एक्स्प्लोर

भारताची पहिली चाल यशस्वी: अॅड. उज्ज्वल निकम

जळगाव/ मुंबई: पाकिस्तानच्या अटकेत असलेल्या कुलभूषण यांच्या बचावासाठी भारतानं खेळलेली पहिली खेळी यशस्वी झाल्याची प्रतिक्रिया, ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ उज्ज्वल निकम यांनी दिली आहे. असं असलं तरी आंतरराष्ट्रीय न्यायालयाचा हा निर्णय पाकिस्तान अमान्य करण्याची शक्यताही त्यांनी व्यक्त केली.

उज्ज्वल निकम म्हणाले, "कुलभूषण जाधव यांच्या फाशीच्या शिक्षेला तात्पुरती स्थगिती असली, तरी या निकालाद्वारे एक बाजू स्पष्ट झालेली आहे, की भारताचं जे म्हणणं होतं, कुलभूषण जाधव हे अफगाणिस्तानमध्ये त्यांच्या खासगी व्यवसायानिमित्त गेले असताना, पाकिस्तानमध्ये त्यांना पळवण्यात आलं. आणि तिथल्या लष्करी न्यायालयाने त्यांना कोणतीही बचावाची संधी न देता, मानवी हक्कांचं उल्लंघन करुन, घिसाडघाईने फाशीची शिक्षा सुनावली. एवढंच नाही या शिक्षेनंतरही त्यांना कोणासही भेटण्यास मज्जाव केला, याबाबतीत आपण आंतरराष्ट्रीय न्यायालयात ही बाजू जोरदारपणे मांडून, आंतरराष्ट्रीय न्यायालयाचं समाधान झालं, त्यामुळेत त्यांच्या फाशीला स्थगिती मिळाली आहे."

कूलभूषण जाधव यांच्या फाशीला स्थगिती भारतीय नौदलाचे माजी अधिकारी कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानने सुनावलेल्या फाशीच्या शिक्षेला आंतरराष्ट्रीय न्यायालयाने स्थगिती दिली आहे. ‘रॉ’चे एजंट असल्याच्या आरोपाखाली पाकिस्तानमध्ये अटकेत असलेल्या, भारताच्या कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानमधील रावळपिंडी कोर्टाने फाशीची शिक्षा सुनावली होती. आंतरराष्ट्रीय न्यायालयाकडून कुलभूषण जाधव यांच्या फाशीला स्थगिती  पाकिस्तानने सुनावलेल्या शिक्षेविरोधात भारताने आंतरराष्ट्रीय न्यायालयात दाद मागितली होती. पाकिस्तानने भारताला कोणतीही माहिती न देता बेकायदशीरपणे फाशीची शिक्षा सुनावली, असा दावा भारताने आंतरराष्ट्रीय न्यायालयात केला होता. आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या निर्णयानंतर पुढील प्रक्रिया काय? आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या निर्णयावर पाकिस्तानची प्रतिक्रिया महत्वाची आहे. कुलभूषण जाधव यांना भेटण्याचीही परवानगी पाकिस्तानने दिली नव्हती. जगभरात या कायदेशीर बाबी पाळल्या जातात. त्यामुळे यावर पाकिस्तान काय बाजू मांडणार ते महत्वाचं असेल. जाणकारांच्या मते पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे आदेश पाळावे लागतील. कारण जगभरातील जवळपास 195 देश या न्यायालयाशी संलग्नित आहेत. पाकिस्तानला यामधून बाहेर पडणं परवडणारं नाही. त्यामुळे आंतरराष्ट्रीय दबाव