एक्स्प्लोर

भिडे गुरुजी वडीलधारे, त्यांच्याविरोधात बोलणाऱ्यांची लायकी नाही : उदयनराजे

परंतु उदयन राजे यांनी भिडे गुरुजींची पाठराखण करत शरद पवार यांना घरचा आहेर दिला आहे.

नवी दिल्ली : भिडे गुरुजी वडीलधारे आहेत. त्यांच्याबद्दल आदर आहे आणि आदर राहाणार. त्यांनी लहान मुलांचं संघटन केलं. त्यांचा काय संबंध पण नाही, त्यांच्याविरोधात बोलणाऱ्यांची लायकी नाही," असं विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज उदयन राजे भोसले यांनी केलं आहे. ते दिल्लीत एबीपी माझाशी बोलत होते. कोरेगाव भीमा दगडफेकी प्रकरणी भिडे गुरुजी आणि मिलिंद एकबोटे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भिडे गुरुजी दगडफेकीची सूत्रधार असल्याचा आरोप भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. तसंच या घटनेमागे काही हिंदुत्त्ववादी संघटना असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनीही केला आहे. प्रकाश आंबेडकरांच्या आरोपांवर भिडे गुरुजींचं स्पष्टीकरण परंतु उदयन राजे यांनी भिडे गुरुजींची पाठराखण करत शरद पवार यांना घरचा आहेर दिला आहे. भिडे गुरुजी एक नबंर माणूस! उदयनराजे म्हणाले की, "भिडे गुरुजी आज मॅथेमॅटिक्समध्ये पीएचडी केलेला, एक नंबर माणूस आहे. हे जर आम्हाला प्रोफेसर असते, त्यांनी आम्हाला प्रश्न-उत्तर दिले असते तर मी कधी आयुष्यात पासही झालो नसतो. ग्रेट माणूस आहे. त्याच्यावर अॅट्रॉसिटी लावता, थोडा तरी विचार करायला हवा." कोरेगाव-भीमामध्ये मृत्यू झालेल्या तरुणाच्या कुटुंबाकडून शांततेचं आवाहन भिडे गुरुजी रडले, माझा काही संबंध नाही म्हणाले कोरेगाव भिमा वाद झाल्यानंतर भिडे गुरुजींशी काय बोलणं झालं, चर्चा झाली? या प्रश्नावर उदयनराजे म्हणाले की, "रडले, ते म्हणाले माझा काही संबंध नाही. त्यांना रडू नका म्हणालो. ते बोलले महाराज, उभ्या आयुष्यात राहिले किती वर्ष, माझं कधीही काही होऊ शकतं. मी फक्त लोकांना प्रोत्साहन दिलं, हे केलं, ते केलं. मिलिंद एकबोटे सुद्धा माझा मित्र आहे. त्यांना मी मनापासून सांगितलं, कारण नसताना उद्रेक तिथे होईल, असं वक्तव्य करु नका. कोरेगाव भीमातील हिंसाचार सरकारच्या हलगर्जीमुळे : ग्रामस्थ जितेंद्र मित्र आहे, हॅण्डसम आहे, पण... कोरेगाव भीमा घटनेला हिंदुत्त्ववादी संघटना असल्याचा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे, याबाबत विचारलं असता, उदयन राजे म्हणाले की, जितेंद्र माझा मित्र आहे. आमदार आहे. हॅण्डसम आहे. पण त्याने थोडा विचार करायला हवा होता, काय बोलतो, कोणाशी बोलतो आणि कशासाठी बोलतो. इफ अँड बट ऑलवेज देअर. पाहा संपूर्ण व्हिडीओ संबंधित बातम्या थर्टी फर्स्ट ते महाराष्ट्र बंद, पोलीस ऑन ड्युटी 72 तास भिडे गुरुजींवरील गुन्हा मागे घ्या, सांगलीत समर्थनार्थ मोर्चा दलित तरुणांची धरपकड तात्काळ थांबवावी : प्रकाश आंबेडकर दलित समाज धाकटा भाऊ, सर्वांना एकत्र नांदायचं आहे : छत्रपती संभाजीराजे सणसवाडी दगडफेकीच्या निषेधार्थ आज महाराष्ट्र बंद पुण्यातील सणसवाडीत दोन गटात वाद, परिस्थिती नियंत्रणात सणसवाडी दगडफेकीची न्यायालयीन चौकशी होणार : मुख्यमंत्री

