एक्स्प्लोर

कोझिकोड विमान अपघात नव्हे तर खून : हवाई सुरक्षा तज्ज्ञ कॅप्टन मोहन रंगनाथन

कोझिकोड विमान अपघात नव्हे तर खून असल्याचे हवाई सुरक्षा तज्ज्ञ कॅप्टन मोहन रंगनाथन यांनी म्हटले आहे. नऊ वर्षांपूर्वीच हा इशारा दिला होता, असेही त्यांनी सांगितले.

नवी दिल्ली : कोझिकोड विमान अपघात हा अपघात नसून खून असल्याचे हवाई सुरक्षा तज्ज्ञ कॅप्टन मोहन रंगनाथन यांनी हिंदुस्तान टाईम्सशी बोलताना सांगितले. सुरक्षा सल्लागार समितीच्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष केले गेल्याने हा अपघात झाल्याचे ते म्हणाले. त्यांच्या स्वत: च्या लेखापरीक्षणामध्ये सुरक्षाविषयक समस्या नोंदवण्यात आल्या होत्या. हा अपघात टाळता आला असता, असेही रंगनाथन म्हणाले. लवकर योग्य पावलं उचलली गेली नाहीत तर कोझिकोडमध्ये शुक्रवारी झालेल्या विमान अपघातासारखेच अपघात जम्मू विमानतळांच्या पाटणा येथेही होऊ शकेल, असे हवाई सुरक्षा तज्ज्ञ कॅप्टन मोहन रंगनाथन यांनी सांगितले. हिंदुस्तान टाईम्सला दिलेल्या मुलाखतीदरम्यान नागरी उड्डाण मंत्रालयाने गठीत केलेल्या सुरक्षा सल्लागार समितीचे सदस्य असलेले रंगनाथन म्हणाले की, कालिकत (आता कोझिकोड) विमानतळ लँडिंगसाठी सुरक्षित नाही, असा इशारा त्यांनी नऊ वर्षांपूर्वी दिलेल्या अहवाल दिला होता. Kerala Air India Plane Crash | केरळ विमान दुर्घटनेसाठी असू शकतात 'ही' तीन मुख्य कारणं रंगनाथन यांनी कोझिकोड विमानतळाच्या बाबतीत टेबल-टॉप रनवे कमी जागेत असल्याने अधिक सुरक्षित साधनांची तिथे गरज असल्याचे सांगितले. कोझिकोड धावपट्टी बाबतही रंगनाथन यांनी काही सुधारणा सांगितल्या होत्या. त्यामुळे आतातरी सरकारने याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. काय आहे घटना? दुबईवरुन येत असलेलं विमान अचानक दरीत कोसळलं आणि मोठा आवाज झाला. विमानात अडकलेल्या लोकांची आरडाओरड, अॅम्ब्युलेंसच्या आवाजाने परिसर दणाणला. भर पावसात हे रेस्क्यू ऑपरेशन सुरु झालं. स्थानीक नागरिकांसह, पोलिस आणि बचावदलाच्या कर्मचाऱ्यांनी दुर्घटनेत जखमींना विमानातून बाहेर काढत दवाखान्यात पोहोचवलं. केरळ विमान दुर्घटनेचं रेस्क्यू ऑपरेशन पूर्ण झालं आहे. या अपघातात दोन पायलटसह 18 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 170 लोकांचा वाचवण्यात आलं आहे. एअर इंडियाचं विमान (IX-1344) मध्ये 190 लोकं होती. ज्यात 174 प्रवाशी, 10 मुलं, 4 केबिन क्रू आणि 2 पायलट होते. अपघातातील सर्व जखमींना मल्लपुरम आणि कोझिकोड येथील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. पावसामुळं विमान कोझिकोड रनवेवरुन घसरलं आणि 35 फुट खाली कोसळलं. एअर इंडियाच्या IX-1344 या विमानाचे दोन तुकडे झाले. Kozhikode Airplane Crash | टेबल टॉप रनवे म्हणजे काय? | निवृत्त एअर व्हॉईस मार्शल नितीव वैद्य