पाकिस्तानवर राहिलं. कुलभूषण यांच्या आईला आंतरराष्ट्रीय न्यायालयाचा निर्णय कळवला : सुषमा स्वराज परराष्ट्र मंत्रालयाकडून कुलभूषण यांच्या सुटकेसाठी सतत प्रयत्न चालू होते. परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज स्वतः कुलभूषण जाधव यांच्या कुटुंबियांच्या संपर्कात होत्या. आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या या निर्णयाची माहिती कुलभूषण जाधव यांच्या आईला दिली असल्याचं सुषमा स्वराज यांनी म्हटलं आहे. कुलभूषण जाधव प्रकरणी ज्येष्ठ वकील हरिश साळवे भारताची बाजू आंतरराष्ट्रीय न्यायालयात मांडत आहेत, अशी माहिती सुषमा स्वराज यांनी दिली. कोण आहेत कुलभूषण जाधव? कुलभूषण जाधव यांच्यावर ‘रॉ’चे हेर असल्याचा आरोप लावत बलुचिस्तान प्रांतात त्यांना गेल्या वर्षी 3 मार्च 2016 मध्ये अटक झाली होती. जाधव कुटुंबीय मूळचं सांगलीचं असून सध्या मुंबईत वास्तव्यास आहे. कुलभूषण यांचे वडील मुंबई पोलिस दलाचे माजी कर्मचारी आहेत. जाधव यांनी नौदलातून निवृत्ती स्वीकारुन व्यवसायाला सुरुवात केली होती. त्यामुळे आपला मुलगा हेर असल्याचा आरोप जाधव कुटुंबीयाने फेटाळून लावला आहे. ‘माझ्या मुलाला यात अडकवण्यात आलं आहे. कुलभूषण इराणच्या चबाहारमध्ये सल्लागार म्हणून व्यवसाय करतो,’ अशी माहिती त्यांच्या वडिलांनी दिली होती. बलुचिस्तानात अटक कुलभूषण जाधव यांच्यावर ‘रॉ’चे हेर असल्याचा आरोप लावत बलुचिस्तान प्रांतात त्यांना गेल्या वर्षी 3 मार्च 2016 मध्ये अटक झाली होती. जाधव कुटुंबीय मूळचं सांगलीचं असून सध्या मुंबईत वास्तव्यास आहे. हेरगिरीच्या संशयावरुन माजी नौदल अधिकाऱ्याला पाकमध्ये अटक भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने पाकिस्तानने केलेले सर्व आरोप फेटाळले होते. कुलभूषण जाधव हे आपल्या व्यवसायानिमित्त पाकिस्तानमध्ये असल्याचा दावा सरकारकडून करण्यात आला होता. कुलभूषण जाधव मूळचे मुंबईचे रहिवासी असून त्यांचे वडील मुंबई पोलिस दलाचे माजी कर्मचारी आहेत. जाधव यांनी नौदलातून निवृत्ती स्वीकारुन व्यवसायाला सुरुवात केली होती. त्यामुळे आपला मुलगा हेर असल्याचा आरोप जाधव परिवाराने फेटाळून लावला आहे.’ माझ्या मुलाला यात अडकवण्यात आलं आहे. कुलभूषण इराणच्या चबाहारमध्ये सल्लागार म्हणून व्यवसाय करतो. कथित कबुलीनाम्याचा व्हिडीओ यापूर्वी  पाकिस्तानकडून कुलभूषण जाधव यांच्या कथित कबुलीनाम्याचा व्हिडीओ जारी केला होता. या व्हिडीओत कुलभूषण जाधव यांनी आपण रॉ एजंट असल्याचं मान्य केल्याचा दावा, पाकिस्तानने केला होता. मात्र भारताने या व्हिडीओच्या सत्यतेवर आक्षेप घेतला होता. कुलभूषण जाधवांच्या कथित कबुलनाम्याच्या व्हिडिओत 102 कट्स संबंधित बातम्या :