सरकारने पुरेशी खबरदारी घ्यायला हवी होती : शरद पवार

वढूमध्ये दोन्ही गटांच्या प्रतिनिधींची बैठक, अॅट्रॉसिटीचे गुन्हे मागे घेण्याची तयारी

भीमा कोरेगावप्रकरणी छत्रपती संभाजीराजे यांचं राज्यसभेत निवेदन

महत्त्वाच्या बातम्या

Bar Council : बार काऊन्सिलनं निर्णय फिरवला, सरन्यायाधीशांना विरोध करणाऱ्या हैदराबाद येथील कायदा पदवीधर विद्यार्थ्यांच्या नोंदणीवरील स्थगिती मागे
बार काऊन्सिलनं निर्णय बदलला, सरन्यायाधीशांना विरोध विद्यार्थ्यांना दिलासा, कायदा पदवीधरांच्या वकील म्हणून नोंदणीचा मार्ग मोकळा 
बांधकाम सुरु असलेल्या बोगद्यात अचानक शिरलं पाणी आणि मलबा, ढिगाऱ्याखाली 18 कामगार अडकले, बाचवकार्य सुरु
बांधकाम सुरु असलेल्या बोगद्यात अचानक शिरलं पाणी आणि मलबा, ढिगाऱ्याखाली 18 कामगार अडकले, बाचवकार्य सुरु
Sukhbir Badal News:मोठी बातमी, पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, आरोपीला अटक; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
बिहारमध्ये महिलांना भर निवडणुकीत 10-10 हजार वाटल्यानंतर आता उत्तर प्रदेशात 50-50 हजार वाटण्याची तयारी; निवडणुकीच्या तोंडावर 20-20 हजार खात्यात सोडणार?
बिहारमध्ये महिलांना भर निवडणुकीत 10-10 हजार वाटल्यानंतर आता उत्तर प्रदेशात 50-50 हजार वाटण्याची तयारी; निवडणुकीच्या तोंडावर 20-20 हजार खात्यात सोडणार?

व्हिडीओ

Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर
Sanjay Raut on Amit Shah: अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय
Manoj Jarange Patil: आआथातू अरअरअर...अ‍ॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना
Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Solapur Crime News : झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
Bar Council : बार काऊन्सिलनं निर्णय फिरवला, सरन्यायाधीशांना विरोध करणाऱ्या हैदराबाद येथील कायदा पदवीधर विद्यार्थ्यांच्या नोंदणीवरील स्थगिती मागे
बार काऊन्सिलनं निर्णय बदलला, सरन्यायाधीशांना विरोध विद्यार्थ्यांना दिलासा, कायदा पदवीधरांच्या वकील म्हणून नोंदणीचा मार्ग मोकळा 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
Shiv Sena Symbol Case : चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
Sukhbir Badal News:मोठी बातमी, पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, आरोपीला अटक; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
IND Vs SL Galle Test: त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत
त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत
बिहारमध्ये महिलांना भर निवडणुकीत 10-10 हजार वाटल्यानंतर आता उत्तर प्रदेशात 50-50 हजार वाटण्याची तयारी; निवडणुकीच्या तोंडावर 20-20 हजार खात्यात सोडणार?
बिहारमध्ये महिलांना भर निवडणुकीत 10-10 हजार वाटल्यानंतर आता उत्तर प्रदेशात 50-50 हजार वाटण्याची तयारी; निवडणुकीच्या तोंडावर 20-20 हजार खात्यात सोडणार?
Shiv Sena Name & Symbol Dispute: 'पण निवडणूक आयोग शिंदे गटाला धनुष्यबाण चिन्ह देऊ शकत नाही..' अत्यंत कळीचा मुद्दा उपस्थित करत कपिल सिब्बलांकडून पुन्हा आयोगाच्या कारभाराची खरडपट्टी
'पण निवडणूक आयोग शिंदे गटाला धनुष्यबाण चिन्ह देऊ शकत नाही..' अत्यंत कळीचा मुद्दा उपस्थित करत कपिल सिब्बलांकडून पुन्हा आयोगाच्या कारभाराची खरडपट्टी
Embed widget