एक्स्प्लोर
लालूप्रसाद यादव रुग्णालयात दाखल, छातीत दुखू लागल्याने उपचार
राजदचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांना छातीत दुखू लागल्याने मुंबईतील एशियन हार्ट रुग्णालयात दाखल करण्यात आले. हिमोग्लोबिनचं प्रमाण कमी झाल्यानं त्यांना शनिवारी संध्याकाळी ५वाजता तातडीनं रुग्णालयात हलवण्यात आलं.
मुंबई : राजदचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांना छातीत दुखू लागल्याने मुंबईतील एशियन हार्ट रुग्णालयात दाखल करण्यात आले. हिमोग्लोबिनचं प्रमाण कमी झाल्यानं त्यांना शनिवारी संध्याकाळी ५वाजता तातडीनं रुग्णालयात हलवण्यात आलं.
त्यांच्यासोबत रुग्णालयात तेजस्वी यादव आणि मुलगी मीसा भारती होते.
चारा घोटाळाप्रकरणी शिक्षा भोगत असलेल्या लालू यादव यांना मुलाच्या लग्नासाठी जामीन मंजूर झाला होता. परंतु वैद्यकीय कारणास्तव सहा आठवड्यांसाठी जामीन वाढवण्यात आली.
चारा घोटाळा काय आहे?
- चारा घोटाळा म्हणजे प्राण्यांचा चारा, औषधं आणि पशूपालन उपकरणांचा घोटाळा आहे. 900 कोटींचा चारा घोटाळा 1996 साली उघडकीस आला.
- चारा घोटाळ्याचे एकूण सहा खटले आहेत. यातील एका खटल्यात 2013 साली लालूप्रसाद यादव यांना पाच वर्षांची शिक्षा झाली आहे. त्यामुळे ते काही काळ निवडणुकीच्या राजकारणातून दूर झाले.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
महाराष्ट्र
क्राईम
क्रीडा
Advertisement