BJP Candidates List 2024 : भाजपच्या पहिल्या यादीत मोदी सरकारमधील दिग्गज मंत्र्यांना वगळलं, पाहा संपूर्ण यादी
Lok sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. या यादीमध्ये नितीन गडकरी यांच्यासह दिग्गजांची नाव वगळण्यात आली आहेत.
Lok Sabha Elections BJP Candidates : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने उमेदवारांची (BJP Candidates) पहिली यादी जाहीर केली आहे. भाजपकडून (BJP) जारी करण्यात आलेल्या उमेदवारांच्या पहिल्या यादीमध्ये 195 उमेदवारांची नाव जाहीर करण्यात आली आहेत. भाजपने केंद्रीय मंत्र्यांवर विश्वास कायम ठेवल्याचं दिसत आहे. या यादीत 34 केंद्रीय मंत्र्यांचा समावेश आहेत. दरम्यान भाजपने पहिल्या यादीत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमण, परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर याशिवाय मंत्री अनुराग ठाकूर यांनाही तिकीट दिलेलं नाही.
भाजपच्या पहिल्या यादीत या मंत्र्यांना तिकीट मिळाले
- नरेंद्र मोदी - वाराणसी
- अमित शाह - गांधीनगर
- राजनाथ सिंह - लखनौ
- स्मृती इराणी - अमेठी
- किरेन रिजिजू - अरुणाचल पूर्व
- राजीव चंद्रशेखर - तिरुवनंतपुरम
- ज्योतिरादित्य सिंधिया - गुना
- भूपेंद्र यादव - अलवर
- गजेंद्र सिंह शेखावत - जोधपूर
- सर्बानंद सोनोवाल - दिब्रुगढ
- संजीव बालिया - मुझफ्फरनगर
- अर्जुन मुंडा - खुंटी
- अर्जुन राम मेघवाल - बिकानेर
- परषोत्तम रुपाला - राजकोट
- मनसुख मांडविया - पोरबंदर
- देवुसिंह चौहान - खेडा
- कैलास चौधरी - बारमेर
- जितेंद्र सिंह - उधमपूर
- अन्नपूर्णा देवी - कोडरमा
- जी किशन रेड्डी - सिकंदराबाद
- फग्गनसिंह कुलस्ते - मांडला
- विरेंद्र खाटीक - टिकमगड
- व्ही मुरलीधरन - अटिंगल
- सत्यपाल बघेल - आग्रा
- अजय मिश्रा टेनी - खेरी
- कौशल किशोर - मोहनलालगंज
- भानुप्रताप वर्मा - जालौन
- साध्वी निरंजन ज्योती - फतेहपूर
- पंकज चौधरी - महाराजगंज
- निशिथ प्रामाणिक - कूच बिहार
- शंतनू ठाकूर - बनगाव
- सुभाष सरकार - बांकुडा
पहिल्या यादीत दिग्गज नेत्यांना अद्याप तिकीट नाही
या यादीमध्ये महाराष्ट्रातील भाजपचे दिग्गज नेते नितीन गडकरी यांच्यासह अनेक वरिष्ठ नेत्यांची नाव वगळण्यात आली आहेत. याशिवाय भागवत कराड, भारती पवार यांना पहिल्या यादीत तिकीट दिलेलं नाही. भाजपने पहिल्या उमेदवारांच्या यादीत अनेक दिग्गज नेत्यांचा नावाचा समावेश केला नसल्याचं दिसत आहे.
'या' मंत्र्यांना पहिल्या यादीत तिकीट नाही
- नितीन गडकरी
- नारायण राणे
- रावसाहेब दानवे
- भागवत कराड
- भारती पवार
- अनुराग ठाकूर
- निर्मला सीतारामण
- एस. जयशंकर
- पियुष गोयल
- अश्विनी वैष्णव
- धर्मेंद्र प्रधान
- प्रल्हाद जोशी
- गिरीराज सिंह
- राजकुमार सिंह
- हरदीप सिंग पुरी
- राव इंद्रजित सिंह
- अश्विनी चौबे
- व्ही के सिंह
- कृष्णपाल
- नित्यानंद राय
- एसपी सिंह बघेल
- शोभा करंदलाजे
- दर्शना जरदोष
- मीनाक्षी लेखी
- सोम प्रकाश
- रामेश्वर तेली
- अन्नपूर्णा देवी
- ए नारायणस्वामी
- अजय भट्ट
- भगवंत खुबा
- कपिल पाटील
- प्रतिमा भौमिक
- सुभाष सरकार
- राजकुमार रंजन सिंह
- बिश्वेश्वर तोडू
- एम. महेंद्रभाई
- जॉन बार्ला
- एल मुरुगन
महत्त्वाच्या इतर बातम्या :