Kulgam Encounter : कुलगाममध्ये तीन दहशतवाद्यांचा खात्मा, चकमक अद्याप सुरुच
Kulgam Encounter Update : बुधवारी जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा दलाला मोठं यश मिळालं आहे. कुलगाम येथे सुरक्षा दलाने तीन अज्ञात दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे.
Kulgam Encounter Update : बुधवारी जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा दलाला मोठं यश मिळालं आहे. कुलगाम येथे सुरक्षा दलाने तीन अज्ञात दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, कुलगाम येथील मिरहमा परिसरात सुरक्षा दलाला दहशतवादी लपून बसल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर सुरक्षा दलाने सर्च ऑपरेशन जारी केलं. सर्च ऑपरेशन सुरु असताना दहशतवाद्यांनी सुरक्षा दलावर गोळाबार केला. या चकमकीत सुरक्षा दलाने तीन दहशतवाद्यांचा खात्मा केला. काश्मीरचे पोलीस महानिरीक्षक (IGP) विजय कुमार यांनी चकमक अद्याप सुरु असल्याची माहिती दिली आहे.
#KulgamEncounterUpdate: 02 more unidentified #terrorists killed (Total 03). Search going on. Further details shall follow. @JmuKmrPolice https://t.co/aiWYSUbtJp
— Kashmir Zone Police (@KashmirPolice) December 29, 2021
जम्मू काश्मीर पोलिसांनी सांगितले की, सुरक्षा दल आणि दहशतवादी यांच्यामध्ये बुधवारी चकमक झाली. यामध्ये तीन अज्ञात दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. सर्च ऑपरेशन अद्याप सुरु आहे.
दरम्यान, बुधवारी अनंतनाग जिल्ह्यात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली होती. यामध्ये एक पोलीस अधिकारी जखमी झाला होता. पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, येथे दहशतवादी लपून बसल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर सर्च ऑपरेशन करण्यात आलं. त्यावेळी दहशतवाद्यांकडून गोळीबार करण्यात आला. सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. यामध्ये एक पोलीस जखमी झाला. अधिकाऱ्याने सांगितले की, सर्च ऑपरेशनदरम्यान लपून बसलेल्या दहशतवाद्यांनी अचानक गोळीबार सुरु केला. प्रत्युत्तरदाखल सुरक्षा दलानेही गोळीबार केला. यामध्ये एक पोलीस अधिकारी जखमी झाला. त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. चकमक अद्याप सुरु आहे.
मराठी लाईव्ह न्यूज सुपरफास्ट पाहा ABP Majha वर, मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, मनोरंजन, क्रिकेट, देश-विदेशातील प्रत्येक बातमी सर्वात आधी एबीपी माझावर Live
संबधित बातम्या :
राज्यात भाजप-राष्ट्रवादीचे सरकार स्थापन झालं असतं पण...', शरद पवारांनी सांगितला 'तो' किस्सा