कुलभूषण जाधव यांना भारतात परत आणण्यासाठी जोरदार हालचाली

कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानी कोर्टाकडून फाशीची शिक्षा

कुलभूषण जाधव यांच्या मित्राशी बातचीत

कुलभूषण जाधवविरोधात निर्णायक पुरावे नाहीत, पाकची कबुली

हेरगिरी प्रकरणी अटकेतील कुलभूषण जाधवांचा कबुलीनामा ?

हेरगिरीच्या संशयावरुन माजी नौदल अधिकाऱ्याला पाकमध्ये अटक

कुलभूषण जाधव यांच्याकडे दोन पासपोर्ट : पाकिस्तान

… तर आम्ही ही पूर्वनियोजित हत्या समजू, भारताने पाकला खडसावलं

भारताचा आक्रमक पवित्रा, पाकिस्तानच्या 12 कैद्यांची सुटका रद्द

हेरगिरीच्या संशयावरुन माजी नौदल अधिकाऱ्याला पाकमध्ये अटक

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

राज्यातले उद्योग गुजरातला पळवले, यांनी महाराष्ट्राचा स्वाभिमान गहाण ठेवला; विजय वडेट्टीवारांचा आरोप, विरोधकांचा चहापानावर बहिष्कार
राज्यातले उद्योग गुजरातला पळवले, यांनी महाराष्ट्राचा स्वाभिमान गहाण ठेवला; विजय वडेट्टीवारांचा आरोप, विरोधकांचा चहापानावर बहिष्कार
Star Kids Who Attended Parent Weddings : कोण बापाच्या, तर कोण आईच्या लग्नाचा साक्षीदार! 9 स्टार किड्स ज्यांनी त्यांच्या पालकांच्या लग्नाला हजेरी लावली
कोण बापाच्या, तर कोण आईच्या लग्नाचा साक्षीदार! 9 स्टार किड्स ज्यांनी त्यांच्या पालकांच्या लग्नाला हजेरी लावली
किरीट सोमय्या फडणवीसांच्या बंगल्यावर, 'त्या' घटनेमागील  पॉलिटिकल गॉडफादर शोधण्याची केली मागणी
किरीट सोमय्या फडणवीसांच्या बंगल्यावर, 'त्या' घटनेमागील पॉलिटिकल गॉडफादर शोधण्याची केली मागणी
मोठी बातमी : तुम्ही ज्या रस्त्याने मुंबईवरुन परळीला येता, तो रस्ता पंकजा मुंडेंनीच केला, भाजपचं सुषमा अंधारेंना उत्तर
मोठी बातमी : तुम्ही ज्या रस्त्याने मुंबईवरुन परळीला येता, तो रस्ता पंकजा मुंडेंनीच केला, भाजपचं सुषमा अंधारेंना उत्तर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Pune Eskobar Demolish News : पुण्यातील एस्को बारवर कारवाई; कारवाई, बार जमीनदोस्तMVA PC On Monsoon Session : उद्यापासून विधिमंडळाचं अधिवेशन, सरकारच्या चहापानावर विरोधकांचा बहिष्कारManoj Jarange : मराठयांवरती 100 टक्के अन्याय होणार, आता ताकदीनं उठाव करणारABP Majha Headlines : 03 PM : 26 June 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
राज्यातले उद्योग गुजरातला पळवले, यांनी महाराष्ट्राचा स्वाभिमान गहाण ठेवला; विजय वडेट्टीवारांचा आरोप, विरोधकांचा चहापानावर बहिष्कार
राज्यातले उद्योग गुजरातला पळवले, यांनी महाराष्ट्राचा स्वाभिमान गहाण ठेवला; विजय वडेट्टीवारांचा आरोप, विरोधकांचा चहापानावर बहिष्कार
Star Kids Who Attended Parent Weddings : कोण बापाच्या, तर कोण आईच्या लग्नाचा साक्षीदार! 9 स्टार किड्स ज्यांनी त्यांच्या पालकांच्या लग्नाला हजेरी लावली
कोण बापाच्या, तर कोण आईच्या लग्नाचा साक्षीदार! 9 स्टार किड्स ज्यांनी त्यांच्या पालकांच्या लग्नाला हजेरी लावली
किरीट सोमय्या फडणवीसांच्या बंगल्यावर, 'त्या' घटनेमागील  पॉलिटिकल गॉडफादर शोधण्याची केली मागणी
किरीट सोमय्या फडणवीसांच्या बंगल्यावर, 'त्या' घटनेमागील पॉलिटिकल गॉडफादर शोधण्याची केली मागणी
मोठी बातमी : तुम्ही ज्या रस्त्याने मुंबईवरुन परळीला येता, तो रस्ता पंकजा मुंडेंनीच केला, भाजपचं सुषमा अंधारेंना उत्तर
मोठी बातमी : तुम्ही ज्या रस्त्याने मुंबईवरुन परळीला येता, तो रस्ता पंकजा मुंडेंनीच केला, भाजपचं सुषमा अंधारेंना उत्तर
घरात कुणीच नसल्याचं पाहून बॉयफ्रेंड आला, दोन मुलांच्या आईच्या प्रेमाचा THE END; विरार मर्डरची इनसाइड स्टोरी
घरात कुणीच नसल्याचं पाहून बॉयफ्रेंड आला, दोन मुलांच्या आईच्या प्रेमाचा THE END; विरार मर्डरची इनसाइड स्टोरी
NEET पेपरफुटीचं आता धाराशिव कनेक्शन; घराला कुलूप लावून आरोपी बायका-लेकरांसह फरार
NEET पेपरफुटीचं आता धाराशिव कनेक्शन; घराला कुलूप लावून आरोपी बायका-लेकरांसह फरार
Cheapest Flight Tickets : स्वस्तात मस्त विमान तिकिट हवंय? आठवड्यातील फक्त 'या' दोन दिवशी सकाळीच बुक करा तिकिट!
स्वस्तात मस्त विमान तिकिट हवंय? आठवड्यातील फक्त 'या' दोन दिवशी सकाळीच बुक करा तिकिट!
आमचे काका निवडणुकीत पडल्यानंतर चांगलं काम करतात; पुतण्या संदीप यांचा जयदत्त क्षीरसागरांना सणसणीत टोला
आमचे काका निवडणुकीत पडल्यानंतर चांगलं काम करतात; पुतण्या संदीप यांचा जयदत्त क्षीरसागरांना सणसणीत टोला
Embed widget