Amit Shah : गृहमंत्री अमित शाह कर्नाटक दौऱ्यावर, मंत्रीमंडळात फेरबदल होणार का?
सध्या कर्नाटकमध्ये नेतृत्व बदलाच्या तसेच मंत्रीमंडळात फेरबदल होण्याच्या चर्चा सुरु आहेत. अशातच गृहमंत्री अमित शाह हे कर्नाटक दौऱ्यावर आहेत.
Amit Shah Karnataka Visit: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे कर्नाटक दौऱ्यावर आहेत. पुढील वर्षी कर्नाटकमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर राज्यात नेतृत्व बदलाच्या चर्चा सुरु आहेत. मात्र, भाजप हायकमांडकड याबाबत काय निर्णय घेणार पाहणं महत्वाचे ठरणार आहे. अमित शाह यांनी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्याच नेतृत्वाखाली पुढील विधानसभा निवडणुका लढण्यास सांगितल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.
दरम्यान, राज्य मंत्रिमंडळात लवकरच फेरबदल होण्याची अपेक्षा पक्षाच्या काही नेत्यांनी व्यक्त केली आहे. या दौऱ्यात शाह भाजपच्या निवडणुकीच्या तयारीबाबत आढावा घेणार आहेत. तसेच पक्षाचे नेते आणि पदाधिकाऱ्यांना याबाबत काही संदेश देखील देण्याची शक्यता आहे. काही दिवसांपूर्वी शाह यांनी 2023 च्या विधानसभा निवडणुकीसाठी कर्नाटक राज्यात 150 जागांचे लक्ष्य ठेवले होते.
भाजपचा लिंगायत समाजापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न
मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या शासकीय निवासस्थानी आयोजित केलेल्या बैठकीत ते फक्त भाजपच्या निवडक नेत्यांशी बोलल्याचे पक्षाच्या सूत्रांनी सांगितले. 12 व्या शतकातील समाजसुधारक आणि लिंगायत समाजाचे संत बसवेश्वर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन त्यांच्या दौऱ्याची सुरुवात झाली. राज्यातील मोठी लोकसंख्या असलेल्या लिंगायत समाजाला जोडण्याचा प्रयत्न म्हणून त्यांच्या या हालचालीकडे जात आहे. सत्ताधारी भाजपची मजबूत व्होटबँक म्हणून समाजाकडे पाहिले जाते. नेतृत्व बदलाच्या संदर्भात, भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस अरुण सिंग, माजी मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा, पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नलिन कुमार कटील यांच्यासह इतरांनी मुख्यमंत्री बदलाची शक्यता नाकारली आहे.
भाजप हायकमांड नेतृत्व बदलाचा विचार करत आहे का?
नेतृत्व बदलाच्या मुद्द्यावर पक्षात कोणतीही चर्चा नाही. भाजप मुख्यमंत्री बोम्मई यांच्या नेतृत्वाखाली आणि येडियुरप्पा यांच्या मार्गदर्शनाखाली एकसंघ म्हणून निवडणुकीत उतरेल, असे प्रदेशाध्यक्ष नलिन कुमार कटील म्हणाले. मात्र, राज्य सरकार अधिक प्रभावी करण्यासाठी आणि भ्रष्टाचाराच्या आरोपांना तोंड देण्यासाठी हायकमांड मोठ्या बदलांचा विचार करत असल्याचा दावा विजापूर शहरातील भाजप आमदार बसनगौडा पाटील यांनी केला. हे बदल 10 मे पूर्वी होऊ शकतो असेही त्यांनी सांगितले. पाटील हे येडियुरप्पा यांचे जोरदार टीकाकार मानले जातात. प्रथम पाटील यांनीच येडियुरप्पा यांना मुख्यमंत्रीपदावरुन पायउतार होण्याचा अंदाज वर्तवला होता.
महत्त्वाच्या बातम्या: