एक्स्प्लोर
ज्येष्ठ वकील जेठमलानींची निवृतीची घोषणा, 75 वर्षांच्या प्रॅक्टिसला ब्रेक
ज्येष्ठ वकील राम जेठमलानी यांनी अखेर आपली 75 वर्षांची कारकीर्द थांबवण्याची घोषणा शनिवारी केली आहे. सुप्रीम कोर्टाचे मुख्य न्यायमूर्ती दीपक मिश्रा यांच्या सन्मानार्थ आयोजित कार्यक्रमात बोलताना, त्यांनी याबाबतची घोषणा केली.
नवी दिल्ली : ज्येष्ठ वकील राम जेठमलानी यांनी अखेर आपली 75 वर्षांची कारकीर्द थांबवण्याची घोषणा शनिवारी केली आहे. सुप्रीम कोर्टाचे मुख्य न्यायमूर्ती दीपक मिश्रा यांच्या सन्मानार्थ आयोजित कार्यक्रमात बोलताना, त्यांनी याबाबतची घोषणा केली.
बार काऊन्सिल ऑफ इंडियाकडून या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात बोलताना जेठमलानी म्हणाले की, ''न्यायमूर्ती मिश्रांचा मी मनापासून आदर करतो. पण जेव्हा ते मुख्य न्यायमूर्ती असतील, तेव्हा मी युक्तीवाद करण्यासाठी कोर्टात उपस्थित नसेन याचं दु: ख होत आहे. कारण मी वकिलीमधून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला आहे.''
दरम्यान, राम जेठमलानी लवकरच वयाच्या 94 व्या वर्षात पदार्पण करत आहेत. पण तरीही निवृत्तीनंतर ते आपल्या इतर कामात व्यस्त असतील याचे संकेत त्यांनी यावेळी दिले आहेत.
ते म्हणाले की, ''मला भ्रष्ट राजकारण्यांचं समुळ उच्चाटन करण्यासाठी संघर्ष उभा करायचा आहे. त्यामुळे निवृत्तीनंतर माझ्याकडून कायदेविषयक बाबींसाठी सल्लामसलत करणाऱ्यांसाठी मी सदैव उपलब्ध असेन.''
दरम्यान, राम जेठमलानी यांनी काही वर्षांपूर्वीच आपल्या शहराबाहेरील प्रकरणांसाठी वकीलपत्र स्वीकारणं बंद केलं आहे. पण तरीही त्यांच्याकडे अनेक वकीलपत्र येत होते. यातील निवडक वकीलपत्रांचा त्यांनी स्वीकार केला होता.
जेठमलानी गेल्या 75 वर्षांपासून वकिली व्यवसायात आहेत. देशातील सर्वात नामांकित वकिलांमध्ये त्यांची गणना होते. यापूर्वी त्यांनी कायदे मंत्रालयाची जबाबदारीही सांभळली होती.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बीड
राजकारण
राजकारण
क्राईम
Advertisement