Lalu Yadav Fodder Scam : लालू प्रसाद यादव यांनी तुरुंगवारी घडवणारा, चारा घोटाळा आहे तरी काय?
Lalu Yadav Fodder Scam : लालू प्रसाद यादव यांना चारा घोटाळ्यातील संबंधित डोरंडा ट्रेझरी प्रकरणात दोषी ठरवण्यात आलं आहे.
Lalu Yadav Fodder Scam : चारा घोटाळ्यासंदर्भातली चारा घोटाळ्यातील संबंधित डोरंडा ट्रेझरी प्रकरणात लालू प्रसाद यादव दोषी ठरले आहेत. सीबीआयच्या विशेष न्यायालयानं हा निर्णय दिला आहे. डोरंडा ट्रेझरीमधून 139 कोटी रुपये अवैध पद्धतीनं काढल्याप्रकरणात लालू प्रसाद यादव यांना कोर्टानं दोषी ठरवलं आहे. तर या प्रकरणात इतर 24 जणांची कोर्टानं निर्दोष मुक्तता केली आहे. 1996 साली झालेल्या चारा घोटाळाप्रकरणी 26 वर्षांनंतर न्यायालयानं निकाल दिला आहे. या प्रकरणात 18 फेब्रुवारीला न्यायालय शिक्षा सुनावणार आहे.
जवळपास 950 कोटी रुपयांचा हा घोटाळा लालूंसाठी नेहमीच डोकेदुखी ठरला आहे. आतापर्यंत या घोटाळ्याशी संबंधित 5 प्रकारणांमधील 4 प्रकरणी न्यायालयाने त्यांना दोषी ठरवलं आहे. हे प्रकरण 1996 साली समोर आलं होतं. हा घोटाळा उघडकीस आल्यानंतर लालू यांना बिहारच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामाही द्यावा लागला होता.
चारा घोटाळा प्रकरण नेमकं काय?
- चारा घोटाळ्याचा घटनाक्रम चारा घोटाळा म्हणजे प्राण्यांचा चारा, औषधं आणि पशूपालन उपकरणांचा घोटाळा आहे.
- 900 कोटींचा चारा घोटाळा 1996 साली उघडकीस आला. या घोटाळ्यात बिहारचे माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव आणि जगन्नाथ मिश्रा मुख्य आरोपी बनवलं गेलं.
- 10 मे 1997 रोजी सीबीआयने तत्कालीन राज्यपालांकडे मागणी केली की, लालूप्रसाद यादव यांच्यावर कारवाई व्हावी.
- 23 जून 1997 रोजी लालूप्रसाद यादव आणि इतर 55 जणांविरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आले.
- 29 जुलै 1997 रोजी लालूप्रसाद यादव यांना अटक करण्यात आली होती.
- 12 डिसेंबर 1997 रोजी लालूप्रसाद यादव यांची सुटका झाली.
- 28 ऑक्टोबर 1998 रोजी पुन्हा अटक करण्यात आली.
- मार्च 2012 रोजी सीबीआयने पाटणा कोर्टात लालूप्रसाद यादव, जगन्नाथ मिश्रा यांच्यासह 32 जणांविरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आले.
- 2013 मध्ये चारा घोटाळ्याशी संबंधित चाईंबासा प्रकरणात त्यांना 5 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आणि सध्या ते जामिनावर बाहेर आहेत.
- चारा घोटाळा समोर आणणारे सध्या झारखंडमध्ये मंत्री चारा घोटाळा ज्यांनी पुराव्यानिशी समोर आणला, ते याचिकाकर्ते सरयू राय हे सध्या झारखंडमध्ये मंत्री आहेत.
काय आहे दोरंडा प्रकरण?
1990 ते 1995 साला दरम्यान दोरंडा कोषागारातून बेकायदेशीरपणे 139.35 कोटी रुपये काढण्यात आले होते. हे चारा घोळयातील सर्वात मोठे प्रकरण आहे. याप्रकरणी 1996 साली 170 आरोपींवर गुन्हा नोंदवण्यात आला होता. त्यामधील 55 आरोपींचा मृत्यू झाला असून 7 आरोपी हे साक्षीदार बनले आहेत. तसेच दोन आरोपींनी आपला गुन्हा कबूल केला आहे. तर 6 आरोपी फरार आहेत. याप्रकरणातील एकूण 99 आरोपींवर अद्यापही निर्णय येणे बाकी आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
Fodder Scam Case : चारा घोटाळ्याप्रकरणी लालूप्रसाद यादव दोषी, सीबीआय न्यायालयाचा निर्णय
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha