(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Jagan Mohan Reddy: गर्दीतून भिरकावलेल्या दगडाने आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांच्या डोक्याचा वेध घेतला, जगन मोहन रेड्डी जखमी
Maharashtra Politics: आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांवर दगडफेक, हल्ल्यात जगनमोहन रेड्डी जखमी. प्राथमिक उपचारानंतर जगनमोहन रेड्डीन यांनी त्यांची बस यात्रा सुरू ठेवली आहे. आंध्रप्रदेशमधील लोकसभेच्या 25 जागांसाठी 13 मे रोजी एकाच टप्प्यात मतदान होणार आहे.
अमरावती: आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी हे लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान झालेल्या दगडफेकीत जखमी झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. जगन मोहन रेड्डी (Jagan Mohan Reddy) शनिवारी विजयवाडा येथील सिंहनगर परिसरात प्रचार करत होते. यावेळी गर्दीतील अज्ञात व्यक्तीने फिरकावलेल्या दगडाने जगन मोहन रेड्डी यांच्या डोक्याचा वेध घेतला. दगड लागल्याने जगन मोहन रेड्डी यांच्या डाव्या डोळ्याला दुखापत झाली. दगडाच्या फटक्याने जगनमोहन रेड्डी यांचा डोळा काळानिळा पडला असून त्यांच्या भुवईच्या वरच्या भागातून रक्त येत होते.
#WATCH | Lok Sabha Elections 2024 | Vijayawada: Andhra Pradesh CM YS Jagan Mohan Reddy injured during Memantha Siddham Bus Yatra.
— ANI (@ANI) April 13, 2024
According to YSRCP, an unidentified individual pelted a stone at the CM, injuring him on his left eyebrow. His security team was alerted and it… pic.twitter.com/kfBFlMpnhp
या घटनेनंतर डॉक्टरांनी जगन मोहन रेड्डी यांच्यावर तातडीने उपचार केले. जगन मोहन रेड्डी यांच्या शेजारीच उभे असणारे आमदार वेलामपल्ली श्रीनिवास राव यांच्या डोळ्यालाही दगड लागल्याने दुखापत झाली आहे. मात्र, या घटनेनंतर जगन मोहन रेड्डी यांनी आपला रोड शो थांबवला नाही. प्राथमिक उपचारानंतर पुन्हा उभे राहत त्यांनी आपल्या समर्थकांना अभिवादन केले आणि आपला रोड शो पुढे सुरु ठेवला.
VIDEO | Stones were reportedly thrown at Andhra Pradesh CM YS Jagan Mohan Reddy's convoy during his poll campaigning in Vijayawada. More details awaited.
— Press Trust of India (@PTI_News) April 13, 2024
(Source: Third Party) pic.twitter.com/5XTX2Q5SSJ
या घटनेनंतर वायएआर काँग्रेसच्या नेत्यांनी तेलुगू देसम पक्षावर आरोप केला आहे. तेलुगू देसमच्या कार्यकर्त्यांनी जगनमोहन रेड्डी यांच्यावर दगड फेकला असावा, असा त्यांचा संशय आहे. आंध्रप्रदेशमधील लोकसभेच्या 25 जागांसाठी 13 मे रोजी एकाच टप्प्यात मतदान होणार आहे.
आणखी वाचा