एक्स्प्लोर
आरजेडी अध्यक्ष लालूप्रसाद यादव हेमामालिनी यांना म्हणतात...
पटणा: बिहारची राजधानी पटणामध्ये काल अभिनेत्री हेमामालिनी यांच्या नृत्य कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला लालूप्रसाद यादवही उपस्थित होते. यावेळी बोलताना लालूप्रसाद यादव यांनी हेमा मालिनीला तुमच्यावर खूप प्रेम आहे अशा शब्दात भावना व्यक्त केल्या.
''हेमामालिनीच्या नावनेच, आम्ही आमच्या मुलीचं नाव ठेवलं आहे. हेमामालिनी यांना माहित नसेल, पण आम्ही त्यांच्यावर खूप प्रेम करतो.'' लालूप्रसाद यादव म्हणाले.
लालूप्रसाद यादवही अभिनेत्री हेमामालिनीचे चाहते आहेत. त्यामुळे त्यांनी पुन्हा एकदा सार्वजनिक व्यासपीठावरुन हेमा मालिनींची मुक्तकंठाने स्तुती केली. ''हेमामालिनी यांना सन्मान मिळतो. आम्ही हेमामालिनींचे सादरीकरण पाहिले, त्यांच्या सादरीकरण उत्साहपूर्ण असतो. लोक म्हणतात, आज सर्वत्र बिहारचं नाव बदनाम आहे. पण हेमाजींनी पटण्यात येऊन या सर्व भ्रामक कल्पनांना छेद दिला आहे.'' असं त्यांनी सांगितलं
लालूप्रसाद यादवांच्या भाषणानंतर हेमामालिनी यांनी व्यासपीठावर नृत्य सादर केलं. या कार्यक्रमाला लालूप्रसाद यादव यांची दोन्ही मुले तेजस्वी आणि तेजप्रताप हेही उपस्थित होते.
वास्तविक, लालूप्रसाद यादव यांनी हेमामालिनी यांची स्तुती करण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी ही ते मुख्यमंत्रीपदावर असताना, त्यांनी बिहारमधील रस्ते हेमामालिनींच्या गालाप्रमाणे करण्याचं आश्वासन दिलं होतं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
कोल्हापूर
महाराष्ट्र
विश्व
व्यापार-उद्योग
Advertisement