्रहरादरम्यान उपस्थित केला होता. एका वृत्तपत्राने याबाबत वृत्त दिल्याचं त्यांनी सभागृहात सांगितलं. "कमळाचं चिन्ह असलेलं पासपोर्ट म्हणजे सरकारी संस्थांचं भगवीकरण करण्याचा प्रयत्न आहे, कारण कमळ हे भाजपचं निवडणूक चिन्हं आहे," असं एम के राघवन म्हणाले. लोकसभेत हा मुद्दा उपस्थित झाल्यानंतर परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. त्यांनी सांगितलं की, "बनावट पासपोर्ट ओळखण्यासाठी आणि पासपोर्टचे सुरक्षा मानक अधिक बळकट करण्यासाठी कमळाचं चिन्हं लावलं आहे. ते म्हणाले की, हे चिन्ह म्हणजेच कमळ आपलं राष्ट्रीय फूल देखील आहे. कमळाव्यतिरिक्त आणखी बरीच चिन्हं आहेत. टप्प्याटप्प्याने इतर राष्ट्रीय चिन्हांचाही वापर केला जाईल. आता कमळ आहे आणि पुढील महिन्यात आणखी काहीतरी असेल. भारताशी संबंधित चिन्हांचाच जसं की राष्ट्रीय फूल, राष्ट्रीय पशू यांचा पासपोर्टवर वापर होईल.  ICAO च्या नियमावलीअंतर्गत हे बदल करण्यात आले आहेत."
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rolta India : अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
Pune Crime News: पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
Israel-Hamas ceasefire in Gaza : इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 07PM TOP Headlines 07 PM 19 January 2024Maha kumbha IIT Baba : आयआयटी शिकलेला अभय सिंग का बनला संन्यासी? बाबा माझावर EXCLUSIVEMaha kumbha Time Baba : कुंभमेळ्यात घडीवाले बाबांची चर्चा, हातात आणि पायात घड्याळच घड्याळABP Majha Marathi News Headlines 06PM TOP Headlines 06 PM 19 January 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rolta India : अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
Pune Crime News: पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
Israel-Hamas ceasefire in Gaza : इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
Deepak Kedar : सैफ अली खानसाठी दया नायक कमरेला बंदूक लावून गेला, मग आम्हाला न्याय का नाही? पँथर सेनेच्या अध्यक्षांचा सवाल, धनंजय मुंडेंनाही डिवचलं!
सैफ अली खानसाठी दया नायक कमरेला बंदूक लावून गेला, मग आम्हाला न्याय का नाही? पँथर सेनेच्या अध्यक्षांचा सवाल, धनंजय मुंडेंनाही डिवचलं!
Manoj Jarange Patil : तर मुख्यमंत्र्यांचा सामना आमच्याशी, राज्य बंद करू; मनोज जरांगे पाटलांचा जनआक्रोश मोर्चातून इशारा
तर मुख्यमंत्र्यांचा सामना आमच्याशी, राज्य बंद करू; मनोज जरांगे पाटलांचा जनआक्रोश मोर्चातून इशारा
Beed Accident News: पोलीस भरतीचं स्वप्न भंगलं, सराव करणाऱ्या तीन तरुणांचा दुर्दैवी अंत; मृतांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे 10 लाखाची मदत
पोलीस भरतीचं स्वप्न भंगलं, सराव करणाऱ्या तीन तरुणांचा दुर्दैवी अंत; मृतांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे 10 लाखांची मदत
Dada Bhuse : नाशिकच्या पालकमंत्रिपदावरून पत्ता कट, मंत्री दादा भुसेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
नाशिकच्या पालकमंत्रिपदावरून पत्ता कट, मंत्री दादा भुसेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
Embed widget