महत्त्वाच्या बातम्या

FSSAI Action : Old Monk सह इतर दारू आणि खाद्यपेये FSSAIच्या निशाण्यावर का आहेत? देशभर धडक कारवाई
Old Monk सह इतर दारू आणि खाद्यपेये FSSAIच्या निशाण्यावर का आहेत? देशभर धडक कारवाई
Video: 'ज्यांनी आमचं संरक्षण केलं पाहिजे तेच आम्हाला चोपून काढत आहेत' मुंबई पोलिसांची गाडी भर रस्त्यात अडवणाऱ्या रियासह देशातील तरुणी राहुल गांधींच्या भेटीला
Video: 'ज्यांनी आमचं संरक्षण केलं पाहिजे तेच आम्हाला चोपून काढत आहेत' मुंबई पोलिसांची गाडी भर रस्त्यात अडवणाऱ्या रियासह देशातील तरुणी राहुल गांधींच्या भेटीला
आता तर विधिमंडळ पक्ष दुसऱ्याच राजकीय पक्षात विलीन होत आहेत, लोकशाही मूल्यांचे रक्षण कसे करायचे, याचा निर्णय तुम्हालाच घ्यावा लागेल; कपिल सिब्बलांची 'सर्वोच्च' साद
आता तर विधिमंडळ पक्ष दुसऱ्याच राजकीय पक्षात विलीन होत आहेत, लोकशाही मूल्यांचे रक्षण कसे करायचे, याचा निर्णय तुम्हालाच घ्यावा लागेल; कपिल सिब्बलांची 'सर्वोच्च' साद
इकडं जंतर मंतरवर विद्यार्थ्यांना अमानुष मारहाण, राम मंदिर लुटीवर चर्चेसाठी विरोधक एकवटले अन् तिकडं संसदेत पराभव होऊन सुद्धा केंद्र सरकार मतदारसंघ पुनर्रचना विधेयक पुन्हा आणण्याच्या तयारीत
इकडं जंतर मंतरवर विद्यार्थ्यांना अमानुष मारहाण, राम मंदिर लुटीवर चर्चेसाठी विरोधक एकवटले अन् तिकडं संसदेत पराभव होऊन सुद्धा केंद्र सरकार मतदारसंघ पुनर्रचना विधेयक पुन्हा आणण्याच्या तयारीत

व्हिडीओ

Kunbi Certificate Issues Special Report : मराठा आरक्षणाचा पेच वाढला? कुणबी दाखलेच अवैध? | Special Report
Dharashiv News Special Report : धाराशिव जिल्हा परिषदेच्या दोन तास टीव्ही, मोबाईल बंद उपक्रमाला सुरुवात | Special Report
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
Gungi Gudiya Special Report : गूंगी गुडिया ते गूंगा गुड्डा, मौनावरून राजकारण की राजकारणासाठी मौन?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
FSSAI Action : Old Monk सह इतर दारू आणि खाद्यपेये FSSAIच्या निशाण्यावर का आहेत? देशभर धडक कारवाई
Old Monk सह इतर दारू आणि खाद्यपेये FSSAIच्या निशाण्यावर का आहेत? देशभर धडक कारवाई
Sunetra Pawar : म्हाडाच्या प्रलंबित गृहनिर्माण प्रकल्पांना तातडीने गती द्या; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश
म्हाडाच्या प्रलंबित गृहनिर्माण प्रकल्पांना तातडीने गती द्या; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश
'एबीपी माझा' इम्पॅक्ट; बिबट्यासह पिल्लांचा वावर, वन अधिकारी थेट वावरात; बिबटे जेरबंद करण्यासाठी पिंजरे तैनात
'एबीपी माझा' इम्पॅक्ट; बिबट्यासह पिल्लांचा वावर, वन अधिकारी थेट वावरात; बिबटे जेरबंद करण्यासाठी पिंजरे तैनात
कोर्टाच्या तारखेला वेळेवर हजर न राहणे भोवले, 2020 चं प्रकरण; मुंबईतील भाजप नगरसेवकास अटक
कोर्टाच्या तारखेला वेळेवर हजर न राहणे भोवले, 2020 चं प्रकरण; मुंबईतील भाजप नगरसेवकास अटक
Congress News : काँग्रेसचे नेतृत्व तळागाळापासून तुटलं, निष्ठावानांना डावललं जातंय, महिला नेत्याचा गंभीर आरोप
काँग्रेसचे नेतृत्व तळागाळापासून तुटलं, निष्ठावानांना डावललं जातंय, महिला नेत्याचा गंभीर आरोप
BMM 2026 : सिअॅटलमध्ये रंगणार जागतिक मराठी मेळावा; संस्कृती, ज्ञान, उद्योजकता आणि मनोरंजनाचा चौफेर संगम
सिअॅटलमध्ये रंगणार जागतिक मराठी मेळावा; संस्कृती, ज्ञान, उद्योजकता आणि मनोरंजनाचा चौफेर संगम
रस्ता आहे की, चिखलमार्ग; गोवा मार्गावर बससह वाहने फसली, विद्यार्थ्यांसह नागरिकांना मोठा त्रास
रस्ता आहे की, चिखलमार्ग; गोवा मार्गावर बससह वाहने फसली, विद्यार्थ्यांसह नागरिकांना मोठा त्रास
विलास घुले मृत्यू प्रकरण! खासदार बजरंग सोनवणेंच्या मुलाला अटक करा नाहीतर आम्ही… बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घुले कुटुंबीयांचे आमरण उपोषण 
विलास घुले मृत्यू प्रकरण! खासदार बजरंग सोनवणेंच्या मुलाला अटक करा नाहीतर आम्ही… बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घुले कुटुंबीयांचे आमरण उपोषण 
Embed widget